बॉलीवूडच्या स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक म्हणजे आलिया भट (Alia Bhatt). आता हीच आलिया जेव्हा रेखासारख्या जनसामान्यांच्या मनामध्ये घर करून बसलेल्या अभिनेत्रीचा लूक रिक्रिएट करते, तेव्हा त्याची चर्चा तर होणारच.. रेखाची प्रमुख भुमिका असणारा उमराव जान (Umrao Jaan) हा चित्रपट नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि नॅशनल फिल्म अर्काव्ह ऑफ इंडिया यांच्यावतीने नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन अंतर्गत सहभागी करण्यात आला. त्यामुळे या चित्रपटाचा जो स्क्रिनिंग सोहळा झाला त्याला रेखासह चित्रपट सृष्टीतल्या अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. या सोहळ्यासाठी रेखाने उमराव जानचा लूक तर रिक्रिएट केलाच होता, पण त्यासोबतच आलिया भटनेही रेखाचा सिलसिला (Silsila) चित्रपटातील लूक रिक्रिएट केला होता. या तिच्या लूकची जबरदस्त चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
१९८१ साली आलेल्या सिलसिला या चित्रपटात रेखा, अमिताभ बच्चन, जया बच्चन यांच्या प्रमुख भुमिका होत्या. त्यासोबतच रेखा आणि अमिताभ यांनी एकत्र केलेला शेवटचा चित्रपट म्हणूनही सिलसिला ओळखला जातो.
या चित्रपटातल्या एका प्रसंगामध्ये रेखाने जसा लूक केला होता अगदी तसाच हुबेहुब लूक करून आलिया स्क्रिनिंग सोहळ्याला आली आणि तिला बघताक्षणीच अनेकांना थेट रेखाची आठवण आली. रिया कपूर हिने आलियाचा हा लूक करून दिला होता. या लूकमध्ये आलियाने रेखासारखेच बेबी पिंक रंगाचे हाय नेक कॉलर ब्लाऊज घातले होते. ब्लाऊजचा लूक अतिशय डिसेंट असल्याने त्याचे डिझाईन महिला वर्गात जबरदस्त व्हायरल होत आहे.
असं एखादं ब्लाऊज आपल्या कलेक्शनमध्ये असायला हवं असं अनेकींना वाटत आहे. कोणत्याही पार्टीवेअर साडीसाठी तुम्ही ते ब्लाऊज घालू शकता.
पाठीवर सारखे फोडं, पुरळ येऊन त्यांना खाज येते? बघा त्यामागची कारणं आणि ३ सोपे उपाय
एवढंच नाही तर तशा पद्धतीचं ब्लाऊज जर तुम्ही एखाद्या कॉटन साडीवर जर घातलं तर ते तुम्हाला ऑफिससाठीही अगदी परफेक्ट लूक देऊ शकतं. शिवाय ज्या महिला अगदी स्लिम आहेत त्यांना तर ते छान दिसेलच पण तब्येतीने ज्या थोड्या जाड आहेत, त्यांनाही ते खूप सुंदर दिसू शकतं. अशा पद्धतीचं ब्लाऊज शिवून एकदा ट्राय करून पाहायला हरकत नाही.