केस सॉफ्ट आणि शायनी असावेत असं प्रत्येकाला वाटतं पण केसांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास ते गळू लागतात.(Hair Care Tips) लहानपणी आई-आजीकडून आपल्या केसांची काळजी नीटशी घेतली जायची. केसांच्या वाढीसाठी घरगुती किंवा आयुर्वेदिक तेल फार फायदेशीर ठरायचं.(Hair Oiling mistake) परंतु, सध्या वाढते प्रदूषण, धूळ, खाण्यापिण्याच्या सवयी आणि अधिकचा ताण याचा परिणाम आपल्या केसांवर होतो. धुळीमुळे केसांत कोंडा साचतो, टाळू अस्वच्छ राहते ज्यामुळे सतत तेलकट व चिकट राहते.(scalp care tips)
टाळू नीट स्वच्छ झाली नाही की केसगळतीची समस्या वाढते.(dandruff from hair oil) अनेकांना सवय असते की केस धुण्यापूर्वी देखील त्यांना भरभरुन तेल लावतात, शाम्पू करुन केस धुतल्यानंतर देखील ओल्या केसांमध्ये तेल लावून त्याची वेणी बांधतात. यामुळे केसांची वाढ होण्याऐवजी ते अधिक जास्त प्रमाणात खराब होतात.(avoid oil after hair wash) केस धुतल्यानंतर लगेच केसांना तेल लावत असाल तर वेळीच थांबा. केसांची काळजी कशी घ्यायला हवी जाणून घेऊया.
केस धुतल्यावर स्कॅल्पमधील पोअर्स ओपन असतात. अशावेळी लगेच केसांना तेल लावल्याने ते अडकून केसगळती, कोंडा आणि टाळूला इंन्फेक्शन होण्याची समस्या वाढते. इतकेच नाही तर तेल लगेच लावले तर धूळ, घाण आणि प्रदूषण सहजपणे केसांच्या टाळूमध्ये शोषले जातात. यामुळे टाळूवर घाण जमा होते. ज्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. तेल आणि घाणीचे मिश्रण टाळूवर एक थर तयार करते, ज्यामुळे छिद्रे बंद होतात. केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोहोचत नाही, ज्यामुळे केस कमकुवत होतात आणि तुटू लागतात. घाण आणि ओलावा यामुळे बॅक्टेरिया वाढू शकतात, ज्यामुळे डोक्यातील कोंडा आणि टाळूला खाज सुटणे यांसारख्या समस्या उद्भवतात.
शाम्पू केल्यानंतर केस ओले आणि नाजूक होतात. अशावेळी केसांना तेल लावल्याने किंवा केस बांधल्याने, विंचरल्याने केस अधिक तुटतात. यासाठी केसांना शाम्पू करण्यापूर्वी तेल लावा. यामुळे केसांना भरपूर पोषण मिळेल आणि केसांचे नुकसानही होणार नाही.
केसांना तेल लावण्यापूर्वी ते हलके गरम करुन केसांना लावा. कोमट तेलाने टाळूवर हलक्या हाताने मालिश करा. जोर जोरात घासू नका. टाळूची मालिश केल्याने रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात. आणि केसगळती कमी होते. तेल लावल्यानंतर केस सैल वेणीत बांधा. केसांवर तेल २ ते ३ तास किंवा रात्रभर राहू द्या. यामुळे तेल केसांच्या मुळांमध्ये प्रवेश करेल. सकाळी केस शाम्पूने धुवा, नंतर कंडिशनरचा वापर करा. यामुळे केस निरोगी राहतील आणि गळणं देखील थांबेल.