Join us

हातावर मोकळा सोडलेला पदर सांभाळताना नाकीनऊ येतात? पदर पिनअप करण्याची सोपी ट्रिक बघाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2024 14:42 IST

Simple Hack To Carry Open Pallu Comfortably: फ्लोटींग पदर म्हणजेच हातावर मोकळा सोडलेला पदर खूप आवडतो. पण तो नीट सांभाळताच येत नाही?(simple trick to pin up open pallu or floating pallu)

ठळक मुद्देजर तुम्हाला ओपन पल्लू म्हणजेच एका हातावर पदर मोकळा सोडायचा असेल तर तो पिनअप करताना या काही गोष्टी लक्षात ठेवा..

सध्या लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे अधूनमधून साडी नेसणे ओघाने आलेच. कारण बहुतांश जणी अशा आहेत ज्या एरवी साड्या नेसत नाहीत, पण लग्नसमारंभांमध्ये मात्र आवर्जून साड्या नेसतात. साडी नेसल्यावर बारीक प्लेट्स घालून पदर पिनअप करणे अनेक जणींना आवडत नाही. त्याऐवजी त्यांना ओपन पल्लू किंवा फ्लोटींग पदर जास्त आवडतो. कारण त्यामुळे अर्थातच तुमचं व्यक्तिमत्त्व आणखी छान खुलून दिसतं. पण तो एका हातावर मोकळा सोडलेला पदर जर व्यवस्थित सांभाळता आला नाही, तर मात्र चारचौघांत खूपच फजिती होते आणि साडी सांभाळू, पदर सांभाळू की स्वत:ला सांभाळू अशी चांगलीच तारांबळ उडते (simple hack to carry open pallu comfortably). त्यामुळेच जर तुम्हाला ओपन पल्लू म्हणजेच एका हातावर पदर मोकळा सोडायचा असेल तर तो पिनअप करताना या काही गोष्टी लक्षात ठेवा..(simple trick to pin up open pallu or floating pallu)

 

ओपन पल्लू कसा पिनअप करावा?

ओपन पल्लू कसा पिनअप करावा, याविषयी माहिती सांगणारा व्हिडीओ gehani.heena या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

शिल्पा शेट्टी म्हणते- तुपापासून दूर पळू नका, माझ्यासारखं दिसायचं तर रोज 'एवढं' तूप नक्की खा...

यामध्ये सांगितल्यानुसार पदर जेव्हा तुम्ही डाव्या खांद्यावर घेता तेव्हा सगळ्यात आधी तो खांद्यावर पिनअप करून टाका.

त्यानंतर पोटावर जिथे तुम्ही साडी खोचलेली असते तिथे पोटाच्या डाव्या बाजुला पदर अगदी हलकासा खोचून घ्या. जेणेकरून तिथे तो अगदी फिक्स बसेल.

 

त्यानंतर पदराचा जो खालचा काठ आहे, तो थोड्या थोड्या अंतराने थोडा वर करून त्याला निऱ्या घातल्याप्रमाणे दोन ते तीन फोल्ड द्या. 

केस गळणे थांबविणारे सुपरफूड! अगदी आजपासूनच खायला सुरुवात करा, महिनाभरात फरक दिसेल

त्यानंतर पदराच्या निऱ्या डाव्या हाताच्या खालचा जो पदराचा भाग येतो तिथे पिनअप करा जेणेकरून पिन लावलेली दिसणार नाही.

या काही टिप्स लक्षात ठेवून जर तुम्ही पदर पिनअप केला तर नक्कीच तो अगदी पक्का बसेल आणि अजिबात हलणार नाही. त्यामुळे तुमची पदर सांभाळताना तारांबळ उडणार नाही आणि तुम्ही रिलॅक्स राहू शकाल. 

 

टॅग्स :फॅशनसाडी नेसणेस्टायलिंग टिप्स