काही नावाजलेल्या अभिनेत्रींच्या लाँग बाँगस् पाहून अचानक १९व्या शतकाची आठवण झाली. १९६० ते १९७० च्या काळात प्रत्येकाच्या ओठांवर एक नाव होते. (Old 'Sadhana Cut' Is Back In Trend)ते म्हणजे साधना. हिंदी सिनेमा क्षेत्रातील एक नावाजलेली अभिनेत्री. साधना ही 'हम दोनो', 'वक्त', 'एक फुल दो माली' सारख्या गाजलेल्या चित्रपटांची मुख्य नायिका होती. सौंदर्यवतींच्या यादीत साधनाचे नाव आजही नमूद आहे. साधना फक्त तिच्या अभिनयासाठी किंवा नृत्यासाठी प्रसिद्ध नव्हती.(Old 'Sadhana Cut' Is Back In Trend) ती जास्त प्रसिद्ध झाली ती तिच्या हेअरस्टाईलमुळे. सर्वच चित्रपटात साधनासारखीच हेअरस्टाईल करत असे. या हेअरस्टाईलचं मुळात नाव लाँग बाँगस् किंवा फ्लिकस् वगैरे असलं तरी, भारतात त्याला 'साधना कट' असंच म्हणतात.
साधनाचे केस आणि केसांची स्टाईल लोकांना फार आवडायची. अनेक महिलांनी तिचे अनुकरण करायला सुरुवात केली. ब्युटीशयनने विचारले, "कसे केस कापू?" की "साधनासारखे कापा" असे महिला सांगायच्या. यातूनच पुढे त्या कटला 'साधना कट' नाव पडले. (Old 'Sadhana Cut' Is Back In Trend)अनेक अभिनेत्यांनी साधनाच्या केसांचे कौतुक केले आहे. सुमारे २५-३० वर्षांपूर्वी साधना कट खुप जास्त लोकप्रिय होता. शाळेतल्या मुलींपासून ऑफिसात जाणाऱ्या महिलांपर्यंत, सर्वच जणी साधना कट करून घेत होत्या. ब्युटीपार्लरच्या बाहेर खास टिप लिहिली जायची. 'येथे साधना कट करून मिळेल'. पण मग हळूहळू अजून वेगळ्या हेअरस्टाईल यायला लागल्या आणि साधना कटचं फॅड कम झालं. तरी काही चित्रपटांमध्ये अधूनमधून साधना कट बघायला मिळत असे.
पण सध्या हा साधना कटचा ट्रेंड पुन्हा सुरू होत आहे. श्रद्धा कपूरने हल्लीच तिचा एक सेल्फी पोस्ट केला आहे .ज्यात तिचा साधना कट आहे. जॅकलिनचा पूर्वी साधना कटच होता. मध्यंतरी तिने इतरही हेअरस्टाईल करून बघितल्या. मात्र आता परत साधना कट कडे वळली आहे. इतरही अभिनेत्री आता साधना कट मध्ये दिसत आहेत. साधना कट दिसायला तर छानच दिसतो. पण त्यामध्ये एक नॉस्टेलजिक फिल आहे.