Join us

आलिया भटचा मराठी नखरा! नऊवारी पैठणी आणि ६ लाखांचे ठसठशीत कानातले- फोटो व्हायरल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2025 19:46 IST

Alia Bhatt's Stunning Look In Traditional Maharashtrian 9 Yards Paithani Saree: अभिनेत्री आलिया भटलाही पैठणी आणि नऊवारी नेसण्याचा मोह आवरला नाही. म्हणूनच वेव्ज २०२५ (WAVES 2025) कार्यक्रमात ती पैठणी नेसून आली..(Alia Bhatt's emrald earrings costs 6 lakhs)

ठळक मुद्देपाचूचे हिरवे कानातले, हिरवी टिकली, केसांचा मधोमध भांग पाडून घातलेला घट्ट आंबाडा, पैठणीवर घेतलेला केशरी- गुलाबी रंगाचा शेला अशा थाटातली आलिया अनेकांना आवडून गेली. 

मराठी सण, मराठी परंपरा, मराठी खाद्यसंस्कृती आणि महाराष्ट्राची पैठणी या सगळ्याच गोष्टी अमराठी माणसांना खुणावत असतात. त्यातही नऊवारी हा महाराष्ट्राचा पारंपरिक पोषाख. ही नऊवारी जर अस्सल पैठणी असेल तर मग तिचा थाट आणि तोरा काही पाहायलाच नको.. पैठणी सहावार साडी असते तरी एखादी तरी नऊवार पैठणी आपल्या कलेक्शनमध्ये असावी आणि नथ, ठुशी अशा पारंपरिक दागिन्यांसह आपण ती घालावी असं मराठी तरुणींना वाटणं अगदी साहजिक आहे.. असंच काहीसं अभिनेत्री आलिया भट हिलाही वाटलं आणि नुकत्याच पार पडलेल्या वेव्ज २०२५ (WAVES 2025) कार्यक्रमात ती नऊवार पैठणी नेसून आली.(Alia Bhatt's Stunning Look In Traditional Maharashtrian 9 Yards Paithani Saree)

 

कशी होती आलिया भटची नऊवार पैठणी?

आलिया भटने जी नऊवार पैठणी नेसली होती ती सेलिब्रिटी फॅशन डिझायनर अबू जानी संदीप खाेसला यांनी डिझाईन केलेली होती. पीच कलर, केशरी आणि गुलाबी अशा तीन रंग छटा वापरून तयार करण्यात आलेल्या या पैठणीवर फुलाफुलांची सुंदर नक्षी होती.

इंस्टाग्रामच्या सीईओंना भलतीच आवडली श्रद्धा कपूरने खाऊ घातलेली पुरणपोळी, पहिला घास घेताच म्हणाले.....

मऊ, तलम पैठणीवर आलियाने तसेच काठपदराचे ब्लाऊन न घालता डिझायनर ब्लाऊज घालून थोडा मॉडर्न टच देण्याचा प्रयत्न केला होतो. तिच्या बेबी पिंक रंगाच्या स्लिव्हलेस ब्लाऊजवर सुंदर कुंदन वर्क, स्टोन वर्क करण्यात आलेले होते. आलियाच्या या साडीची जेवढी चर्चा झाली तेवढीच चर्चा तिच्या कानातल्यांचीही झाली.. 

 

आलियाचे ६ लाखांचे लखलखते कानातले..

पीच, केशरी आणि गुलाबी या रंगाच्या पैठणीवर आलियाने अगदी कॉन्ट्रास्ट रंगाचे म्हणजेच हिरव्या रंगाचे कानातले घातले होते.

कुंडीतल्या छोट्याशा रोपालासुद्धा लगडतील लालबुंद टोमॅटो! ३ उपाय- टोमॅटो विकत घेण्याची गरजच नाही

टाईम्स ऑफ इंडिया यांनी दिलेल्या वृत्तानुसार पाचू, मोती आणि हिरे यांनी जडवलेले तिचे कानातले तब्बल ६ लाखांचे असून ते Jewels By Dev या ब्रॅण्डच्या कलेक्शनमधले होते. पाचूचे हिरवे कानातले, हिरवी टिकली, केसांचा मधोमध भांग पाडून घातलेला घट्ट आंबाडा, पैठणीवर घेतलेला केशरी- गुलाबी रंगाचा शेला अशा थाटातली आलिया अनेकांना आवडून गेली.  

टॅग्स :फॅशनआलिया भटसाडी नेसणेस्टायलिंग टिप्सदागिने