Join us

महागामोलाच्या जरीच्या साड्यांचा काठ काळा पडू नये म्हणून ४ चुका टाळा, सुंदर-सोनेरी काठ राहील वर्षानुवर्षे तसाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2024 19:08 IST

4 Secrets To Prevent Zari From Turning Black : 4 ways To Ensure That Your Zari/Embroidered Sari Doesn't Get Oxidised : The Care & Maintenance Of Zari Adorned Fabrics : सोनेरी - चमचमता जरीच्या साड्यांचा काठ काळा पडू म्हणून या खास टिप्स....

सुंदर, आकर्षक दिसणाऱ्या जरीच्या साड्या म्हणजे प्रत्येक स्त्रिच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय. वेगवेगळ्या प्रकारच्या जरीचा काठ असणाऱ्या अनेक साड्या प्रत्येकीच्या वॉर्डरोबमध्ये कायम असतात. या जरीच्या साड्यांची सुंदरता किंवा तिचा लूक हा संपूर्णपणे त्या जरीच्या काठावरच असतो. जरीच्या साडीचा काठ जितका भारी तितकीच ती साडी देखील भारी असे मानले जाते. अशा साड्यांना आकर्षक, नाजूक जरीचा काठ असल्यामुळेच या साड्या इतर साड्यांपेक्षा चारचौघीत अगदी भाव खाऊन जातात. जरीचा काठ असणाऱ्या साड्या तुलनेने इतर साड्यांपेक्षा थोड्या महागच असतात. त्यामुळे अशा जरीचा काठ असणाऱ्या साड्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. अशा साड्यांची योग्य प्रकारे काळजी घेतली नाही तर या जरीच्या साडीच्या काठाचा सोनेरी चमकता रंग बदलून काळा पडतो( 4 ways To Ensure That Your Zari/Embroidered Sari Doesn't Get Oxidised).

काहीवेळा आपण नकळतपणे अशा काही चुका करतो की ज्यामुळे या साड्यांचा काठ काळा पडतो. अशा जरीच्या साड्यांचा काठ काळा पडला की या साड्यांची सुंदरता कमी होते असे म्हणायला हरकत नाही. जरीचा काठ असणाऱ्या साड्यांची योग्य वेळीच विशेष काळजी घेतली तर त्यांचे काठ काळे न पडता वर्षानुवर्षे आहेत तसेच अगदी सोनेरी चमचमते राहतात. जर तुमच्याकडे देखील जरीचा काठ असणाऱ्या साड्या असतील आणि त्यांचा काठ काळा पडू नये यासाठी नेमकी कोणती काळजी घ्यावी ते पाहूयात(4 Secrets To Prevent Zari From Turning Black).

जरीच्या साड्यांचा काठ काळा पडू नये म्हणून ४ चुका टाळा...

१. जरीच्या साडीवर सेंट - परफ्युम, डिओ लावू नका. 

जरीच्या साड्या आपण खास प्रसंगीच नसतो. अशावेळी आपण साडी नेसल्यावर साडीवर सेंट - परफ्युम, डिओ स्प्रे करतो, परंतु हे संपूर्णपणे चुकीचे आहे. जरीच्या  साडीचा काठ काळा पडू नये यासाठी त्यावर सेंट - परफ्युम, डिओ यांसारखी सुगंधित द्रव्ये फवारु नका. जर आपल्याला  सेंट - परफ्युम, डिओ स्प्रे करायचाच असेल तर साडी नेसण्यापूर्वी स्प्रे करावा. सेंट - परफ्युम, डिओमध्ये असणाऱ्या केमिकलयुक्त रसायनांमुळे हे जरीचे काठ काळे पडण्याची शक्यता असते.   

क्रॉप टॉप घालून हात वर केले की पोट दिसतं? ही ट्रिक करा, क्रॉप टॉप घाला बिंधास्त!

२. जरीच्या साड्या स्टोअर करुन ठेवताना त्यात नॅफ्थलीनच्या गोळ्या ठेवू नका. 

शक्यतो साड्या स्टोअर करून ठेवताना त्यांना कसर लागू नये किंवा त्या व्यवस्थित स्टोअर करून ठेवण्यासाठी आपण नॅफ्थलीनच्या गोळ्यांचा वापर करतो. या पांढऱ्या नॅफ्थलीनच्या गोळ्या आपण साडी जिथे स्टोअर केली आहे त्याच्या आजूबाजूला टाकून ठेवतो. परंतु असे करणे चुकीचे आहे. या नॅफ्थलीनच्या गोळ्यांमधील केमिकल्सचा जरीच्या काठाशी संपर्क होऊन त्या गोळ्यांमधील केमिकल्सयुक्त घटकांमुळे साडीचा काठ काळा पडू शकतो. यासाठी  जरीच्या साड्या स्टोअर करुन ठेवताना त्यात नॅफ्थलीनच्या गोळ्या ठेवू नका, नॅफ्थलीनच्या गोळ्यांऐवजी इतर नैसर्गिक पर्यायांचा वापर करावा. 

दिवाळीनिमित्त आलियाने नेसलेल्या 'त्या' साडीची खास गोष्ट! आलियाच्या विंटेज साडीची होतेय चर्चा कारणं...

कंबरेत कधी सैल तर कधी घट्ट होते जीन्स? ३ ट्रिक्स, निवडा परफेक्ट जीन्स-मापात चूक नाही...

३. जरीच्या साड्या स्टोअर करताना त्या कापडी पिशवीत किंवा पाऊचमध्येच ठेवाव्यात. 

आपण जरीच्या महागामोलाच्या साड्या शक्यतो सुटकेस किंवा हॅंगरवर लावून कपाटात ठेवतो. परंतु असे न करता जरीच्या साड्या नेहमी कापडी पिशवी किंवा पाऊचमध्येच ठेवाव्यात. एखाद्या सुती कापडात या साड्या व्यवस्थित घडी घालून मगच स्टोअर करुन ठेवाव्यात. 

४. जरीच्या साड्या स्टोअर करताना या साड्यांजवळ सिलिका पाऊच किंवा एका छोट्या पोटलीत ओवा भरून ठेवावा. 

जरीच्या साड्या आपण ज्या पाऊचमध्ये स्टोअर करणार असाल त्या पाऊचमध्ये सिलिका जेलचे छोटे पाऊच किंवा ओव्याची छोटीशी पोटली तयार करून ठेवावी. यामुळे अशा जरीच्या साड्यांचे काठ काळे न पडता वर्षनुवर्षे आहेत तसे जसेच्या तसेच राहतात. सिलिका जेल आणि ओवा वातावरणातील ओलावा शोषून घेतो आणि आजूबाजूच्या वातावरणातील आर्द्रता कमी करुन कोरडेपणा आणतो. यामुळे अशा जरीचा काठ असणाऱ्या साड्यांमध्ये ओलावा टिकून राहत नाही, परिणामी साड्यांचे काठ काळे पडत नाहीत.     

टॅग्स :फॅशनस्टायलिंग टिप्ससोशल व्हायरल