Join us  

पन्नाशी आली तरी ट्विंकल खन्ना दिसते तिशीची; काय आहे तिचा सिक्रेट स्पेशल डाएट प्लॅन? पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2022 4:41 PM

Tips To Look Younger Than Your Age Twinkle Khanna : एकावेळी कमी प्रमाणात खाल्ल्याने तुम्ही लवकर वयस्कर दिसत नाही आणि तुमचा ताणही कमी होण्यास मदत होते

ठळक मुद्देत्वचा कायम यंग राहावी असं वाटत असेल तर न चुकता बाहेर जाताना सनस्क्रीन लावायला हवे तसंच ताण कमी करायला कोणकोणत्या गोष्टी करायला हव्यात याविषयीही ती काही टिप्स देते

प्रसिद्ध अभिनेत्री ट्विंकल खन्ना आता बॉलिवूडपासून काहीशी दूर असली तरी वयाच्या पन्नाशीतही ती अवघ्या तिशीची दिसते. प्रसिद्ध अभिनेते राजेश खन्ना यांची मुलगी आणि अभिनेता अक्षय कुमार याची पत्नी असलेली ट्विंकल हिने ९० च्या दशकात अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर चित्रपटसृष्टी गाजवली होती. मात्र आता ती लेखन आणि इंटेरीयर डिझायनिंगची आवड जपत असल्याचे दिसते (Tips To Look Younger Than Your Age Twinkle Khanna). 

सध्या ती ट्विक इंडिया नावाने एक युट्यूब चॅनेल चालवत असून त्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांना सतत काही ना काही उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न करत असते. नुकताच ट्विंकलने यावर एक व्हिडिओ पोस्ट केला वय वाढलं तरी तरुण दिसण्यासाठी काय करावं याविषयी माहिती दिली आहे. इतकेच नाही तर ताणाचे व्यवस्थापन कसे करायचे याविषयीही तिने काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. 

(Image : Google)

ताण घालवण्यासाठी निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जायला हवं असे ट्विंकल यामध्ये सांगते. इतकेच नाही पुस्तकं आणि वाचन तुम्हाला कायम तरुण ठेवण्यासाठी उपयुक्त असल्याचेही ती म्हणते. तर तुम्हाला कायम तरुण दिसायचे असेल तर आहारात कोणकोणते बदल करायला हवेत याविषयीही ट्विंकल महत्त्वाची माहिती देते. 

(Image : Google)

ट्विंकल म्हणते, एकावेळी कमी प्रमाणात खाल्ल्याने तुम्ही लवकर वयस्कर दिसत नाही आणि तुमचा ताणही कमी होण्यास मदत होते. रात्रीच्या वेळी तुम्ही कमी खाल्ले तर तुमचे शरीर योग्य रितीने आराम करु शकते नाहीतर शरीराची खूप शक्ती ही खाल्लेले अन्न पचवण्यातच खर्च होते. आपण रात्री झोपताना फक्त ऑम्लेट खात असल्याचे सांगत १० वाजता मी झोपून जाते असेही ती सांगते. तर तुमची त्वचा कायम यंग राहावी असं वाटत असेल तर न चुकता बाहेर जाताना सनस्क्रीन लावायला हवे आणि दुपारच्या भर उन्हात बाहेर पडत असाल तर ओढणी किंवा हॅट त्वचा कव्हर करण्यासाठी अतिशय आवश्यक असल्याचे ट्विंकल सांगते.  

टॅग्स :सेलिब्रिटीट्विंकल खन्नाआहार योजनाब्यूटी टिप्स