Join us

प्रिंटेड- फ्लोरल साड्यांचे खास डिझाइन्स, महाशिवरात्रीच्या पूजेसह उन्हाळ्यासाठी सुंदर-वजनाला हलक्या साड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2025 14:41 IST

floral saree design: mahashivratri saree design: summer saree collection: Traditional look on Mahashivratri: fashion tips: printes floral saree design: women saree fashion: floral design saree blouse: floral organza saree blouse design: organza silk saree design: जर तुम्हालाही महाशिवरात्रीनिमित्त पारंपारिक पण साधा लूक हवा असेल आणि सुंदर दिसायचे असेल तर या खास प्रसंगी फ्लोरल प्रिंट साडी नेसू शकता. पाहा सुंदर रंगांसोबत खास विविध साड्यांचे कलेक्शन

लग्नसराई, घरातील खास प्रसंग किंवा पार्टी वेअरसाठी आपल्या कपाटात अनेक रंगाच्या साड्या पाहायला मिळतात. (floral saree design) हल्ली कॉटन, सिल्क, काठापदराची आणि साधा लूक मिळेल अशा साड्यांची मागणी फार प्रमाणात वाढली आहे. ऑफिस किंवा पार्टीमध्ये आपल्या साधी पण सुंदर लूक देणारी साडी हवी असते. (Traditional look on Mahashivratri)पण अशाच साड्या सध्या पूजेसाठी देखील महिला नेसताना पाहायला मिळत आहे. (floral design saree blouse)

महाशिवरात्रीच्या पूजेत तुम्हाला पारंपारिक लूक हवा असेल तर फुलांच्या डिझाइन्सच्या साड्यांची निवड करु शकता. या साड्यांमुळे तुमच्या लूकमध्ये अजून भर पडेल आणि तुम्ही सुंदर दिसाल. या साड्या फक्त पूजेतच नाही तर तुम्ही उन्हाळ्यात देखील नेसू शकता. (printed floral saree design) वजनाला अधिक हलक्या असल्यामुळे तुम्हाला गरम ही होणार नाही. जर तुम्हालाही महाशिवरात्रीनिमित्त पारंपारिक पण साधा लूक हवा असेल आणि सुंदर दिसायचे असेल तर या खास प्रसंगी फ्लोरल प्रिंट साडी नेसू शकता. पाहा सुंदर रंगांसोबत खास विविध साड्यांचे कलेक्शन...

1. एक्सेल फ्लोरल प्रिंट साडी 

जर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी ऑफिसमध्ये साडी नेसण्याचा विचार करत असाल तर एक्सेल फ्लोरल प्रिंटेड साडी हा पर्याय चांगला आहे. या प्रकारच्या साडीत तुमचा लूक खूप वेगळा दिसेल. साधरणत: या साडीची किंमत १५०० रुपयांपर्यंत आहे. या साडीत आणखी भर घालण्यासाठी तुम्ही त्याला साजेशी ज्वेलरी घालू शकता. ज्यामुळे तुमचा लूक उठून दिसेल. 

2. काठ पदर फ्लोरल प्रिंट साडी 

काठपदरमध्ये अनेक नवीन कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतील. यामध्ये तुम्ही गुलाबी रंगाची फ्लोरल प्रिंट साडी नेसू शकता. या साडीत तुमचा लूक अधिक सुंदर दिसेल. खास सणाच्या दिवशी पारंपारिक लूक मिळवण्यासाठी हा लूक तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालेल. या प्रकारची साडी तुम्हाला १००० ते २००० रुपयांच्या आत मिळेल. 

3. ऑर्गेन्झा फ्लोरल प्रिंट साडी

जर तुम्हाला आकर्षक लूक हवा असेल तर क्रीम व्हाइट रंगाची ऑर्गेन्झा फ्लोरल प्रिंट साडी नेसू शकता. या साडीत तुमचा लूक अधिक उठून दिसेल. हलक्या रंगाच्या साडीवर तुम्ही कोणत्याही रंगाच्या ब्लाउजसोबत परिधान करु शकता. यासोबत चोकर किंवा नेकलेस ज्वेलरी घाला. ज्यामुळे तुमचा लूक पूर्ण होईल. 

4. बॉर्डर वर्क फ्लोरल प्रिंट साडी 

हल्ली बाजारात अनेक नवीन प्रकारच्या खास साड्या आपल्याला पाहायला मिळतात. साधी पण सिंपल लूक देणारी साडी तुमच्या व्यक्तिमत्वात भर घालेल. काठाला नाजूक अशी बॉर्डर किंवा लेस असलेली आणि पूर्ण फ्लोरल प्रिंट साडी तुम्हाला शोभून दिसेल. यावर तुम्ही मोठे कानातले घालू शकता.  

टॅग्स :फॅशन