लहानपणी शाळेत असताना तुम्ही कधी परिक्षेत चिटींग केलीत का? या प्रश्नाच खरं उत्तर तर कोणी देणार नाही. ज्यांनी नाही केली ते तर नाहीच म्हणणार. पण ज्यांनी केली आहे.(Khushi Kapoor and Junaid Khan confess, we cheated in the exam ) ते कधीच अभिमानाने हो केली कॉपी, असं थोडीच सांगतील. पण मग मजामस्ती करताना आपण जर, अस काही केलं असेल तर, ते सांगूनच टाकतो. अर्थाच परिक्षेत कॉपी करणं ही अभिमानाची गोष्ट नाही. शाळेत असणार्या विद्यार्थ्यांनी चिटिंग केलेले चालते, असा अर्थ घेऊच नये. (Khushi Kapoor and Junaid Khan confess, we cheated in the exam )पण इतक्या वर्षांनी जेव्हा शाळेतील असे किस्से आठवतात, तेव्हा हसायला येतंच. शाळेत चिटींग करून पेपर लिहिणाऱ्यांच्या यादीत एका स्टारकिडचही नाव अॅड झालं आहे. तिच्या कॉपी करण्याच्या पद्धतीवर नेटकरी पोट धरून हसले आहेत.
किस्सा आहे खुशी कपूरचा . श्रीदेवीच्या दोन्ही मुली आता बॉलिवूड मध्ये आल्या आहेत. जान्हवीला आता कीही वर्षे झाली असली तरी, खुशी मात्र नवीन आहे. तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती आणि जुनेद खान यांनी बॉलिवूड हंगामा या चॅनलशी संवाद साधला. जुनेद खान हा अमीर खानचा मुलगा आहे. गप्पा मारताना त्या दोघांनी सांगितले की, त्यांनी परीक्षेत कॉपी केली होती. खुशीने सांगितले, त्यांचा गणवेश शर्ट आणि स्कर्ट असा होता. विज्ञानाच्या परीक्षेत तिला आकृत्या लक्षात राहात नसत. त्यामुळे ती मांडीवर एक अख्खीच्या आख्खी आकृती काढून गेली होती. तिला भीती वाटत होती. पण ती पकडली गेली नाही. पुढे तिने सांगितले की, तेव्हा मला फार अभिमान वाटला होता. मी काहीतरी वेगळा मार्ग शोधून काढला आहे असे वाटतं होते. खुशी पुढे म्हणाली, "स्कर्टच्या आत काढलेली आकृती कोणाला दिसायचा संबंधच येत नाही." स्कर्ट खालील आकृती पूर्णच्या पूर्ण परिक्षेत आल्यावर फार आनंद झाल्याचे खुशी म्हणाली.
जुनेदने तोही कॉपी करायचा अशी कबुली दिली. तो म्हणाला, "तोही कधीच पकडला गेला नाही." दोघांनीही आपल्या शाळेतील असेच अनुभव सांगितले. शाळेतले दिवस आठवले की एकदम नॉस्टेलजिक वाटायला लागते.