सध्या नवरात्र सुरू आहे. त्यामुळे महिलांमध्ये विशेष लगबग आणि उत्साह आहे. महिलांसाठी नवरात्रीचे एक आकर्षण म्हणजे नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे रंग. या रंगानुसार मग ड्रेस घातला जातो, साडी नेसली जाते. सध्या बऱ्याच जणी फेस्टीव्ह मूडमध्ये असल्याने साडी नेसण्यास प्राधान्य देतात. पण नेमकी अशी अडचण येते की साडीवर मॅचिंग ब्लाऊजच नसतं. अशावेळी ही ट्रिक तुम्हाला खूप उपयोगी येऊ शकते. अगदी मोजके ५ रंगाचे ब्लाऊज तुमच्या कलेक्शनमध्ये असू द्या (how to match saree and blouse colour combinations). त्या ब्लाऊजवर तुम्ही वेगवेगळ्या रंगाच्या कित्येक साड्या अगदी उत्तम पद्धतीने नेसू शकता.(Perfect Colour Combinations For Saree And Blouse)
प्रत्येक महिलेकडे असायलाच हवे ५ रंगांचे ब्लाऊज
१. लाल
जर तुमच्याकडे लाल रंगाचं ब्लाऊज असेल तर त्यावर तुम्ही गोल्डन, पांढरी, मोतिया, पर्पल, केशरी, पिवळा आणि काळ्या रंगाची साडी नेसू शकता. या सगळ्या रंगाच्या साड्या लाल ब्लाऊजवर छान दिसतात.
२. राणी कलर
राणी कलरचं ब्लाऊज असेल तर त्यावरही कित्येक रंगाच्या साड्या अगदी छान सूट होतात. राणी कलरच्या ब्लाऊजवर तुम्ही पिवळा, मोरपंखी, जांभळा, आकाशी, केशरी आणि काळ्या रंगाची साडी नेसू शकता.
३. पिवळा
पिवळ्या रंगाचं ब्लाऊजही आपल्या कलेक्शनमध्ये असायलाच हवं. कारण त्यावरही तुम्ही कित्येक रंगाच्या साड्या नेसू शकता. पिवळ्या रंगाच्या ब्लाऊजवर ऑफ व्हाईट, डार्क पीच, पिस्ता, हिरवा आणि पर्पल रंगाच्या साड्या नेसू शकता.
४. हिरवा
हिरव्या रंगाचं सिल्कचं किंवा ब्रोकेटचं एक तरी ब्लाऊज तुमच्याकडे नेहमी असू द्या. कारण हिरव्या रंगाच्या ब्लाऊजवरही अनेक रंगाच्या साड्या उठून दिसतात. लाल, पिवळा, बेज, गुलाबी, मरून अशा रंगांच्या वेगवेगळ्या साड्या तुम्ही हिरव्या ब्लाऊजवर नेसू शकता.
५. काळा
काळ्या रंगाचं ब्लाऊज अनेकजणींना खूप आवडतं आणि ते खरोखरच अतिशय स्टायलिश लूक देतं. काळ्या रंगाच्या ब्लाऊजवर बेज कलर, पांढरा, मोतिया, सोनेरी, लाल, ग्रे अशा रंगाच्या साड्या स्टायलिश दिसतात.