एक नूर आदमी सौ नूर कपडा अशी आपल्याकडे म्हण आहे. यावरूनच हे लक्षात येतं की आपल्या कपड्यांना किती जास्त महत्त्व आहे. आपण कुठे जाताना कोणत्या प्रकारचे, कोणत्या रंगाचे कपडे घालत आहोत यावरून आपल्या व्यक्तिमत्त्वाची नकळतपणे कित्येक लोक पारख करत असतात. त्यामुळे आपल्या कपड्यांकडे, त्यांच्या रंगाकडे आपले विशेष लक्ष असायलाच हवे. आता तर हल्लीचा जमाना असा आहे की माणसाने प्रेझेंटेबल असणं खूप जास्त महत्त्वाचं झालं आहे. म्हणूनच कपड्यांच्या बाबतीत या काही टिप्स तुम्हाला कधी ना कधी नक्कीच उपयोगी पडणाऱ्या आहेत (Classy Color Combinations for Dusky Skin Tone). आता ज्या महिला सावळ्या किंवा डस्की स्किनच्या असतात त्यांना खरेदीला गेल्यावर कपड्यांचे रंग ठरवताना खूपदा गोंधळून गेल्यासारखं होतं (colour combination for dusky skin). त्यासाठीच या काही टिप्स पाहा आणि तुमच्या अंगावर कोणत्या रंगाचे कपडे जास्त उठून दिसू शकतात ते पाहा...(which colour clothes suits on dusky skin?)
डस्की, सावळ्या रंगाच्या महिलांनी कोणत्या रंगाचे कपडे घालावे?
१. डस्की किंवा सावळ्या रंगाच्या महिलांनी गर्द जांभळ्या किंवा पर्पल रंगाचे कपडे घालावे. या रंगामध्ये त्या आणखी जास्त ग्रेसफूल, आकर्षक दिसतात.
काही केल्या छातीतला कफ मोकळा होईना? अंजीराचा सोपा उपाय- कफ, खोकला कमी होईल
२. गोल्डन रंग, ब्रॉन्झ कलर किंवा ग्लिटरी कॉपर कलर या रंगाचे कपडेही सावळ्या रंगाच्या महिलांच्या अंगावर खूप उठून दिसतात. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच ग्लेझ येते.
३. हनी पिंक, मॅजेंटा किंवा राणी कलरच्या वेगवेगळ्या छटा असणारे कपडेही सावळ्या रंगावर शोभून दिसतात. पण फिकट गुलाबी, फिकट निळा, पांढरा, ऑफव्हाईट, पोपटी या रंगाचे कपडे घालणं मात्र टाळायला हवं.
Winter Special: मुळ्याची चटपटीत चटणी करा फक्त १० मिनिटांत, खाऊन बघताच सारे म्हणतील वाह वा..
४. त्याचप्रमाणे सावळा रंग असणाऱ्या महिलांनी केशरी, मस्टर्ड यलो, लालसर पिवळा, रस्ट रेड या रंगातले कपडे घालण्यासही प्राधान्य द्यावं. या रंगाचं सुंदर रिफ्लेक्शन अंगावर पडतं आणि त्यामुळे कांती उजळून निघाल्यासारखी वाटते.
