Lokmat Sakhi >Career > आता स्त्रियांना पुरुषांपेक्षा जॉब्जच्या जास्त संधी, पुरुषांचा टक्का घसरला

आता स्त्रियांना पुरुषांपेक्षा जॉब्जच्या जास्त संधी, पुरुषांचा टक्का घसरला

कोरोना, लॉकडाऊन यामुळे महिलांच्या नोकरीवर गदा आल्याच्या बातम्या प्रसिध्द होत असताना ‘इंडिया स्किल्स रिपोर्ट 2022’ नुसार रोजगारक्षम महिलांच्या संख्येत वाढ दिसून आली आहे. ही आकडेवारी पुरुषांच्या तुलनेत जास्त असून भविष्यात नोकरदार महिलांची संख्या, आर्थिकदृष्ट्या सबल महिलांची संख्या वाढण्याचेच संकेत देत आहे. त्यादृष्टीने या अहवालाला आणि त्यातील आकडेवारीला महत्त्व आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2021 19:33 IST2021-12-14T19:24:47+5:302021-12-14T19:33:24+5:30

कोरोना, लॉकडाऊन यामुळे महिलांच्या नोकरीवर गदा आल्याच्या बातम्या प्रसिध्द होत असताना ‘इंडिया स्किल्स रिपोर्ट 2022’ नुसार रोजगारक्षम महिलांच्या संख्येत वाढ दिसून आली आहे. ही आकडेवारी पुरुषांच्या तुलनेत जास्त असून भविष्यात नोकरदार महिलांची संख्या, आर्थिकदृष्ट्या सबल महिलांची संख्या वाढण्याचेच संकेत देत आहे. त्यादृष्टीने या अहवालाला आणि त्यातील आकडेवारीला महत्त्व आहे.

According to India Skills Report 2022, the percentage of employable women increase. The number of employable women is higher than men. | आता स्त्रियांना पुरुषांपेक्षा जॉब्जच्या जास्त संधी, पुरुषांचा टक्का घसरला

आता स्त्रियांना पुरुषांपेक्षा जॉब्जच्या जास्त संधी, पुरुषांचा टक्का घसरला

Highlightsव्हीबॉक्स हे प्रतिभा अर्थात टॅलेण्टचं मुल्यांकन करणारं मोठं व्यासपीठ आहे. या व्यासपिठावरुन इंडिया स्किल्स रिपोर्ट 2022 हा प्रसिध्द करण्यात आला.मागच्या वर्षीच्या तुलनेत रोजगारक्षम महिलांची संख्या 10 टक्क्यांहून अधिक आहे.

 एकीकडे महिला आणि पुरुषांमधील वेतन असमानता या मुद्यावर केवळ आपल्याच देशात नाही तर जगभरात वाद सुरुच आहे. वेतन असमानतेमुळे जगभरातील नोकरी करणार्‍या महिलांमधे असंतोषाचं वातावरण आहे. पण या वातावरणातही आपल्या भारतातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ही बातमी दिली आहे ‘इंडिया स्किल्स रिपोर्ट 2022’ ने दिली आहे. हा अहवाल ‘व्हीबॉक्स’ ने प्रसिध्द केला आहे. हा अहवाल सांगतो, की भारतात रोजगारक्षम महिलांची संख्या सातत्यानं वाढते आहे. यावर्षीही या संख्येत मोठी वाढ नोंदवली गेली आहे. शिवाय ही वाढ पुरुषांच्या तुलनेतही जास्त आहे.

कोरोना, लॉकडाऊन यामुळे महिलांच्या नोकरीवर गदा आल्याच्या बातम्या प्रसिध्द होत असताना रोजगारक्षम महिलांच्या संख्येत होणारी वाढ भविष्यात नोकरदार महिलांची संख्या, आर्थिकदृष्ट्या सबल महिलांची संख्या वाढण्याचेच संकेत देत आहे. त्यादृष्टीने या अहवालाला आणि त्यातील आकडेवारीला महत्त्व आहे.

Image: Google

व्हीबॉक्स हे प्रतिभा अर्थात टॅलेण्टचं मुल्यांकन करणारं मोठं व्यासपीठ आहे. या व्यासपिठावरुन इंडिया स्किल्स रिपोर्ट 2022 हा प्रसिध्द करण्यात आला. व्हीबॉक्सच्या या मुल्यांकनात एआयसीटीई (AICTE) ,भारतीय विद्यापिठांच्या संघटना, भारतीय उद्योग संघटना आणि इतर एजन्सी सहभागी झाल्या होत्या.

2022चा अहवाल सांगतो, की रोजगारक्षम महिलांची संख्या 51.44 टक्के आहे. 2021मधे हीच संख्या 41. 25 टक्के होती. मागच्या वर्षीच्या तुलनेत दहा टक्क्याहून अधिक वाढ नोंदवण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर यंदा रोजगारक्षम महिलांची संख्या ही रोजगार पुरुषांच्या तुलनेतही जास्त आहे. रोजगारक्षम महिलांची संख्या जिथे 51.44 टक्के भरली तिथे रोजगारक्षम पुरुषांची संख्या 45.97 टक्के एवढी भरली आहे. मात्र 2022मधील रोजगारक्षम पुरुषांचा आकडा हा 2021पेक्षा जास्त आहे. 2021 मधे रोजगारक्षम पुरुषांची संख्या 34 26 टक्के होती.

Image: Google

या अहवालानुसार रोजगारक्षम महिलांमधे विद्यार्थी , व्यावसायिक, बीटेक पदवीधर, एमबीए पदवीधर या विविध क्षेत्रातील महिलांचा, तरुणींचा समावेश आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश , पश्चिम बंगाल येथील रोजगारक्षम प्रतिभावंत तरुणांची संख्या जास्त दिसून आली आहे. याचाच अर्थ रोजगारक्षम महिला, तरुणी या विविध शैक्षणिक पार्श्वभूमीतल्या आहेत. त्यामुळेच भविष्यात आणखी विविध क्षेत्रात महिला, तरुणी काम करताना दिसतील. 

Web Title: According to India Skills Report 2022, the percentage of employable women increase. The number of employable women is higher than men.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Womenमहिला