सध्या आयपीएल २०२६ च्या मॅच सुरु आहेत. अशातच स्टेडियमधल्या किंवा पीचमधल्या अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आयपीएलचे मैदान म्हटलं की केवळ चौकार आणि षटकारांचीच आतिषबाजी नसते, तर ग्लॅमरचा तडकाही तितकाच महत्त्वाचा ठरतो.(Anushka Sharma IPL 2026 look) सोशल मीडियावर एकाच गोष्टीची चर्चा रंगली आहे, ती म्हणजे बॉलीवूड अभिनेत्री आणि विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा. स्टेडियमच्या स्टँडमध्ये विराटला चीअर करण्यासाठी अनुष्का नेहमीच येत असते.(Anushka Sharma floral top price) तिचा फॅशन लूक नेहमीच सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो. शनिवारी झालेल्या RCB च्या विजयानंतर अनुष्काचा साधा लूकही सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. यावेळी तिने कोणताही भडक मेकअप किंवा डिझायनर साडी न निवडता अत्यंत 'सिम्पल' असा लूक कॅरी केला होता. (Anushka Sharma costly jeans details)अनुष्काची फॅशन सेन्स नेहमीच क्लासिक आणि 'मिनिमल' असते, पण या साधेपणामध्येही लक्षावधींची किंमत दडलेली असू शकते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. फॅशन वर्ल्डमध्ये या लूकची तुलना आता 'क्वाएट लक्झरी' (Quiet Luxury) शी केली जात आहे. जाणून घेऊया अनुष्का शर्माच्या या महागड्या लूकचे डिटेल्स आणि नेमकी किंमत किती आहे.
स्वत:शीच बोलता, रात्री उशिरापर्यंत जागता? बुद्धिमान लोकांच्या असतात ५ सवयी, पाहा तुम्हालाही आहेत का?
आयपीएल २०२६ च्या एका महत्त्वाच्या सामन्यात विराट कोहलीच्या बॅटिंगसोबतच अनुष्का शर्माच्या स्टाईलने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. अनुष्का नेहमीच तिच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि साध्या राहणीमानासाठी ओळखली जाते, पण तिची ही साधी फॅशन ब्रँडेड आणि अतिशय महागडी असते.
अनुष्काने शर्माने फुलांच्या नक्षीचा टॉप घातला होता. त्यावर पीच, गुलाबी आणि फिकट नारंगी रंगांच्या छटांमध्ये नाजूक फुलांची नक्षी आहे. या टॉपचा गळा व्ही-नेक आकाराचा असून खांद्यावर आणि बाहीवर रफल्स आहेत. ज्यामुळे हा टॉप अधिक आकर्षक दिसतोय. उन्हाळ्यात हा टॉप घालायला अतिशय आरामदायी आणि ट्रेंडी आहे. सुंदर फुलांच्या नक्षीचा टॉप पॅरिसमधील प्रसिद्ध ब्रँड सेझानच्या आकर्षक कलेक्शनचा एक भाग आहे. ब्रँडच्या वेबसाइटवर या टॉपची किंमत १५० युरो (अंदाजे १६,३६१.७१) इतकी आहे.
अनुष्काने फुलांच्या नक्षीच्या टॉपसोबत निळ्या रंगाची हाय-वेस्ट डेनिम जीन्स घातली. बॅरल-शेप़्ड लूज फिट सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. या जीन्सची खासियत मांडीवर सैल आणि घोट्यांजवळ निमुळती असते. वेबसाइटवर या जीन्सची किंमत £239, म्हणजेच ₹29,925 आहे. या फुलांच्या नक्षीच्या टॉप आणि डेनिम जीन्सच्या कॉम्बोची एकूण किंमत ४६,२८६ इतकी आहे.
अनुष्का शर्माने लेयर्ड नेकलेस, अंगठ्या, ब्रेसलेट आणि हातात घड्याळ घालून आपला लूक पूर्ण केला आहे. तिने आपल्या लूकला साजेसा हलका मेकअप आणि साधी हेअरस्टाईल निवडली. त्यावर पिंक-न्यूड लिपस्टिक, मस्करा आणि टिंटेड चीक्स लावून आपला मेकअप लूक पूर्ण केला.
Web Summary : Anushka Sharma's simple yet expensive floral top and jeans at IPL 2026 are creating buzz. The outfit, worth ₹46,286, showcases her 'quiet luxury' fashion sense. Her minimal makeup and layered accessories completed the look.
Web Summary : आईपीएल २०२६ में अनुष्का शर्मा का सरल लेकिन महंगा फ्लोरल टॉप और जींस चर्चा में हैं। ₹46,286 की पोशाक उनकी 'शांत लक्जरी' फैशन को दर्शाती है। उनके हल्के मेकअप और एक्सेसरीज़ ने लुक को पूरा किया।