Join us

एक गजरा केसात माळा आणि दिवाळीत तुमचा लूक बदलेल! बघा 'या' अभिनेत्रींचे खास लूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2022 16:48 IST

Diwali Special Ideas Hairstyle दिवाळीत पारंपरिक, सालस रुप शोभून दिसते. त्यासाठी या काही आयडिया

दिवाळी म्हणजे पाच दिवसांचा सण. शॉपिंग ते मिठाई. घरातील साफसफाई ते सजावट. यासह दिवाळीतील विशेष लूकसाठी देखील ते स्वतःसाठी विशेष वेळ देतात. बहुतांश महिला या सणानिमित्त पारंपारिक लुकला प्राधान्य देतात. काठापदराच्या साडीसह तुम्ही केशरचनेत गजराच्या स्पेशल लुकची निवड करू शकता. यात बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींचा लूकही कॉपी करता येईल. बघा एक साधा गजरा वापरुन तुम्ही किती पारंपरिक सुंदर दिसू शकता. बघा, कुणाचा लूक तुम्हाला आवडतो ?

कंगना रनौत

काँट्रोवर्सी क्वीन कंगना रानौत हिला पारंपारिक लूक प्रचंड आवडतो. पारंपारिक लूकमध्ये ती नेहमी वेगवेगळे प्रकार करताना दिसते. तिच्या चाहत्यांकडून देखील विशेष पसंती मिळते. तिने नुकतेच साउथ इंडियन लुकमधील फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले होते या लुकमध्ये तिने पिवळ्या रंगाच्या साडीवर भरगच्च गजरा केसांवर लावला होता.

काजोल 

बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री काजोलच्या पिवळ्या साडीतील लूकने चाहत्यांना वेड लावले होते.  तिने हातात हिरव्या बांगड्या घातले होते. सोबत केसांचा बन करून तिने गजरा लावला होता. हलक्या मेकअपमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत होती.

करिना कपूर 

बॉलिवूडची बेबो अर्थात करीना कपूर पारंपारिक लुकमध्ये प्रचंड सुंदर दिसते. तिचा पिवळ्या साडीतील लूकने सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला होता. तिने सिंपल पिवळ्या साडीवर मोठे कानातले घातले. यासह छोटा बन घालून गजरा माळला. गजरामुळे तिचा लूक अधिक खुलून दिसत होता.

मौनी रॉय

अभिनेत्री मौनी रॉय  आपल्या हटके लुकसाठी नेहमी चर्चेत असते. तिचा आयव्हरी लहंगावरील पारंपारिक लुक सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. या लुकमध्ये तिने बनसह लांबलचक वेणी बांधली होती आणि त्यावर गजरा माळला होता.

आलिया भट्ट 

क्युट गर्ल आलिया भट्टचा माॅर्डनसह पारंपारीक लुक प्रचंड चर्चेत असतात. तिचा पारंपारिक ड्रेसवरील फोटो सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाले होते. या लुकमध्ये तिने मोरपंखी रंगाचा ड्रेस परिधान केला. यासह केशरचनेत तिने बनमध्ये भरगच्च गजरा माळला होता.

टॅग्स :फॅशनब्यूटी टिप्स