Join us

साड्या भरपूर पण मॅचिंग ब्लाऊजच नाही, सणासुदीला नेहमीची पंचाईत? ४ रंगाचे ब्लाऊज आणा, सर्व साड्यांवर मॅचिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2025 15:01 IST

How To Choose Perfect Colour Of Blouse For Saree: प्रत्येक साडीवर मॅचिंग ब्लाऊज कुठून आणावं हा प्रश्न अनेकींना पडतो. म्हणूनच पाहा त्या प्रश्नाचं हे खास उत्तर...(how to select contrast colour blouse for saree?)

ठळक मुद्देदरवेळी प्रत्येक साडीवर मॅचिंग ब्लाऊज कुठून आणावं असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर या काही टिप्स पाहा

सणासुदीचे, व्रतवैकल्यांचे दिवस आता सुरू झाले आहेत. त्यामुळे प्रत्येकवेळी काही कार्यक्रम असला की हमखास पारंपरिक वेशभुषा केलीच जाते. आता बऱ्याच जणी कधीतरीच साड्या नेसतात. त्यामुळे त्यांच्याकडे साड्या खूप कमी असतात. पण आयत्यावेळी नेसण्यासाठी आईची, बहिणीची, सासूची साडी असे अनेक पर्याय त्यांच्याकडे असतात. त्यापैकी छानशी साडी निवडली जाते, पण प्रश्न ब्लाऊजचा येतो. म्हणूनच दरवेळी प्रत्येक साडीवर मॅचिंग ब्लाऊज कुठून आणावं असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर या काही टिप्स पाहा (4 colours of blouse that goes with various colours of saree). काही विशिष्ट रंगांचे मोजके ब्लाऊज शिवून ठेवा (How To Choose Perfect Colour Of Blouse For Saree). कोणत्याही साडीवर ते अगदी परफेक्ट मॅच होऊन जातील.(how to select contrast colour blouse for saree?)

या ५ रंगांचे ब्लाऊज तुमच्याकडे असायलाच हवे..

 

१. हिरवा रंग

या रंगाचं ब्लाऊज तर तुमच्याकडे असायलाच हवं. कारण बऱ्याच साड्यांचे काठ हिरव्या रंगाचे असतात. त्यामुळे हिरव्या रंगाचं ब्लाऊज पिवळा, गुलाबी, लाल, जांभळा या साड्यांवर अगदी मस्त मॅच होऊन जातं. एवढंच नाही तर ऑफ व्हाईट किंवा मोतिया रंगाच्या साडीवरही हिरव्या रंगाचं ब्लाऊज मस्त दिसतं.

मुंग्यांनाही लावा थोडीशी टाल्कम पावडर! घरातून मुंग्यांना घालवून टाकण्यासाठी भन्नाट देसी जुगाड...

२. लाल रंग

हल्ली असा ट्रेण्ड आला आहे की बहुतांश साड्यांचे काठ लाल रंगाचेच आहेत. त्यामुळे लालसर रंगातलं एखादं ब्लाऊज तुमच्याकडे असायलाच हवं. हिरवा, पिवळा, काळा या रंगाच्या साड्या असतील तर त्यावर लाल रंगाचं कॉन्ट्रास्ट मॅच करू शकता. 

 

३. जांभळा रंग

जांभळ्या रंगाचं ब्लाऊजही खूप साड्यांवर अगदी छान उठून दिसतं. गुलाबी, मोरपंखी, पिवळी साडी असेल तर त्यावर जांभळ्या रंगाचं ब्लाऊज ट्राय करून पाहा.

श्रावणातल्या रिमझिम पावसात गरमागरम गुलगुले खाण्याची मजाच वेगळी! लाल भोपळ्याची पारंपरिक रेसिपी

४. गुलाबी रंग

गुलाबी रंगाचं ब्लाऊजही आपल्या कलेक्शनमध्ये असायलाच हवं. हिरवा, जांभळा, निळा, मोरपंखी, करडा रंग, पिस्ता रंग, पिवहा रंग अशा कित्यक साड्यांवर गुलाबी रंगाचं ब्लाऊज छान दिसतं.

 

टॅग्स :फॅशनस्टायलिंग टिप्ससाडी नेसणे