लहान वयात असताना मुलांच्या शरीरासोबत उंची वाढणे, केसांची वाढ होणे यांसारखे अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात.(hair fall in teenagers) हल्ली प्रत्येक वयोगटातील मुलांना केसांच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अगदीच १५ ते १६ वयोगटातील मुलांचे केस पांढरे दिसू लागले. पांढरे केस, केसगळती हा वाढत्या वयाचा परिणाम आहे. पण जेव्हा हे लहानग्यांमधून दिसू लागतात तेव्हा यामागचे कारण शोधणं गरजेचं ठरते.(hair problems in adolescents) पूर्वी वयाच्या चाळिशीनंतर दिसणाऱ्या तक्रारी आता शाळा आणि कॉलेज वयातच जाणवू लागल्या आहेत. यामागे फक्त आनुवंशिक कारणे नाहीत, तर बदललेली जीवनशैली, आहाराच्या सवयी आणि काही नकळत होणाऱ्या चुका मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत असे डॉक्टर सांगतात. कोणत्या चार चुका टाळायला हव्या, जाणून घेऊया.(dermatologist advice for parents)
आजार ५० औषध मात्र एकच! केसगळती- त्वचेसाठी अमृतापेक्षा भारी आवळ्याचा लाडू - खा आणि पाहा बदल
1. अकाली पांढरे होण्याची सर्वात मोठे कारण आनुवंशिकता. जर आपल्या पालकांचे किंवा कुटुंबातील सदस्यांचे केस लहान वयात पांढरे झाले असतील तर मुलांना हा अनुभव येण्याची शक्यता जास्त असते. ही समस्या रोखता येत नाही. पण योग्य आहार घेतल्यास काही प्रमाणात कमी करता येते.
2. सध्याचे प्रदूषण वातावरण, सततचा ताण, धूम्रपान आणि सूर्याच्या अतिनील किरणांमुळे शरीरात मुक्त रॅडिकल्स वाढतात. यामुळे केसांचे रंगद्रव्य तयार करणारे मेलेनोसाइट्स तयार करणाऱ्या पेशी खराब होऊ लागतात. यामुळे केस अकाली पांढरे होऊ शकतात.
3. काही आवश्यक जीवनसत्त्व आणि खनिजांच्या कमतरतेमुळे केस अकाली पांढरे होऊ शकतात. जर शरीरात व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन डी, लोह, तांबे आणि झिंकची कमतरता झाली तर केस पांढरे होतात. चुकीचे खाणेपिणे आणि जंक फूडचे जास्त सेवन केल्याने देखील ही समस्या वाढते.
4. थायरॉईड समस्या, ऑटोइम्यून रोग किंवा हार्मोनल असंतुलनामुळे देखील केसांवर परिणाम होतो. ज्यामुळे ते पांढरे होतात. त्यासाठी आपण आहारात हिरव्या भाज्या आणि फळे खायला हवे. ताण कमी करण्यासाठी योग आणि ध्यान करा. धुम्रपानापासून दूर राहा. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
