eating sprouts & spinach daily? not good for your helath! | पालेभाज्या आणि उसळी रोज खाव्यात का?

पालेभाज्या आणि उसळी रोज खाव्यात का?

ठळक मुद्देपौष्टिक म्हणून अतीच खाल्लं तरी शरीराचं पचन बिघडणारच!

-सखी ऑनलाइन टीम

हल्ली जो उठतो तो म्हणतो स्प्राऊट्स खा. म्हणजे तेच आपली मोड आलेली कडधान्य! अनेकजण तर सकाळी उठताच स्प्राऊट्सचे बकाणे भरतात. आया तर मारे हौशीने सांगतात की, मुलांना उसळी देते, रोज शाळेच्या डब्यात स्प्राऊट देते, सलाडमध्येपण घालते. पण हे सारं खरंच आपलं पोषण करतं की पचन बिघडवतं? जे उसळींचं तेच  पालेभाज्यांचं.  पालेभाज्या आणि उसळींमुळे आरोग्य राखलं जातं मात्र पौष्टिक म्हणून अती आणि नेहेमी खाऊनही चालत नाही. तसंच या उसळी आणि पालेभाज्यांबाबतही आहे. त्यामुळे महत्वाचा प्रश्न असा की, हे सारं रोज खावं का?

उसळी आणि पालेभाज्या रोज खाव्यात का?


 1. अनेकांना वाटतं की, रोज उसळ खाणं अतिशय पौष्टिक आहे. कारण त्यातून भरपूर प्रथिनं मिळतात.  रोज पालक, टोमॅटो खाण्यानं रक्त वाढतं. पण यामागील शास्त्र काय आहे? ते माहित आहे का? 
2. उसळीवर एक कठीण आवरण असतं. ते लवकर पचत नाही. म्हणून आपण त्यावर काही संस्कार करतो. उदा. भिजवणं, मोड आणणं,  शिजवणं हे एक प्रकारचं   ‘प्रि डायजेशन चं आहे.  परंतु तरीसुद्धा उसळ लवकर पचत नाही. यामुळे पोट फुगणं, गॅसेस होणं, पोट दुखणं अशा तक्रारी होऊ शकतात. असा त्रास होणार्‍यांनी  रोज उसळ खाऊ नये. 


3. पावसाळ्यात  पचनशक्ती कमी असते तेव्हा अशा काळात उसळ खाल्ली तर त्रास होतो. शिवाय वृद्ध व्यक्तींनीही उसळ टाळावी. उसळीमुळे शरीरातील रुक्षताही वाढते. तसेच जंत तयार होण्याची प्रवृत्ती वाढते.


4. पालेभाज्याही रोज खाऊ नयेत. पालकमुळे रक्त वाढतं असं म्हणतात परंतु आधुनिक शास्त्रानुसार     पालकामधील ऑक्सॅलेट्स हे  शरीरातील लोह आणिा कॅल्शियमसह बॉन्डिंग करतं. त्यामुळे ते रक्त /कॅल्शियमचं शरीरातील प्रमाण कमी करतं!  पालक खायचा असल्यास पालक करतांना त्यात चिंच घालावी म्हणजे ऑक्सॅलेट्स त्यात विरघळतात. अळूची भाजी  करतांनाही त्यात चिंच आणि गूळ घालतात. त्याचं कारणही हेच आहे.


5.मेथी अधिक सेवन केल्यास आम्लपित्ताचा त्रास होतो. इतर अनेक पालेभाज्या आहेत. तांदुळका, माठ, करडई, राजगिरा, शेवगा पानं यांचा मधून मधून वापर करावा.


6. केव्वळ पाककृतीचा आणि चवीचा विचार न करता त्यांचं ‘गुणवर्धन’ हा विचारही करावा.
 

Web Title: eating sprouts & spinach daily? not good for your helath!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.