Join us  

साध्या साडीला डिझायनर लूक देण्यासाठी ३ खास टिप्स, स्वस्तातली साडी नेसूनही दिसाल मॉडर्न आणि सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2024 3:44 PM

3 Tips To Give Modern Look To Your Simple Saree: एखादी साधीच साडी असली तरी तिला वेगळ्या पद्धतीने नेसून कसा मॉडर्न, स्टायलिश लूक देता येतो ते पाहूया... (saree draping ideas to look smart and stylish)

ठळक मुद्देसाडीमध्ये स्टायलिश- स्मार्ट दिसण्यासाठी साडी महागडीच असायला पाहिजे, असं मुळीच नाही. साध्या आणि स्वस्तातल्या साडीतही तुम्ही खूप सुंदर आकर्षक दिसू शकता.

कपडे कोणतेही असले तरी ते आपण कशा पद्धतीने कॅरी करतो, याला खूप जास्त महत्त्व आहे. आपण उत्तमप्रकारे कॅरी करू शकलो, तर साधेच कपडेही स्टायलिश वाटतात. अन्यथा मग स्टायलिश कपडेही अंगावर अगदी नकोसे दिसायला लागतात. साडीचंही तसंच आहे. साडीमध्ये स्टायलिश- स्मार्ट दिसण्यासाठी साडी महागडीच असायला पाहिजे, असं मुळीच नाही (3 Tips to give modern look to your simple saree). साध्या आणि स्वस्तातल्या साडीतही तुम्ही खूप सुंदर आकर्षक दिसू शकता (How to look stylish and modern in simple saree). त्यासाठी मात्र साडी नेसण्याच्या पद्धतीमध्ये थोडे बदल करावे लागतील. आता यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूया..(saree draping ideas to look smart and stylish)

साध्याच साडीला कसा द्यायचा मॉडर्न लूक

 

१. ब्लाऊज

तुम्ही ब्लाऊजचा मागचा गळा, पुढची नेकलाईन, बाह्या कशा शिवता यावर तुमचा लूक खूप प्रमाणात अवलंबून असतो.

झाडांना 'या' ५ प्रकारचं जादुई पाणी द्या, फुलं येतील भरपूर- झाडं वाढतील भराभर, करून पाहा

त्यामुळे साडी साधी असली तरी ब्लाऊज थोडं फॅन्सी, युनिक डिझाईनचं शिवा. यामुळे तुमच्या लूकमध्ये खूप बदल होऊ शकतो. जेवढं माॅडर्न, स्टायलिश ब्लाऊज शिवाल, तेवढा तुमचा लूक बदलत जाणार. 

 

२. बेल्ट

हल्ली साडीवर बेल्ट लावण्याची फॅशन खूप ट्रेण्डिंग आहे. लग्नसराईमध्येही सध्या अशा साड्यांची धूम आहे.

चेहऱ्यावरचे पिंपल्स, काळे डाग लपविण्यासाठी बघा कसा करायचा मेकअप- चेहरा दिसेल एकदम स्वच्छ- सुंदर

तुमच्या साध्या साडीवर छान स्टायलिश बेल्ट घ्या. यामुळे तुमचा लूकही बदलेल आणि एकंदरीतच तुमचं व्यक्तिमत्त्व आणि फिगरही अधिक आकर्षक दिसण्यास मदत होईल. 

 

३. जॅकेट

साडी विथ जॅकेट ही फॅशन हिवाळ्यात खूप ट्रेण्डिंग असते. हिवाळ्यात साडीवर घालण्यासाठी लेदर जॅकेट किंवा हेवी मटेरियलचे जॅकेट वापरतात. आता या दिवसांत मात्र नेटचे, सिल्कचे जॅकेट वापरा.

पांढऱ्या केसांमुळे वैतागलात? बघा केस नैसर्गिकपणे काळे करण्याचा घरगुती उपाय- केस वाढतीलही छान

ब्लाऊजच्या रंगाचं किंवा मग साडीच्या रंगाशी कॉन्ट्रास्ट असणाऱ्या रंगाचं जॅकेट निवडा. त्या जॅकेटवर छान जर्दोसी वर्क, मोती वर्क असेल तर तुमच्या साध्या साडीचा लूक आणखी क्लासी हाेऊ शकतो. 

 

टॅग्स :फॅशनसाडी नेसणेस्टायलिंग टिप्स