'साडी' हा प्रत्येकीच्या अगदी जवळचा आणि जिव्हाळ्याचा विषय. आपल्यापैकी बऱ्याचजणींच्या साड्या या फारशा नेसल्या जात नाहीत, याउलट घरात एखादा खास प्रसंग किंवा कार्यक्रम असेल तरच साडी कपाटातून बाहेर काढली जाते. बऱ्याचजणी साड्या फारशा नेसत नसल्याने त्या कपाटातच पडून असतात. या साड्या कपाटात कितीही (Easy Tips & Tricks To Perfectly Press a Saree In Just 2 Minutes ) व्यवस्थित घडी करुन ठेवल्या तरी त्यावर कालांतराने सुरकुत्या पडतात किंवा घडीचे ठसे उमटतात. अशा परिस्थितीत साडी नेसायची झाली तर सुरकुत्या पडलेल्या किंवा चुरगळलेल्या साडीला सगळ्यात आधी छान, कडक इस्त्री करावी लागते. परंतु या भल्या - मोठ्या साड्यांना इस्त्री करणे म्हणजे वाटते तितके सोपे काम मुळीच नाही(Saree Ironing Tips).
या साड्यांना इस्त्री करता करता दमछाक होते. यासाठीच, अशा भल्या - मोठ्या साड्यांना इस्त्री करण्यासाठी आपण एका भन्नाट ट्रिकचा वापर करु शकतो. ही सुपरईझी ट्रिक वापरून आपण चुरगळलेल्या साड्यांना अगदी काही मिनिटभरात छान, कडक इस्त्री करु शकतो. यासाठी नेमक करायचं काय ते पाहूयात.
सर्वप्रथम हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की साडीचं कापड कोणत्या प्रकारचं आहे. कॉटन, सिल्क, शिफॉन, जॉर्जेट की क्रेप. कारण प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या कापडाची साडी इस्त्री करताना थोडी काळजी घ्यावी लागते. पण अशी एक सोपी ट्रिक आहे जी बहुतेक सर्व प्रकारच्या साड्यांसाठी फायदेशीर ठरते. साडीला झटपट इस्त्री करण्यासाठी आपल्याला बेड, टेबल किंवा इस्त्री बोर्ड यासारख्या एका सपाट पृष्ठभागाची गरज लागणार आहे. यासोबतच, इस्त्री, पाण्याने भरलेली स्प्रे बाटली, एक पातळ सूती कपडा इतके साहित्य लागणार आहे. ही ट्रिक साडीचं कापड खराब न होऊ देता, सुरकुत्या घालवून, ती मऊसूत आणि नीटनेटकी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.
तौबा यह सादगी! हिना खानचा लग्नातला साधा लूक होतोय व्हायरल, कॅन्सरनंतर जगण्याची नवी सुरुवात...
ना साबण, ना लोशन! करा वाटीभर बेसनाचा घरगुती फेसवॉश - त्वचेच्या समस्या गायब, दिसाल सुंदर...
सर्वप्रथम साडी अर्धी दुमडून घ्या, म्हणजे तिची रुंदी कमी होईल आणि ती सहज हाताळता येईल. नंतर ही अर्धी साडी टेबलवर किंवा पलंगावर अंथरून घ्या. साडीच्या प्रत्येक भागाला हलक्या हाताने ओढून नीट पसरवा, जेणेकरून कुठेही सुरकुत्या किंवा घड्या राहणार नाहीत. यानंतर, स्प्रे बाटलीतून थोडंसं पाणी साडीवर हलकंसं शिंपडा. कापडं थोडंसं ओलसर होईल इतपतच, फार जास्त भिजवू नका. पाणी शिंपडल्यामुळे कपड्यावरील सुरकुत्या मऊ होतात आणि इस्त्री व्यवस्थित होते. आता एका पातळ सूती कपडा साडीवर अंथरा आणि मग त्यावरून स्टीम इस्त्री फिरवा. या सूती कपड्यामुळे साडीचं नाजूक कापड थेट इस्त्रीच्या उष्णतेच्या संपर्कात येत नाही आणि त्यामुळे फॅब्रिकला कुठलेही नुकसान न होता साडी व्यवस्थित, झटपट आणि मऊसूत अशी इस्त्री करणे सोपे जाते.
मूठभर कांद्याच्या टरफलांनी करा नॅचरल हेअर कलर, पांढरे केसही होतील १५ मिनिटांत काळेभोर...
साडीला एका हँगरवर नीट टांगून घ्या आणि ती बाथरूममध्ये ठेवावी. आता गरम पाण्याचा शॉवर चालू करा, साधारणतः १० मिनिटे गरम पाण्याचा प्रवाह चालू ठेवावा, पण साडीला पाणी लागू नये याची काळजी घ्या. या प्रक्रियेमुळे बाथरूममध्ये गरम पाण्याची वाफ तयार होते आणि साडीवरील हलक्याफुलक्या सुरकुत्या आपोआप निघून जातात. यानंतर, तुम्ही साडीचा फक्त पदर आणि बॉर्डरसारखे महत्त्वाचे भागच हलक्या हाताने इस्त्री करु शकता. यामुळे वेळही वाचतो आणि साडीही नीट इस्त्री करून होते.
अजून एक सोपी युक्ती म्हणजे साडी रात्रीपासूनच एका हँगरवर टांगून ठेवावी. साडीचं स्वतःचं वजनच त्या सुरकुत्यांना खाली खेचून सरळ करतं. सकाळी तुम्हाला फक्त गरज पडेल त्या भागांवर हलकीशी इस्त्री करायची आणि साडी नेसण्यासाठी तयार आहे.
साडीची नीट घडी घालत असतानाच त्याचवेळी हळूहळू इस्त्री करत जा. म्हणजे प्रत्येक घडी नीट बसते, सुरकुत्या निघून जातात आणि साडी थेट कपाटातून काढली की नेसायला तयार असते. ही ट्रिक विशेषतः कॉटन साड्यांसाठी अतिशय उपयोगी ठरते, कारण कॉटन कापडाला इस्त्री नीट बसवणं थोडं वेळखाऊ असतं. पण ही पद्धत वापरल्यास साडी व्यवस्थित प्रेसही होते आणि वेळही वाचतो.