स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी... आई स्थान आपल्या जीवनात सगळ्यात महत्त्वाचे आहे. (Mother’s Day 2025 Bollywood celebs) तिच्याशिवाय आपलं आयुष्य अपूर्णच. मे महिन्यातील दुसरा रविवार हा जगभरात मातृदिन म्हणून साजरा केला जातो. (Kareena Kapoor Mother’s Day post) या दिवशी आईचे आभार मानले जाते. यादिवसानिमित्त सोशल मीडियावर आपण प्रत्येक जणांना आजच्या दिवशी आईविषयी काही ना काही टाकलं असेलच. तिच्याबद्दलच्या आठवणीदेखील शेअर केल्या असतील. (Bollywood stars celebrate Mother’s Day)
फोटो, व्हिडिओ आणि मनापासून तिच्यासाठी काही तरी लिहिलेच असेल. या दिवसाचे औचित्य साधून बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खानने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीला एक भावनिक पोस्ट शेअर केली. "ती म्हणते आईला कधी कमी लेखू नका. तिने अशा वेदना अनुभवल्या आहेत, ज्या आपल्याला सहन देखील होणार नाही. तिने कळा सोसून बाळाला जन्म दिला, तळहाताच्या फोडाप्रमाणे त्याला मोठे केले, रात्रंदिवस त्याच्यासाठी जागून काढले. तिच्यासाठी टाळ्या नाहीत, सांत्वन नाही तीच हिच खरी ताकद आहे."
सोहा अली खानने आई शर्मिला टागोर, सासू ज्योती केम्मू आणि मुलगी इनाया नौमी केम्मू यांचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. ती म्हणते "मला माझ्या आवडत्या महिलांना आठवण्यासाठी थोडा वेळ काढायचा होता. एकीने मला वाढले तर एकीने माझ्या नवऱ्याला आणि एकीला मी वाढवते आहे." हा आनंद माझ्यासाठी खूप जास्त आहे.
रकूल प्रीत सिंहही तिची आई कुलविंदर सिंह आणि सासू पूजा भगनानी यांचे फोटो शेअर केले. ती म्हणते की, दोन अविश्वसनीय महिलांना मातृदिनाच्या शुभेच्छा...! "माझी आई माझे पहिले घर आहे, माझी सगळ्यात मोठी ताकद आणि जगातील सगळ्यात ताकदवान महिला आहे," त्यासाठी धन्यवाद. तर "माझ्या सासूने ज्या व्यक्तीला जन्म दिला ज्याच्यासोबत मी माझे आयुष्य घालवते त्याला वाढवल्याबद्दल धन्यवाद." मी खूप भाग्यवान आहे की, माझ्या आयुष्यात फक्त एक नाही तर दोन आई आहेत त्यांना मातृदिनाच्या शुभेच्छा!
शिल्पा शेट्टीने तिच्या इंस्टाग्रामवर आई आणि सासूसोबतचे फोटो शेअर केले ती म्हणते "भारत माता की जय माझ्या आणि तुमच्या आईला मातृदिनाच्या शुभेच्छा..!"
ईशा देओलने आई हेमा मालिनी सोबत फोटो शेअर केले आणि म्हटले आई माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. "माझ्या आयुष्यातील सर्वात गोड स्त्री, तुला मातृदिनाच्या शुभेच्छा..!"
अभिनेता, सूत्रसंचालक मनीष पॉल याने देखील आपल्या आईविषयी सुंदर शब्द लिहिले त्याने त्याच्या आईला मेकअप आर्टिस्ट म्हटलं. "तो म्हणतो शाळेतील प्रत्येक स्पर्धेत तिने मला सुंदरपणे तयार केले आणि मला जगण्यासाठी आत्मविश्वास दिला ज्यामुळे आज मी या पदावर आहे."