Join us

..म्हणून अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेलीनं नाकारलं सिनेमातलं काम! ती म्हणते, मला एकच माहितीये..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2025 15:07 IST

Navya Naveli Nanda news: Amitabh Bachchan granddaughter: Navya Naveli latest update: नव्या नवेली म्हणते, मला अभिनय क्षेत्र आवडतं नाही, त्यापेक्षा मी माझ्या आजोबांचं स्वप्न पूर्ण करेन..

अमिताभ बच्चन यांची नात आणि श्वेता बच्चन नंदाची लेक नव्या नवेली नंदा. दिसते तर देखणीच आणि हुशारही आहे. ती ही अन्य स्टारकिड्सप्रमाणे सिनेमातच काम करणार असं गृहित असताना तिने मात्र बॉलिवूडची वाट नाकारली. (Navya Naveli Nanda news) सध्या ती IIM अहमदाबादमधून एमबीएचं शिक्षण घेत आहे. 'पॅरिस फॅशन वीक'मध्ये तिने सहभाग घेतला, तिने एक पॉडकास्टाही केला.(Amitabh Bachchan granddaughter) तो गाजला. दुसरीकडे तिचा भाऊ अगस्त्य नंदा यांने बॉलिवूड चित्रपटांमध्ये प्रवेश केला आहे. मात्र नव्या नवेलीनं ठरवलं की मी माझी वेगळी वाट निवडणार..(Navya Naveli latest update)

हॉटेलसारखा चमचमीत व्हेज तवा पुलाव करा घरच्याघरी, सिक्रेट टीप- तोंडाला येईल चव, फॅमिली पार्टीही होईल जबरदस्त

सध्या ती एक बिझनेसवुमन आहे. 'प्रोजेक्ट नवेली' हे तिचं स्वयंसेवी संस्था असून यामधून ती अनेकांना मदत करते. दुसरीकडे ४० हजार कोटींचे साम्राज्य असलेल्या उद्योग व्यवसायात प्रवेश करत हीच आपली वाट तिनं निवडली. जया बच्चन आणि श्वेता बच्चन नंदा यांचासोबत तिचा एक पॉडकास्ट व्हायरल झाला होता. नुकत्याच 'मोजो स्टोरी'ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली , मी कधीच अभिनय क्षेत्रात येण्याचा विचार केला नाही.

मला हा प्रश्न नेहमीच विचारला जातो पण माहित नाही.. माझे आई-वडील मला कायम सांगतात ते कर जिथे तु तुझे १०० टक्के देऊ शकते. मी वडिलांच्या व्यवसायात प्रवेश केला  मी एक उद्योजक आहे. मला नवीन गोष्टी कायम शिकायला आवडतात. तुम्हाला हवं असेल तर मी तुम्हाला ट्रॅक्टर असेंबल करुनही दाखवू शकते किंवा पॅसिस फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉकही करु शकते. हे सारं म्हणजे माझ्यासाठी नवीन गोष्टी शिकणं आहे, नवीन अनुभव घेणं आहे.

नव्या म्हणते की मी दिल्लीत वाढले. लहानपणापासूनच मी ट्रॅक्टर बनवताना पाहिला. माझं संपूर्ण जग त्याच्याभोवती मला वेढलेले वाटते. मला ट्रॅक्टरबद्दल इतक्या गोष्टी माहित आहे की अनेकदा माझे मित्र-मैत्रिण माझी खिल्ली उडवतात. माझे वडील, काकू, आजोबा आणि आजी ट्रॅक्टरबद्दल सतत बोलत असतात. त्यांच्या या कठोर परिश्रमातून हा वारसा पुढे चालवायचा आहे. कॉर्पोरेटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मी ३ ते साडे तीन वर्ष याबद्दल प्रशिक्षण घेतलं. मला असं वाटतं मी नव्याने सगळ्या गोष्टींची सुरुवात करावी. हे माझंच नाही तर माझ्या आजोबाचं स्वप्न आहे, ज्यासाठी मला अधिक मेहनत घ्यावीशी वाटते. ट्रॅक्टर हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा भाग आहे आणि माझ्याकडून कृषी क्षेत्रात थोडेसे योगदान देण्याचा मी प्रयत्न करतेय. आपल्या अर्थव्यवस्थेचा एक भाग शेतीवर चालतो. त्यासाठी या क्षेत्रात असणं मला खूप महत्त्वाचं वाटतं. या क्षेत्रात काम करण्यासाठी मी अधिक उत्साही आहे, असं ही तिने सांगितलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Navya Naveli Nanda rejects films, chooses business and family legacy.

Web Summary : Amitabh Bachchan's granddaughter, Navya Naveli Nanda, opted out of Bollywood to pursue business. Currently managing her NGO 'Project Naveli' and joining her family's business, she aims to innovate and contribute to the agricultural sector, fulfilling her grandfather's dream.
टॅग्स :सेलिब्रिटी