Join us
Daily Top 2Weekly Top 5

बनारसी साडी असली आहे की नकली, कशी ओळखाल, अस्सल बनारसी साडी नेमकी असते कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2022 19:29 IST

Banarasi Saree बनारसी साडीला परंपरेसह सुंदर पोताचे वरदान आहे, बनारसी साडी विकत घेणार असाल तर, आपण अस्सल साडी घेतोय ना याची खात्री करा..

बनारसी साडी. लग्न असो की स्पेशल समारंभ, महिला बनारसी साडी निवडतात. भरगच्च जरीकाम, काठपदर, रेशीम कापड हे सगळं पाहून बनारसी साडी आपल्याकडे हवीच असं प्रत्येकीला वाटतं. लग्नात नववधू बनारसी साडी निवडते. मात्र, या साडीचा इतिहास काय, या साडीला बनारसी असे नाव का पडले, बनारसी साडीला कसे ओळखायचे याची माहीती आज आपण जाणून घेणार आहोत.

बनारसी साडीची खरी ओळख

बनारसी साडीला खरी ओळख तिच्या जरीकामामुळे मिळाली. बनारसी साडीला हे नाव पडले कारण ही साडी उत्तर प्रदेशातील बनारसच्या विणकरांनी बनवली आहे. बनारसी साडी बनवण्यासाठी पातळ रेशमी धागा वापरला जातो. बनारसी साडीला स्वतःचा इतिहास आहे. राजांच्या घराण्यांसाठी बनारसी साड्या अस्सल सोन्या-चांदीच्या धाग्यांपासून बनवल्या जात असे. हे रेशीम विणण्यासाठी आवश्यक कारागिरी या देशात आणण्याचं आणि ती रुजविण्याचं काम मुघल कारागिरांनी केलं.  वाराणसी शहरात प्रामुख्यानं या साडीची निर्मिती होते.

बनारसी साडीवरील काम असली आहे या नकली कसे ओळखायचे

नक्षीदार काम असलेलीही बनारसी साडी आपल्या सोने आणि चंदेरी नक्षीकामासाठी ओळखली जाते. खऱ्या बनारसी साडीची किंमत तिच्या नक्षीदार कामातून ठरवली जाते. बनारसी साडीची किमंत  ३,००० पासून सुरु होते. ते २००,००० पर्यंत असू शकते. बनारसी साडी खरी आहे की नाही हे ओळखण्याचा मार्ग म्हणजे तिची रचना आणि साडीची गुणवत्ता. बनारसी साडीवर बनवलेल्या डिझाईन्स अतिशय पातळ धाग्याने केल्या जातात. अश्याप्रकारे नक्षीदार कामातून तुम्ही बनारसी साडी ओळखू शकता. उत्तर प्रदेशातील चंदौली, बनारस, जौनपूर, आझमगड, मिर्झापूर आणि संत रविदासनगर भागात बनारसी साड्या बनवल्या जातात.

टॅग्स :फॅशनखरेदी