lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fashion > निळ्याशार साडीवर चमचमती फुलपाखरं! बघा क्रिती सेननचा झगमगता फेस्टिव्ह लूक, साडी इतकी सुंदर की.....

निळ्याशार साडीवर चमचमती फुलपाखरं! बघा क्रिती सेननचा झगमगता फेस्टिव्ह लूक, साडी इतकी सुंदर की.....

Actress Kriti Sanon's Festive Look In Sequin Blue Saree: अभिनेत्री क्रिती सेनन हिचा सुंदर निळ्याशार साडीतला हा झगमगता लूक एकदा पाहूनच घ्या....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2023 12:18 PM2023-11-08T12:18:27+5:302023-11-08T12:20:16+5:30

Actress Kriti Sanon's Festive Look In Sequin Blue Saree: अभिनेत्री क्रिती सेनन हिचा सुंदर निळ्याशार साडीतला हा झगमगता लूक एकदा पाहूनच घ्या....

Actress Kriti Sanon's hot stunning festive look in blue saree designed by Manish Malhotra | निळ्याशार साडीवर चमचमती फुलपाखरं! बघा क्रिती सेननचा झगमगता फेस्टिव्ह लूक, साडी इतकी सुंदर की.....

निळ्याशार साडीवर चमचमती फुलपाखरं! बघा क्रिती सेननचा झगमगता फेस्टिव्ह लूक, साडी इतकी सुंदर की.....

Highlightsदिवाळीच्या निमित्ताने तुम्हालाही अशी चमचमती सेक्विन वर्क असणारी शिमरी साडी घ्यायची असेल तर त्यावर कसा मेकअप करावा आणि कोणत्या ॲक्सेसरीज घालाव्या, यासाठी क्रितीचे हे फोटो फॉलो करायला हरकत नाही.

अगदी एक- दोन दिवसांवर दिवाळसण (Diwali 2023) आला आहे. त्यामुळे अगदी लहान शहरांतल्या बाजारपेठांपासून ते बॉलीवूड सेलेब्रिटींच्या पार्ट्यांपर्यंत सगळ्याच ठिकाणी आता फेस्टिव्ह वाईब्स दिसायला सुरुवात झाली आहे. अशातच अभिनेत्री क्रिती सेनन हिने तिचे सुंदर निळ्याशार साडीतले काही फोटो साेशल मिडियावर शेअर केले असून त्या चमचमत्या साडीतल्या फोटोंनी तर तिच्या चाहत्यांसाठी परफेक्ट दिवाळी माहोल तयार केला आहे (Actress Kriti Sanon's hot stunning festive look). तिची ती सुंदर साडी (Sequin Blue Saree) सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा (Manish Malhotra) यांनी डिझाईन केली असून त्या साडीवर अनेक लहान- मोठ्या आकाराची चमकदार फुलपाखरं आहेत. 

 

नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने क्रिती सेनन सध्या प्रचंड चर्चेत आहे. यानिमित्ताने तिच्या अभिनयाची चर्चा तर होतेच आहे, पण तिच्या जबरदस्त फॅशन सेन्सबद्दलही तिला नेहमीच वाखाणले जाते.

पार्लरमध्ये जायला वेळच नाही? फक्त १० रुपयांत घरच्याघरी करा फेशियल, गोल्ड फेशियलसारखा चमकेल चेहरा

आता पुन्हा एकदा ती तिच्या या एकदम हटके स्टाईलमुळेच चर्चेत आली आहे. तिने नेसलेल्या चमकदार निळ्या रंगाच्या साडीवर भरगच्च सेक्विन वर्कदेखील केलेले आहे. त्यामुळे साडीला एक वेगळाच ग्लेझ आला असून त्यावर तिने बोल्ड मेकअप केला आहे. त्यामुळे एकंदरीतच क्रितीने पुन्हा एकदा या लूकमुळे तिच्या चाहत्यांची मने जिंकून घेतली आहेत. "Blue Butterfly for life". असं कॅप्शन तिने तिच्या त्या फोटोंना दिलं आहे. 

 

दिवाळीच्या निमित्ताने तुम्हालाही अशी चमचमती सेक्विन वर्क असणारी शिमरी साडी घ्यायची असेल तर त्यावर कसा मेकअप करावा आणि कोणत्या ॲक्सेसरीज घालाव्या, यासाठी क्रितीचे हे फोटो फॉलो करायला हरकत नाही.

जुही परमारची खास रेसिपी- फक्त ४ पदार्थ वापरून दिवाळीसाठी करा इंस्टंट रेसिपी- कुछ मिठा हो जाये...

साडीचाच झगमगाट जास्त असल्याने क्रितीने मेकअप आणि ज्वेलरी या दोन्ही गोष्टी सोबर ठेवल्या आहेत आणि तिचा लूक बॅलेन्स केला आहे. 

 

Web Title: Actress Kriti Sanon's hot stunning festive look in blue saree designed by Manish Malhotra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.