Join us

कप ब्रा लवकर खराब होवू नयेत म्हणून ५ टिप्स, महागड्या ब्रा टिकतील जास्त दिवस...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2023 15:46 IST

How To Wash & Preserve Cups Bras : कप्स ब्रा जास्त काळ टिकण्यासाठी त्यांची काळजी कशी घ्यावी आणि त्या धुण्याची योग्य पद्धत समजून घेऊयात.

ब्रा ही महिलांच्या आयुष्यातील महत्वाची आणि गरजेची वस्तू आहे. ब्रा ही महिलांच्या आयुष्यासाठी जितकी महत्वाची आहे तेवढीच ती तुमचा लूक सुद्धा बदलू शकते. एखाद्या ड्रेसखाली योग्य ब्रा नसेल तर यामुळे तुमचा लूक खराब दिसू शकतो. आपल्यापैकी कित्येक महिला व मुली कप ब्रा (Cup Bra) चा जास्त वापर करतात. कप ब्रा या नेहमीच्या ब्रा पेक्षा थोड्या महाग मिळतात म्हणून त्या जास्त काळ टिकाव्यात असं प्रत्येक महिलेला वाटत. ब्रा ची काळजी घेण्यासाठी ती धुण्याची पद्धत योग्य असायलाच हवी. जर आपण योग्य पद्धतीने कप्स ब्रा ची काळजी घेतली तर त्या जास्त काळ टिकू शकतात. कप्स ब्रा जास्त काळ टिकण्यासाठी त्यांची काळजी कशी घ्यावी आणि त्या धुण्याची योग्य पद्धत समजून घेऊयात(How To Wash & Preserve Cups Bras).

कप ब्रा ची काळजी कशी घ्यावी ? 

१. कप ब्रा चे कप्स एकमेकांत फोल्ड करून ठेवू नयेत - कप ब्रा कपाटांत ठेवताना त्यांना जागा जास्त लागते. त्यामुळे काहीजणीं या कप ब्रा चे कप्स एकमेकांच्या वर ठेवून दुमडून ते घडी करून ठेवतात. असे केल्याने या कप ब्रा चे कप्स लवकर खराब होण्याची शक्यता असते. या ब्रा दुमडून घडी केल्यामुळे कप्सना घडी पडून अशा ब्रा चा शेप बिघडू शकतो. मग पुढच्यावेळी या ब्र चा वापर करताना त्यांच्या शेप बिघडल्यामुळे तुमचा पूर्ण लूक बदलू शकतो. 

२. योग्य पद्धतीने ठेवा - कप्स ब्रा ठेवताना त्या कपाटांत किंवा कपड्यांच्या खणात योग्य पद्धतीने ठेवा. शक्यतो या कप ब्रा ठेवताना त्या कुठूनही फोल्ड न होता व्यवस्थित आहे तशाच राहतील याची खबरदारी घ्या. या ब्रा एका मोठ्या खणात किंवा बॉक्समध्ये संपूर्ण राहू शकतील असे बघा. या ब्रा कपड्यांच्या खणात किंवा बॉक्समध्ये कोंबून भरू नका. यामुळे ते कप्स खराब होण्याची शक्यता असते. 

३. कप्स ब्रा गरम पाण्यात धुवू नका - नेहमी स्वच्छ धुतलेलीच ब्रा वापरण्याला प्राधान्य द्यावे. कप्स ब्रा धुताना इतर ब्रा पेक्षा त्यांची वेगळी काळजी घ्यावी लागते. कप्स ब्रा धुताना कोमट पाण्याचा वापर करावा. एकदम गरम पाण्यात कप्स ब्रा धुणे टाळावे. 

४. कप्स ब्रा जास्त काळ टिकविण्यासाठी - आपल्या डेलिकेट कप्स ब्रा ला जर लॉंग लाईफ द्यायचं असेल तर तुम्हांला नेहमच्या ब्रा पेक्षा वेगळी आणि रॅपिंग बॅगमध्ये ब्रा ठेवावी लागते. ज्यामुळे त्याची डेलिकटे एम्ब्रॉयडरी फॅब्रिक खराब होणार नाही. तसंच तुम्ही या ब्रा व्यवस्थित रॅप करून आणि फोल्डिंगशिवाय ठेवून द्या. असे केल्यास आपल्या कप्स ब्रा जास्त काळ टिकतील. स्वेटर्स आणि शर्टप्रमाणे ब्रा हँगरवर लटकवू नका. असे केल्यामुळे इलास्टिक सैल होण्याची शक्यता असते.

५.  वॉशिंग मशीनमध्ये धुवू नका - कप्स ब्रा धुण्यासाठी केवळ हातांचाच उपयोग करावा. वॉशिंग मशीनमध्ये कप्स ब्रा धुवू नका. जर धुवायचीच असेल तर त्यासाठी तुम्ही लिंगरी बॅगचा वापर करा. तसंच वॉशिंग मशीन डेलिकेट मोडवर आहे की नाही हे तपासून घ्या. ब्रा धुण्यासाठी हार्श डिटर्जंटचा वापर टाळा. ड्रायरमध्ये सुकवू नका. तसंच अगदी उन्हाखाली सुकवू नका. जिथे व्यवस्थित हवा येत असेल अशा ठिकाणी सावलीत ब्रा सुकवून घ्या. 

कप ब्रा धुण्याची योग्य पद्धत:- 

कप ब्रा धुताना खाली दिलेल्या विशेष पद्धतीने धुणे गरजेचे आहे.

१. कप ब्रा ला साबण लावण्यापेक्षा एका बादलीत पाणी घेऊन त्यात डिटर्जंट टाकावे आणि त्यात ही कप ब्रा काही वेळ ठेवावी.

२. त्यानंतर ही कपड्यांच्या ब्रशने न चोळता टूथब्रशने त्या ब्राच्या कडा आणि पातळ भाग हलक्या हाताने घासून घ्यावा. 

३. मग ती ब्रा स्वच्छ पाण्यातून धुवून काढावी.

४. कप्स ब्रा धुताना ती जोरजोरात चोळू नये, पिळू नये यामुळे कपचा आकार बदलतो आणि सुकल्यावर तो भाग आकसतो.

५. कप ब्रा हलक्या हातांना पाण्यातून बुडवून काढावी त्यानंतर ती न पिळता एका सुक्या टॉवेलकर निथळू द्यावी.

६. मग दोन कपच्या मधल्या भागावर क्लिप लावून ती सुकत ठेवावी. कप ब्रा सुकवताना त्याच्या पट्ट्यांच्या साहाय्याने ती कधीच सुकवू नये. यामुळे ती फाटण्याची किंवा त्याच्या स्ट्रिप्स लूज होण्याची शक्यता असते.

७. कप ब्रा सुकल्यावर त्याच्या कप्सचा भाग न दुमडता त्याच कपमध्ये त्याचे पट्टे दुमडून ती व्यवस्थितरित्या कपाटात ठेवावी. अशा पद्धतीने तुमची कप ब्रा धुतल्यास आपल्यला कोणताही त्रास होणार नाही आणि त्वचाही चांगली राहील.

अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडीओ नक्की पाहा... 

टॅग्स :फॅशन