Join us  

प्रियांका चोप्रासारखा फिटनेस हवा? करा फक्त ६ गोष्टी, बेस्ट फिगरचे सिक्रेट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2023 3:29 PM

Priyanka Chopra's Diet & Fitness Routine : प्रियंका चोप्रा आपल्या दमदार अभिनयाव्यतिरिक्त शानदार फिगर व फिटनेससाठीही प्रसिद्ध आहे.

प्रियंका चोप्रा ही एक सुप्रसिद्ध भारतीय अभिनेत्री व मॉडेल आहे. ती भारतातील लोकप्रिय अभिनेत्रींनपैकी एक मानली जाते. प्रियंकाने वेगवेगळ्या चित्रपटांत अभिनय केले असून तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. प्रियंकाने मिस वर्ल्ड ही आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा जिंकली आहे. ही स्पर्धा जिंकणारी पाच भारतीय महिलांपैकी ती एक आहे. प्रियंका चोप्रा आपल्या दमदार अभिनयाव्यतिरिक्त शानदार फिगर व फिटनेससाठीही प्रसिद्ध आहे. प्रियंका चोप्रा डाएट आणि वर्कआऊटच्या नियमांकडे कधीही दुर्लक्ष करत नाही. याच कारणामुळे ती नेहमीच प्रसन्न आणि उत्साही दिसते. शरीर फिट राहण्यासाठी तसंच वजन कमी करण्यासाठी बहुतांश जण महागड्या स्वरुपातील डाएट प्लान फॉलो करतात. तर काही जण शस्त्रक्रियांचाही आधार घेतात. प्रियंका चोप्राचा फिटनेस मंत्रा पूर्णतः निराळाच आहे.आपली फिगर मेंटेन ठेवण्यासाठी ती डाएट नियंत्रणात ठेवण्याऐवजी पौष्टिक पदार्थांचे सेवन करण्यावर आपलं लक्ष केंद्रित करते. तसंच जिममध्ये वर्कआऊट करण्यासह योगासनांचाही सराव करते.बॉलिवूड ते हॉलिवूड गाजवणारी ही देसी गर्ल आपले फिटनेस आणि डाएट खूप काटेकोरपणे पाळते(Priyanka Chopra's Diet And Fitness Routine).    

फिटनेससाठी नक्की काय करते प्रियंका चोप्रा ?

१. हेल्दी डाएट - प्रियंका फिट अँड फाईन राहण्यासाठी एक हेल्दी डाएट प्लॅन फॉलो करते. ती आपल्या रोजच्या जेवणात प्रोटीन, कॅल्शियम, आयर्नयुक्त सगळ्या पदार्थांचा समावेश करते. जेवणात ती मुख्यत्त्वे करून सॅलड, सूप याच्यावर जास्त फोकस करते.

२. हायड्रेटेड राहा - हायड्रेटेड राहण्यासाठी प्रियांका दिवसभरात भरपूर पाण्याचे सेवन करते. ज्यूस आणि भरपूर पाणी पिऊन ती स्वतःला हायड्रेटेड ठेवते. दिवसातून कमीत - कमी १० ग्लास पाणी तर ती नक्कीच पिते. यामुळे त्वचेवर नैसर्गिक स्वरुपात तेज येण्यास मदत मिळते.  

३. वर्कआऊट - प्रियंका आपल्या बॉडीला प्रॉपर शेपमध्ये आणि टोर्न्ड ठेवण्यासाठी हेव्ही वर्कआउट करताना दिसते. कितीही बिझी शेड्युल असेल तरी ती दिवसातून किमान १ तास वर्कआऊट करतेच. या एका तासामध्ये प्रियंकाला ट्रेडमिल रनिंग आणि योगा करायला फार आवडते. कारण यामुळे शरीराला अधिक ऊर्जा मिळते, असं तिचं म्हणणं आहे.

४. योगा - मानसिकरित्या सक्षम राहण्यासाठी आपला स्वतःवर विश्वास असणं अतिशय गरजेचं आहे. मानसिक आरोग्यासाठी प्रत्येकानं नियमित ध्यानधारणा करावी', असा सल्ला प्रियंका चोप्रा देते. मानसिक आरोग्य निरोगी राहण्यासाठी ध्यानधारणा आणि योगा करणे महत्वाचे आहे.  

५. रनिंग - प्रियंका आपल्या रोजच्या योगा आणि वर्कआऊटसोबतच रनिंग पण करते. दिवसभर आपल्या शरीरातील फ्रेशनेस तसाच टिकवून ठेवण्यासाठी ती रोज रनिंग करते. 

६. हेल्दी नाश्ता -  हेल्दी नाश्त्याने प्रियंका तिच्या दिवसाची सुरुवात करते. जेव्हा ती परदेशात असते तेव्हा ती मांसाहारी ब्रेकफास्टसोबतच काही फळ खाते. ब्रेकफास्टमध्ये पोहे, इडली, डोसा खाणंसुद्धा पसंत करते.

टॅग्स :फिटनेस टिप्स