Join us  

करीना कपूर म्हणते, घरकामात मी तैमूरचीही मदत घेते; मुलांनाही घरकाम यायला हवं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2023 3:10 PM

Actress Kareena Kapoor How She love Taking Care of her House : घरकाम करायला आणि घराकडे लक्ष द्यायला आवडत असल्याचे बेबो सांगते...

घर किंवा संसार म्हटला की रोजच्या गोष्टी योग्य पद्धतीने करण्यासाठी घरात खूप कामं असतात. अगदी स्वयंपाकापासून ते भांडी, धुणे, इतर स्वच्छता अशा असंख्य गोष्टी आपण घरात असलो की सतत करत असतो. यामध्ये नवऱ्याची, मुलांची काळजी घेणे, घरातील येणार-जाणारांचे करणे असे सतत काही ना काही सुरू असते. आपल्याला ज्याप्रमाणे या सगळ्या जबाबदाऱ्या असतात त्याचप्रमाणे अभिनेते आणि अभिनेत्रींनाही या जबाबदाऱ्या असतातच. प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर म्हणजेच सगळ्यांची लाडकी बेबो आता २ मुलांची आई आहे. सैफ अली खानशी लग्न केल्यानंतर करीनाने तैमूर आणि जेह या २ मुलांना जन्म दिला (Actress Kareena Kapoor How She love Taking Care of her House). 

(Image : Google)

करीना सध्या आपल्या आयुष्यातील बहुतांश वेळ आपल्या कुटुंबासोबत आणि मुलांसोबत घालवत असल्याचे आपल्याला तिच्या सोशल मीडियावरुन समजते. रंगपंचमीला नुकताच तिने आपल्या दोन्ही मुलांसोबतचा एक फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता. 'व्हॉट वूमन वॉन्ट' या नुकत्याच सुरू झालेल्या शो मध्ये करीनाने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी शेअर केल्या. त्यामध्ये आपल्याला घरातील गोष्टी करायला किंवा घराची काळजी घ्यायला आवडते असे सांगितले. इतकंच नाही तर घरातील गोष्टी करताना आपण आपल्या मुलांचीही मदत घेत असल्याचे ती म्हणाली. 

(Image : Google)

आपण काय करतो हे आपली मुलं बारकाईने पाहत असतात. त्यामुळे काम आणि कुटुंब या दोन्हीकडे योग्य पद्धतीने लक्ष देणे अतिशय गरजेचे असल्याचे सैफ अली खान म्हणाला. 'फिल्म कम्पॅनियन'ला मुलाखत देताना करीना म्हणाली, मला एकावेळी अनेक गोष्टी करायला आवडते. एकावेळीच अभिनेत्री असणं, स्टार असणं आणि गृहीणी असणं हे मला आवडतं. मला घराकडे लक्ष द्यायलाही तितकंच आवडतं. माझ्या आजुबाजूला काम करायला कितीही लोकं असली तरी कधीतरी आपलं टेबल आपण साफ करुन घेणं मला आवडतं. मग मी असं करा, तसं करा अशा सूचनाही देते. असं करणं हा माझ्या व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे. इतकेच नाही तर काही वेळा मी या सगळ्या कामात तैमूरलाही माझ्या सोबत घेते आणि मदत करायला सांगते असेही करीना पुढे म्हणाली.  

टॅग्स :सेलिब्रिटीकरिना कपूर