बॉलीवूड ते हॉलीवूड असा प्रवास गाजवणारी देसी गर्ल प्रियंका चोप्रा जोनस ही फक्त अभिनयासाठीच नाही तर तिच्या व्यक्तीमत्वासाठी आणि विनोदी स्वभावासाठी देखील ओळखली जाते. (Priyanka Chopra Nick Jonas) सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रीय असते. (Priyanka Chopra funny reply)
लवकरच ती एसएस राजामौली यांच्या 'ग्लोबट्रॉटर' या चित्रपटातून पुन्हा एकदा हिंदी सिनेसृष्टीत येणार आहे. नुकतेच तिने एक्स (ट्विटर) वर Ask me anything असं म्हटलं यादरम्यान एका चाहत्याने तिला तिच्या नवऱ्याबद्दल विचारलं. (Priyanka Chopra Hindi words Nick Jonas)
"तू निकला हिंदीत काय म्हणायला शिकवलेस? PS I love you!!! #AskPCJ". त्यावर प्रियंका चोप्रा म्हणाली खाना, पाणी, प्यार और पनीर मला वाटतं मी सर्वच त्याला शिकवलं. यानंतर अनेकांनी तिच्या तेलगु भूमिकेबद्दल विचारलं. पण काही शब्दांतच प्रियंकाने तिच्या मॅरीड लाइफबद्दल सांगितलं. “प्यार” म्हणजे त्यांचं नातं, “पनीर” म्हणजे भारतीय खाद्यसंस्कृतीची आठवण आणि या दोघांच्या प्रेमात असलेली गोड चव.
प्रियंका आणि निकचं लग्न झालं तेव्हापासून त्यांचं नातं चर्चेत आहे. संस्कृती वेगळी, भाषा वेगळी. प्रियंकाने बऱ्याचदा तिच्या मुलाखतीत म्हटलं देखील की नात्यात संवाद हवा, आदरही हवा पण थोडी मजा देखील हवी. त्यावरच आपल नाते टिकून राहते. इतकंच नाही तर ती कायमच भारतीय सण, उत्सव साजरे करते. आणि यातही तिचा पती आनंदाने सहभागी असतो. गणेश चतुर्थीपासून अगदी दिवाळीपर्यंत अनेक सण आनंदात साजरा केला जातो.
प्रियंकाचा आगामी चित्रपट “The Bluff” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, ज्यात ती एका समुद्री साहसिक भूमिकेत दिसणार आहे. तिच्या चाहत्यांना तिचा हा दमदार अवतार पाहायची उत्सुकता आहे. पण या सगळ्या ग्लॅमरच्या दुनियेतही प्रियंका तिचं वैवाहिक आयुष्य अगदी साधेपणाने जगते.
Khana, paani, pyaar, paneer but I think he picked it all up himself! @nickjonas@anushka_purohithttps://t.co/bHSRLgTX9c
— PRIYANKA (@priyankachopra) November 12, 2025
