Join us

उन्हाळ्यात जीन्स नको वाटते ? ४ टिप्स - करा परफेक्ट निवड - घामाचा त्रास नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2025 19:02 IST

Fashion How To Pick Perfect Jeans For Summer : Tips on How to Pick the Right Summer Jeans : Cool Jeans For Summer & Essential Styling Tips : 4 Tips on Choosing Jeans for the Summer : उन्हाळ्यात जीन्स घालून उकाड्याने हैराण होऊ नये म्हणून या टिप्स...

स्त्री असो किंवा पुरुष जीन्स हे सगळ्यांचेच अगदी आवडते आणि कम्फर्टेबल आऊटफिट असते. आपल्यापैकी काहीजण असे असतात की जे ऋतू कोणताही असो, पण वर्षाचे बाराही (How To Pick Perfect Jeans For Summer) महिने जीन्स घालू शकतात. एरवी जीन्स घालणे अगदी सोयीचे असते, पण उन्हाळ्यात जीन्स नकोशी वाटते. जीन्सचे (Tips on How to Pick the Right Summer Jeans) कापड हे इतर कापडांच्या तुलनेत थोडे (Cool Jeans For Summer & Essential Styling Tips) जाड असते. उन्हाळ्यात अशी जाड कापडाची जीन्स घातल्याने काहीवेळा आपल्याला अवघडल्यासारखे होते, सोबतच अनेक समस्या देखील सतावतात( 4 Tips on Choosing Jeans for the Summer).

उन्हाळ्यात जीन्स घातल्याने त्याचे कापड जाड असल्याने घाम व्यवस्थित शोषला जात नाही. तसेच यामुळे घाम साचून राहून स्किन अ‍ॅलर्जी, रॅशेज, त्वचा लालसर होणे, पुरळ येणे अशा अनेक समस्या त्रासदायक ठरतात. यामुळेच आपल्यापैकी काहीजणी उन्हाळ्यात जीन्स घालणेच सोडून देतात. परंतु जर तुम्हाला या कडाक्याच्या उन्हाळ्यात जीन्स घालायचीच असेल तर, काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. याचबरोबर, जीन्स या अनेक प्रकारच्या कापडांपासून तयार केल्या जातात. तेव्हा उन्हाळ्यात जीन्स घालायची असेल तर नेमकी कोणत्या प्रकारची आणि कशी जीन्स विकत घ्यावी याच्या काही टिप्स पाहूयात. 

उन्हाळ्यात जीन्स घालायची तर या गोष्टी लक्षात ठेवा... 

१. योग्य फॅब्रिकची निवड करा :-फॅशन डिझायनर भावना जिंदाल यांच्या म्हणण्यानुसार, बहुतेक जीन्स या डेनिम कापडापासून तयार करतात.डेनिम हा कापडाचा एक असा प्रकार आहे ज्यामध्ये लोकर देखील मिसळले जाते. जीन्स स्ट्रेचेबल बनवण्यासाठी, त्यात स्पॅन्डेक्स किंवा इलास्टेन नावाचा सिंथेटिक धागा जोडला जातो, म्हणूनच या फॅब्रिकमुळे उन्हाळ्यात जीन्स घालणे कठीण होते. उन्हाळ्यात फक्त १००% कॉटन डेनिम जीन्स घाला. कॉटनच्या कापडाची जीन्स उन्हाळ्यात वापरण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. कॉटन कापडामधून आपली त्वचा योग्य पद्धतीने श्वास घेऊ शकते, ज्यामुळे आपल्याला फारसे गरम होत नाही. उन्हाळ्यात हे कापड शरीराला थंड ठेवते. कॉटन डेनिम जीन्स या वजनाने देखील हलक्या असतात. 

ऑफिसला साडी नेसता, पाहा ब्लाऊजच्या गळ्यांचे ७ डिझाइन्स, असे शिवा दिसाल प्रोफेशनल स्टायलिश!

२. सैल फिटिंगची जीन्स घाला :- उन्हाळ्यात जीन्स घालण्यासाठी अशी जीन्स निवडा जी फिटिंगची नसून बऱ्यापैकी सैल असेल. सैल जीन्समुळे तुमच्या त्वचेला हवा लागू शकेल तसेच त्वचा मोकळेपणाने श्वास देखील घेऊ शकेल. यामुळे रक्ताभिसरण अगदी योग्य प्रकारे होण्यास मदत होईल. उन्हाळ्यात तुम्ही स्ट्रेट फिटिंग, फ्लेयर्ड जीन्स, साइड लूज कट्स जीन्स अशा पॅटर्नच्या जीन्स वापरणे अधिक सोयीचे ठरेल. 

लग्नासाठी खास बनारसी साडी घ्यायची आहे? पाहा बनारसीचे सध्या ट्रेडिंग असलेले रंग, बनारसीचा थाटमाट खास!

३. फिकट रंगाची निवड करा :- उन्हाळ्यात जीन्स घालण्यासाठी जीन्सचा रंग कायम फिकट असावा. या ऋतूत शक्यतो डार्क रंगाच्या जीन्स घालणे टाळावे.डार्क नेव्ही ब्लू किंवा काळ्या रंगाची जीन्स चुकूनही घालू नये. डार्क रंग उष्णता फार मोठ्या प्रमाणांत शोषून घेतात. यासाठीच, उन्हाळ्यात हलक्या निळ्या, पांढर्‍या किंवा क्रीम कलरच्या जीन्स घाला. यामुळे तुमचे व्यक्तिमत्व चांगले दिसते आणि वाढत्या तापमानामुळे कोणतीही समस्या उद्भवत नाही. 

बॅकलेस ब्लाऊजच्या वेगवेगळ्या पॅटर्ननुसार कोणती ब्रा घालावी ? निवडा योग्य ब्रा - दिसा स्टायलिश आणि कॉन्फिडंट...

४. उन्हाळ्यात जीन्स घालणार असाल तर :- उन्हाळ्यात जीन्स घालून स्टायलिश - फॅशनेबल दिसण्यासाठी तुम्ही टॉप आणि चपलांच्या प्रकारचे पेअरिंग करु शकता. नेहमी कॉटन डेनिम जीन्स, शर्टसोबत घाला. शर्ट सैलच घालावा त्यामुळे तुम्हाला जीन्स घालूनही गरम होत नाही. कॉटनच्या किंवा तागाच्या कापडापासून तयार झालेल्या टॉपची निवड करावी. त्याचबरोबर पायांत सँडल, लोफर्स किंवा स्नीकर्स घाला. या टिप्स फॉलो केल्याने तुम्ही कडाक्याच्या उन्हाळ्यात देखील जीन्स घालून अगदी कुल दिसू शकता.

टॅग्स :फॅशनस्टायलिंग टिप्ससमर स्पेशल