Lokmat Sakhi >Fashion > नणंद- भावजयीने केला मराठी थाट! इशा अंबानीचा पैठणी लेहेंगा, तर नवरी राधिकाचा नथीचा नखरा

नणंद- भावजयीने केला मराठी थाट! इशा अंबानीचा पैठणी लेहेंगा, तर नवरी राधिकाचा नथीचा नखरा

Anant Ambani- Radhika Merchant Wedding Ceremony: अनंत अंबानी, राधिका मर्चंट यांच्या लग्नानिमित्त होत असणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये मराठी दागिने आणि पैठणीची झलक दिसून आली. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2024 05:18 PM2024-07-09T17:18:03+5:302024-07-09T18:03:53+5:30

Anant Ambani- Radhika Merchant Wedding Ceremony: अनंत अंबानी, राधिका मर्चंट यांच्या लग्नानिमित्त होत असणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये मराठी दागिने आणि पैठणीची झलक दिसून आली. 

anant ambani radhika wedding ceremony, isha ambani wore paithani lehenga, radhika merchant wore nath for prewedding functions | नणंद- भावजयीने केला मराठी थाट! इशा अंबानीचा पैठणी लेहेंगा, तर नवरी राधिकाचा नथीचा नखरा

नणंद- भावजयीने केला मराठी थाट! इशा अंबानीचा पैठणी लेहेंगा, तर नवरी राधिकाचा नथीचा नखरा

Highlightsदोन गोष्टींनी मराठी लोकांंचं लक्ष सगळ्यात जास्त वेधून घेतलं. त्या म्हणजे नवरी राधिका (Radhika Merchant) हिने घातलेली सुंदर नथ आणि इशा अंबानीने घातलेला पैठणीचा घागरा...

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा म्हणजे अनंत अंबानी. अनंत आणि राधिका मर्चंट यांचं लग्न १२ जुलै रोजी होत आहे. त्यामुळे आता त्यांच्या लग्नाच्या आधीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना अतिशय थाटामाटात आणि सेलिब्रिटी मंडळींच्या उपस्थितीत सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमांना तर अंबानी परिवारातील सगळ्याच स्त्रियांचे तसेच येणाऱ्या सर्वच अतिथी महिलांचे कपडे, दागिने पाहण्यासारखे आहेत (Anant Ambani- Radhika Merchant Wedding Ceremony). पण त्यातही दोन गोष्टींनी मराठी लोकांंचं सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतलं. त्या दोन गोष्टींपैकी पहिली गोष्ट म्हणजे नवरी राधिका (Radhika Merchant) हिने घातलेली सुंदर नथ आणि तिच्या नणंदबाई म्हणजेच इशा अंबानीने (Isha Ambani) घातलेला पैठणीचा घागरा...

 

अंबानी कुटूंब मुळचे गुजरातचे. त्यामुळे अनंत- राधिकाच्या लग्नानिमित्त अंबानी कुटूंबाकडून गरबा नाईटचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला बॉलीवूडच्या कित्येक सेलिब्रिटींनी पारंपरिक पेहराव करून हजेरी लावली.

करण जोहरच नाही तर इलियाना डीक्रूजलाही छळणारा 'बॉडी डिसमॉर्फिया' हा आजार नेमका काय? लक्षणं काय सांगतात..

पण त्यापेक्षाही सगळ्यात जास्त भाव खाऊन गेली ती पैठणीचा लेहेंगा घातलेली इशा अंबानी. तिच्या त्या सिल्कच्या लेहेंग्यावर लोटस पैठणीवर असतात तशी मोठी मोठी भरगच्च फुलं होती आणि त्यावर चंदेरी जरीकाम केलेले होते. हा लेहेंगा तिने गुलाबी रंगाच्या ब्लाऊज आणि ओढणीसोबत मॅच केला होता. ब्लाऊज आणि ओढणी या दोन्हींवरही भरगच्च स्टोनवर्क केलेले होते. 

दांडिया नाईट्सच्या आधी मर्चंट कुटूंबातर्फे विवाह सोहळ्यापुर्वीचा ग्रहशांती विधी करण्यात आला. या सोहळ्यासाठी राधिकाने मोतिया रंगाची सुंदर साडी नेसली होती.

दमट पावसाळी हवेमुळे घरात कुबट, कोंदट वास येतो? ५ रोपं घरात ठेवा, घर वाटेल फ्रेश- सुगंधी

या साडीवर तिने काही मोजके दागिने घातले होते, त्यापैकी एक होती ठसकेबाज नथ. मळवट भरलेली नवरी राधिका नथ घालून खरोखरच सुंदर दिसत होती. एकंदरीतच काय की नणंद- भावजय या दोघींनीही पैठणी, नथ घालून मराठी मनं जिंकून घेतली. 

 

Web Title: anant ambani radhika wedding ceremony, isha ambani wore paithani lehenga, radhika merchant wore nath for prewedding functions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.