Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Celebrity Corner > 'हॅलोवीन डे'साठी साकारायचा आहे हटके लुक, 'या' बॉलिवूड सेलिब्रिटींकडून घ्या स्पेशल आयडिया 

'हॅलोवीन डे'साठी साकारायचा आहे हटके लुक, 'या' बॉलिवूड सेलिब्रिटींकडून घ्या स्पेशल आयडिया 

Halloween Day Ghost Day सेलिब्रेटींपासून ते सामान्य लोकांपर्यंत अनेक जण हा दिवस उत्सवात साजरा करतात. या विशेष दिवशी मिळवा हटके लुक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2022 19:36 IST2022-10-27T14:51:36+5:302022-10-27T19:36:01+5:30

Halloween Day Ghost Day सेलिब्रेटींपासून ते सामान्य लोकांपर्यंत अनेक जण हा दिवस उत्सवात साजरा करतात. या विशेष दिवशी मिळवा हटके लुक 

Get a special idea from this Bollywood celebrity to create different look for 'Halloween Day' | 'हॅलोवीन डे'साठी साकारायचा आहे हटके लुक, 'या' बॉलिवूड सेलिब्रिटींकडून घ्या स्पेशल आयडिया 

'हॅलोवीन डे'साठी साकारायचा आहे हटके लुक, 'या' बॉलिवूड सेलिब्रिटींकडून घ्या स्पेशल आयडिया 

ir="ltr">दरवर्षी 31 ऑक्टोबर हा दिवस जगभरात 'हॅलोवीन डे' म्हणून साजरा करण्यात येतो. सेलिब्रेटींपासून ते सामान्य लोकांपर्यंत अनेक लोकं हा दिवस उत्सवात साजरा करतात. हा सण पाश्चिमात्य देशांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी हा सण साजरा केला जातो. या दिवशी लोक भितीदायक मेकअप करतात आणि भितीदायक पोशाक परिधान करतात. जर तुम्हाला हॅलोविन पार्टीसाठी मेकअपच्या विविध आयडिया मिळवायच्या असतील तर तुम्ही या बॉलिवूड सेलिब्रिटींकडून घेऊ शकता.

या फोटोमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी इरा हॅलोवीन लूकमध्ये दिसत आहे. इराने काळ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे. यासोबतच अर्ध्या चेहऱ्यावर मेकअप करून भितीदायक लुक देण्यात आला आहे. आपण सुद्धा अर्ध्या चेहऱ्यावर स्पूकी मेकअप करून हा लुक मिळवू शकता.

या फोटोमध्ये सोहा अली खान, कुणाल खेमू आणि त्यांची मुलगी इनाया दिसत आहेत. या चित्रात तिघांनीही मॅचिंग नाईट सूट घातले आहेत. यासोबतच कुणाल खेमूने जॅक ओ लँटर्न हातात घेतला आहे.

बाॅलीवूड अभिनेत्री सोनम कपूर आपल्या फॅशन स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. या फोटोत ती ब्लॅक आउटफिटमध्ये दिसत आहे. हॅलोविनसाठी सोनमने हॉलिवूड अभिनेत्री मर्लिन मनरोचा लूक साकारला आहे. तिने यात ब्लॅक ड्रेस आणि रेड लिपस्टिक लावली आहे. जो एक भयावह लुक देतो.

हॅलोविनसाठी या फोटोमध्ये बाॅलीवूडची फिटनेस गर्ल शिल्पा शेट्टीने भुताटकीचा लूक परिधान केला आहे. हॅलोवीन लूकमध्ये शिल्पा व्हाइट कलरच्या ड्रेसमध्ये आणि भयानक मेकअपमध्ये दिसत आहे. हॅलोविनसाठी शिल्पाचा हा लूक बेस्ट आहे. या लुकमध्ये शिल्पा ओळखून येत नाही.

Web Title: Get a special idea from this Bollywood celebrity to create different look for 'Halloween Day'

टॅग्स :CelebrityShilpa ShettySonam KapoorIra KhanSoha Ali Khanसेलिब्रिटीशिल्पा शेट्टीसोनम कपूरइरा खानसोहा अली खान