Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Fashion > वेल्वेटच्या काळ्या साडीचे सोनेरी काठ- गळ्यात मोत्यांची माळ, बघा आलिया भटची हटके स्टाईल

वेल्वेटच्या काळ्या साडीचे सोनेरी काठ- गळ्यात मोत्यांची माळ, बघा आलिया भटची हटके स्टाईल

Alia Bhatt's Black Colour Saree: पोचर (Poacher) वेब सिरीजच्या स्क्रिनिंगदरम्यान आलियाने नेसलेली काळी साडी अतिशय लक्षवेधी ठरली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2024 09:20 IST2024-02-20T09:15:29+5:302024-02-20T09:20:01+5:30

Alia Bhatt's Black Colour Saree: पोचर (Poacher) वेब सिरीजच्या स्क्रिनिंगदरम्यान आलियाने नेसलेली काळी साडी अतिशय लक्षवेधी ठरली.

Alia Bhatt's Black colour saree for the poacher web series screening program stunned internet | वेल्वेटच्या काळ्या साडीचे सोनेरी काठ- गळ्यात मोत्यांची माळ, बघा आलिया भटची हटके स्टाईल

वेल्वेटच्या काळ्या साडीचे सोनेरी काठ- गळ्यात मोत्यांची माळ, बघा आलिया भटची हटके स्टाईल

Highlightsअशा काळ्या साडीवर कसा मेकअप करावा, यासाठी आलियाचा लूक हा एक परफेक्ट उदाहरण ठरू शकतो.

बॉलीवूडच्या ज्या काही मोस्ट स्टायलिश अभिनेत्री आहेत, त्यांच्यापैकी एक म्हणजे आलिया भट. तिची स्टाईल, तिचा फॅशन सेन्स यांची नेहमीच चर्चा होते. खासकरून ती आणि तिच्या साड्या हा विषय कायमच व्हायरल होत असतो. आलियाचं साडी प्रेम काही वेगळंच आहे. त्यामुळेच तर महत्त्वाच्या प्रसंगी नेसण्यासाठी ती ज्या कोणत्या साड्यांची निवड करते, त्या साड्या अतिशय आकर्षक असतात. म्हणूनच तर तिच्या साडी चॉईसचंही नेहमीच कौतूक केलं जातं. आता हेच पाहा ना पोचर (Poacher) या वेबसिरीजच्या स्क्रिनिंगप्रसंगी आलियाने काळ्या रंगाची वेल्वेटची साडी नेसली होती (Alia Bhatt's Black colour saree). या सुंदर साडीवरचे तिचे देखणे फोटो सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

 

कशी आहे आलिया भटची काळी साडी?

आलिया भटने नेसलेली वेल्वेटची काळी साडी सब्यासाची यांच्या कलेक्शनची असून वेल्वेट आणि नेट असं दोनहींचं कॉम्बिनेशन या साडीमध्ये दिसून येतं. साडीचा पदर वेल्वेटचा असून साडीच्या निऱ्यांचा भाग हा नेटचा आहे. या

मुलं सारखं मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसतात? ५ टिप्स- मुलांचं मोबाईलचं व्यसन होईल कमी

प्लेन काळ्या साडीला सोनेरी रंगाची नाजूक बॉर्डर असून त्या बॉर्डरवर गोल्डन रंगाचे खडे तसेच सेक्विन वर्क करून साडीला एकदम क्लासी लूक देण्यात आला आहे. आलियाने त्या साडीवर काळ्या रंगाचं वेल्वेटचं स्लिव्हलेस ब्लाऊज घातलं होतं. एखाद्या पार्टीसाठी, लग्नसमारंभासाठी, रिसेप्शनसाठी आलियाचा हा लूक एकदम परफेक्ट आहे.

 

आलियाने या काळ्या रंगाच्या साडीवर मोत्यांचे दागिने घातले होते. तिने गळ्यात घातलेलं मोत्यांचं चोकर जवळपास ७ ते ८ पदरी होतं. त्यामुळे आलियाच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली होती.

मांड्या खूपच जाडजूड दिसतात- हिप्स फॅट पण वाढले? शिल्पा शेट्टी सांगतेय १ सोपा व्यायाम 

या साडीवर  आलियाने मॅट फिनिशिंग असलेली क्लासिक रेड रंगाची लिपस्टिक लावली होती, पण बाकीचा मेकअप अतिशय स्टेबल केला होता. तिचा आय मेकअपही अजिबात भडक नव्हता. त्यामुळे एकंदरीतच अशा काळ्या साडीवर कसा मेकअप करावा, यासाठी आलियाचा लूक हा एक परफेक्ट उदाहरण ठरू शकतो. केसांचा मेसीबन घातलेली आलिया खरोखरच अतिशय देखणी दिसत होती. 

 

Web Title: Alia Bhatt's Black colour saree for the poacher web series screening program stunned internet