ऑफीस , फॉर्मल कार्यक्रम अशा प्रसंगी पांढर्या रंगाचे कपडे नक्कीच शोभून दिसतात. पांढरे कपडे घातले की व्यक्तिमत्व वेगळेच आकर्षक दिसते. स्वच्छ, सोज्वळ आणि स्टायलिश दिसण्याचा तो सोपा मार्ग आहे. (Always do 3 things while wearing white clothes, otherwise the clothes will look transparent, )पण उन्हात घामामुळे आणि लाईटमुळे पांढरे कपडे पारदर्शक दिसतात. त्यामुळे महिला असे कपडे वापरणे टाळतात. शिवाय ते खराब झाले की रंग बदलतो. काखेत पिवळे होतात. कॉलरजवळही पिवळे होतात. रंग फिकट होतो. त्यामुळे आत्मविश्वास कमी होतो आणि आरामदायी वाटत नाही. पण काही सोप्या टिप्स लक्षात ठेवा, तर तुम्ही पांढर्या कपड्यांत दिवसभर फ्रेश आणि निश्चिंत राहू शकता.
सर्वप्रथम, योग्य फॅब्रिकची निवड महत्त्वाची आहे. पांढऱ्या कपड्यांसाठी कॉटन, लिनन किंवा जाड कापडाचे मिश्रण असलेले फॅब्रिक वापरा. पातळ सिंथेटिक किंवा जॉर्जेटसारखे पारदर्शक कपडे उन्हात अधिक ट्रान्सपरंट दिसतात, त्यामुळे ते टाळा.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इनरवेअरची निवड. पांढर्या कपड्यांखाली नेहमी स्किन टोनचे इनरवेअर वापरा. ते्यातही जर कॉन्फीडन्ट वाटत नसेल तर पांढऱ्या रंगाचे इनर्स वापरा. मात्र पांढरे इनरवेअर उलट उठून दिसतात, पण स्किन कलरचे कपड्यांमधून दिसत नाहीत. दोन्ही पर्याय ट्राय करुन पाहा. घाम शोषणाऱ्या फॅब्रिकचे कपडे घाला. काही कपडे स्वेट अॅबसॉर्विंग किंवा ड्राय फिट मटेरियलमध्ये मिळतात, जे घाम शोषून घेतात आणि कपड्याला ओलसरपणा दिसू देत नाहीत.
उन्हात बाहेर पडण्याआधी अंडरआर्म प्रोटेक्शन पॅड्स वापरल्यास घामामुळे डाग पडत नाहीत. हे पॅड्स कपड्यांच्या आत चिकटवता येतात आणि दिसतही नाहीत. कपडे धुताना थोडं व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा पाण्यात घालून धुतले, तर पांढरे कपडे ताजेतवाने आणि चमकदार राहतात. त्यामुळे घामाचा वासही कमी होतो.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, लेअर्सचा वापर करा. जर ड्रेस पातळ असेल तर आत स्लिप, लाइनिंग किंवा कॅमिसोल घाला. त्यामुळे कपडे ट्रान्सपरंट दिसत नाहीत आणि उन्हातही आत्मविश्वास टिकतो. या छोट्या पण उपयुक्त टिप्समुळे पांढरे कपडे केवळ सुंदर दिसणार नाहीत, तर दिवसभर आरामदायीही वाटतील. म्हणून पुढच्या वेळी पांढरा ड्रेस, शर्ट किंवा कुर्ता घालताना ही काळजी घ्या आणि आत्मविश्वासाने तुमची स्टाईल जपा.
Web Summary : Love white clothes? Choose the right fabric (cotton, linen), wear skin-toned innerwear or white inners and consider sweat-absorbing fabrics. Use underarm pads and wash with vinegar/baking soda. Layering ensures confidence and style. Enjoy white outfits without transparency worries!
Web Summary : सफेद कपड़े पसंद हैं? सही कपड़े (कॉटन, लिनन) चुनें, त्वचा के रंग के इनरवियर पहनें या सफेद इनर्स चुनें और पसीना सोखने वाले कपड़े देखें। अंडरआर्म पैड का उपयोग करें और सिरका/बेकिंग सोडा से धोएं। लेयरिंग आत्मविश्वास और शैली सुनिश्चित करती है। पारदर्शिता की चिंता किए बिना सफेद पोशाकों का आनंद लें!