चित्रपट आणि टीव्ही जगातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून अर्चना पूरण सिंह यांना ओळखले जाते.(Archana Puran Singh shuts trolls) तसेच सोशल मीडियावर त्यांचे लाखो चाहते देखील आहेत.(Archana Puran Singh reply to trollers) त्यांचे इंस्टाग्राम रील्स आणि युट्यूब वरील ब्लॉग देखील लोकांना पाहायला आवडतात. परंतु, या वेळी त्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. (Archana Puran Singh on mom living at home)त्यांच्या एका पोस्टवर युर्जसने विचारलेल्या प्रश्नामुळे त्यांच्या रागाचा भडका उडाला आणि त्यांनी त्याला चांगलेच खडेबोल सुनावले.(Celebrities caring for parents) त्यांनी त्यांच्या इंस्टा स्टोरीवर एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला.(Archana Puran Singh family bond)
अनुष्का शर्माने का सोडले गोड पदार्थ, दूध आणि गहू? ती सांगते, त्यानं नेमकं काय बदललं..
युजर्सने विचारलं की, माझ्या ज्ञानात भर पडावी म्हणून विचारतोय आजी आणि आजोबा एकत्र का राहत आहे?. हे वृद्धाश्रम आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी म्हटलं की, तुझ्या ज्ञानात अधिक भर पडावी म्हणून सांगते हे वृद्धाश्रम नाही. हे भारतातील घर आहे. आणि मी तुला भारतातील घराची व्याख्या सांगते. हे एक असं ठिकाण आहे जिथे वृद्धांना प्रेम आणि आदर दिला जातो आणि कुटुंबाच्या जवळ ठेवले जाते. भारतात म्हातारी माणसं आपल्या कुटुंबासोबत राहतात. सोशल मीडियावर कसे बोलायला हवे हे कळावे म्हणून त्यांनी इंस्टा स्टोरीवर या कमेंटचा स्क्रीन शॉट देखील शेअर केला आहे.
अर्चना त्यांचे पती परमीत सेठी, मुलगा आयुष्यमान आणि आर्यमान यांच्यासह मुंबईतील मड आयलंडमध्ये राहतात. मुंबईतल्या त्यांच्या या बंगल्यामध्ये तिची आई आणि परमीतचे वडील राहतात. तिच्या कुटुंबातील सदस्यांना ब्लॉगमध्ये अनेकदा पाहिले जाते. ज्यामुळे तिचे घरगुती जीवन कसे आहे याविषयी देखील समजून येते.
अर्चनाने भारतीय घर आणि त्याचे महत्त्व याबद्दल नेटकऱ्यांना ठणकावून सांगितले. तिने अभिनेत्री म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 'कुछ कुछ होता है' या सुपरहिट चित्रपटात संस्मरणीय भूमिका साकारली. त्यानंतर कॉमेडी सर्कस आणि द कपिल शर्मा शो यामुळे ती घराघरात लोकप्रिय झाली.