Challenge accepted. a photo movement on Instagram? | चॅलेंज अँक्सेप्टेड. इन्स्टाग्रामवरची ही फोटोचळवळ आहे तरी काय?

चॅलेंज अँक्सेप्टेड. इन्स्टाग्रामवरची ही फोटोचळवळ आहे तरी काय?

- प्रतिनिधी
गेल्या काही आठवडय़ांपासून  ‘इन्स्ट्राग्राम’वर  महिलांची ‘ब्लॅकअँण्ड व्हाइट’ फोटोंची एक चळवळ उभी राहिली आहे. ही चळवळ    ‘चॅलेंज अँक्सेप्टेड’ या हॅशटॅगनं ओळखली जात आहे. या चळवळीला सामान्य महिलांपासून जगभरातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या प्रसिध्द महिलाही पाठिंबा देत आहेत. आपले ब्लॅक अँण्ड व्हाइट फोटो इन्स्ट्राग्रामवर पोस्ट करून ‘वूमनसपोर्टिंगवूमनचॅलेंज’  या हॅशटॅगद्वारेही जगभरातल्या महिला या आंदोलनाला प्रतिसाद देत आहेत.


या चळवळीचं मूळ आहे तुर्कीमधलं. झेयकॅन रॉशेल या  पंचवीस वर्षाच्या तुर्किश-अमेरिकन फॅशन डिझायनरने मूळ  प्रश्नाला वाचा फोडली.   गेल्या कित्येक महिन्यांपासून रॉशेल तुर्कीमधील महिलांच्या हत्यांबद्दल वाचत होती. घरात, रस्त्यावर महिलांच्या होणा-या  हत्यांमुळे व्यथित होत होती. महिलांच्या हत्यांचा आकडा जो प्रसारमाध्यमातून येत होता त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा आकडा हा दडपला जातोय याचीही तिला जाणीव होती. तुर्कीमधील महिला इतक्या असुरक्षित असूनही तेथील पोलिस , कायदा मात्र निष्क्रीय आहे. हे असंच चालू राहिलं तर एक दिवस आपलीही अशीच हत्या होईल. तुर्कीमधल्या महिलांची ही परिस्थिती जगभरातल्या महिलांर्पयत पोहोचायला हवी . जगभरातल्या महिलांचं एकमेकींशी वेदनेचं नातं आहे याची जाणीव व्हायला हवी म्हणून तिनं आधी फेसबुकवर  ‘तुर्कीमधे महिलांच्याबाबतीत हे  चाललंय तरी काय?’ म्हणत प्रश्न उपस्थित केला. मग तिने इन्स्टाग्रामवर  तुर्कीमधल्या ज्या महिलांची हत्या झाली त्यांचे ब्लॅक अँण्ड व्हाइट फोटो  पोस्ट केले. स्वत:चे ब्लॅक अँण्ड व्हाइडट फोटो पोस्ट केले आणि  चॅलेंज अँक्सेप्टेड ’ आंदोलनाची हाक दिली. तिच्या  या हाकेला प्रतिसाद देऊन पॅरिस हिल्टन, केरी वॉशिंग्टन ते आपल्याकडे सोनम कपूर  आहुजा, सारा अली खान यांनी आपले ब्लॅक अँण्ड व्हाइट फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत आणि   ‘चॅलेंजअँक्सेप्टेड’म्हणत चळवळीला पाटिंबा दिला आहे. 


इन्स्टाग्रामवरच्या या आंदोलनाला जगभरातून आतार्पयत 45 लाख महिलांनी प्रतिसाद दिला आहे. घरात, घराबाहेर होणा-या  महिलांच्या हत्या, महिलांची असुरक्षितता हा तुर्कीसारख्या  कुठल्या एका देशाचा प्रश्न नाही. जगभर महिला असुरक्षित आहे. यावर गप्प न बसता आवाज उठवणं, एकमेकींना नैतिक बळ देणं ही गरज आहे. जगभरातल्या महिला या प्रश्नावर अशा एकत्र झाल्या तरच व्यवस्थेला जाग येईल हा या   ‘चॅलेंज अँक्सेप्टेड’ या  फोटो चळवळीमागचा उद्देश आहे. 

 

 

Web Title: Challenge accepted. a photo movement on Instagram?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.