ब्रिटीश रॉक बॅण्ड कोल्डप्लेचे कलाकार 'म्युझिक ऑफ द स्फेअर्स वर्ल्ड टूर' या निमित्ताने जगभर प्रवास करत आहेत. त्यानिमित्ताने ते सध्या भारतात आले असून मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये मुक्कामी होते. त्यादरम्यान बँडचा मुख्य कलाकार ख्रिस मार्टिन आणि हॉलीवूड अभिनेत्री डकोटा जॉन्सन हे मुंबई फिरण्यासाठी एकत्रितपणे बाहेर पडले असता त्यांचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. हातात हात घालून चालणाऱ्या या रोमॅण्टीक जोडप्याने पाहताक्षणीच अनेकांचं लक्ष तर वेधून घेतलंच पण त्यासोबतच डकोटाने घातलेला काळ्या रंगाचा फुलाफुलांचा ड्रेसही खूप चर्चेत आला आहे. बघूया तिचा ड्रेस नेमका होता कसा..(Dakota Johnson's romantic black floral dress in Mumbai trip with Chris Martin)
डकोटाने घातलेला नाजूक फुलांचा काळ्या रंगाचा ड्रेस बघताक्षणीच अनेकांना आवडेल असाच आहे. बारीक स्टॅण्ड कॉलर आणि डीप व्ही नेक असलेला हा ड्रेस गुडघ्यांच्याही खालपर्यंत आहे.
किचनमध्ये खूपच पसारा होतो? २५० रुपयांत घ्या 'या' वस्तू, किचन नेहमीच दिसेल टापटीप
पफ बाह्या आणि गळ्याला असणारे मोती बटन यामुळे हा ड्रेस जास्तच खुलून दिसत होता. या सुंदर फ्रॉकवर डकोटाने स्पोर्ट शूज घातले होते आणि केसांचा अंबाडा घालून डार्क काळ्या रंगाचा गॉगल लावला होता. काळा फ्राॅक, काळा गॉगल यामध्ये डकोटाचा गोरापान रंग आणखीनच खुलून गेला होता.
डकोटाच्या या ड्रेसची खासियत अशी की तो अतिशय हलक्या आणि तलम असणाऱ्या कॉटन कपड्यापासून तयार करण्यात आला होता.
'हा' पदार्थ आहे खूपच दुर्लक्षित; पण निरोगी दिर्घायुष्यासाठी ठरतो उपयुक्त! बघा नेमकं काय
तिचा हा अतिशय स्टायलिश आणि खूपच आरामदासी असणारा ड्रेस Doen या फॅशन ब्रॅण्डचा असून त्याची किंमत जवळपास ३७ हजार रुपये एवढी आहे. ट्रिपला जाताना किंवा कॅज्युअली कुठे फिरायला जाताना तुम्ही डकोटासारखा आकर्षक लूक नक्कीच करू शकता.