श्रावण सुरू झाला आणि आता दिवाळीपर्यंत एका मागे एक सण आहेतच... एरवी अनेकजणी साड्या नेसत नाहीत. पण सणासुदीच्या निमित्ताने हमखास वेगवेगळ्या साड्या कपाटाबाहेर येतात आणि हौशीने नेसल्या जातात. पण बऱ्याचदा नेमकी अशी अडचण येते की आपण साडी नेसण्यासाठी हातात घेतो आणि ब्लाऊज घालायला लागतो तेव्हा एकदम लक्षात येतं की ते कंबरेला खूप सैल झालं आहे (blouse hacks). अशावेळी सुई दोरा हातात घेऊन ब्लाऊज फिटिंगचं करण्याएवढा वेळही आपल्याकडे नसतो (how to tighten loose blouse without sew?). म्हणूनच या काही सोप्या टिप्स पाहा आणि अगदी झटपट ब्लाऊज फिटिंगचं करा...(how to make loose blouse fit without stitching?)
कंबरेत सैल झालेलं ब्लाऊज न शिवता फिटिंगचं कसं करायचं?
सैल झालेलं ब्लाऊज फिटिंगचं कसं करता येऊ शकतं, याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत.
१. जर तुमच्या ब्लाऊजचे हुक मागच्या बाजुने असतील तर ही ट्रिक उपयोगी येऊ शकते. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला ४ सेफ्टी पिन्स लागणार आहेत.
Janmashtami 2025: कृष्णकन्हैय्याच्या आवडीचा गोपालकाला खाण्याचे ५ फायदे वाचाल तर नेहमीच करून खाल..
आधी ब्लाऊज अंगात घालून घ्या. यानंतर ब्लाऊजची मागच्या बाजुने उजवी आणि डावी बाजू ओढून ती एकमेकांवर घ्या आणि ती वर- खाली अशा पद्धतीने व्यवस्थित पिनअप करून घ्या. चारही बाजूंनी चार पिना लावल्या तर ब्लाऊज एकदम परफेक्ट फिटिंगचं होईल.
२. आता काही ब्लाऊजचे बटन पुढच्या बाजुनेही असतात. अशावेळी ब्लाऊज घालून सगळे बटन्स व्यवस्थित लावून घ्या. त्यानंतर एक बांगडी घ्या.
शरीरातली व्हिटॅमिन B 12 ची कमतरता कशी ओळखायची? ५ लक्षणांकडे दुर्लक्ष नकोच- गंभीर आजारांचा धोका
ही बांगडी मागच्या बाजुने ब्लाऊजची जी आडवी पट्टी असते त्या भागात आतून घाला. यानंतर एक रबरबॅण्ड घेऊन त्याने ब्लाऊज आणि बांगडी एकत्र जोडून बांधून घ्या. यामुळे मागच्या बाजुने छान डिझाईनही दिसेल आणि ब्लाऊजही अगदी परफेक्ट फिटिंगचं होईल.