Join us

वर्क फ्रॉम होम करतानाही कूल वाटेल, फ्लोरल लूक ट्राय करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 17:26 IST

समर कलेक्शन घेऊन यंदा काय घरातच बसायचं आहे असं म्हणण्यापेक्षा आपल्याला फ्रेश वाटेल असं काही ट्राय करा.

ठळक मुद्देयंदा जर समर लूक अगदी घरच्या घरी वर्क फ्रॉम होमच्या रुपातही हवा असेल तर फ्लोरल ट्राय करायला हरकत नाही.

श्रावणी बॅनर्जी

यंदा कोरोनामुळे समर कलेक्शन, छान सुती कपडे घेणं, पेस्टल शेड्स ह सारं वापरुन कूल दिसणं, स्वत:लाच सुंदर आहोत असं फील होणं हे मागे पडणार हे उघड आहे. मात्र तरीही यंदा उन्हाळी शॉपिंग म्हणून तुम्ही काही करणार असालच तर ‘फोरल’ हा शब्द महत्वाचा.फ्लोरल प्रिण्ट्स ही सध्याची फॅशनही आहे आणि फेमिनीन लूकची एक खासियतही. म्हणजे फुलाफुलांची नक्षी. फुलांचे छान प्रिण्ट. रंग. नाजूक काम. हे सारं. यंदा घरीच असलो तरी आपणही फ्लोरल वापरुच शकतो. अगदी केसातल्या क्लीप्सपासून ते पर्स, कपडे, मोबाइल कव्हर पर्यंत.फुलापानांची जादू आपल्याला सुंदर करु शकते.

 1) बारीक फुलांच्या नक्षीच्या पलाझो, थ्री फोर्थ, स्कर्ट अगदी पायजमेही सध्या स्वस्तात उपलब्ध आहेत.2) शॉर्ट कुर्तीही फ्लोरल प्रिण्टमध्ये मिळतात.  फ्लोरल प्रिण्टचं कापड आणून आपल्याला हवे तसे लांब, शॉर्ट, जॅकेट, असे ड्रेसेस शिवून घेता येऊ शकतात.3)  फ्लोरल प्रिण्टचे दुपट्टे, स्ट्रोल, स्कार्फ, हा पर्यायही आहेच.4)  फुलापानांचे कानातले, गळ्यातले, बोटात फुलांच्या अंगठया यांच्यावरही फुलं फुलली तर छान.5) फुलांची नेलआर्ट हा सोपा पर्याय आहे.त्यामुळे यंदा जर समर लूक अगदी घरच्या घरी वर्क फ्रॉम होमच्या रुपातही हवा असेल तर फ्लोरल ट्राय करायला हरकत नाही.

टॅग्स :समर स्पेशलब्यूटी टिप्स