Join us  

White Hair Home Remedies : केस दिवसेंदिवस जास्तच पांढरे होत चाललेत? स्वयंपाकघरातील ३ उपाय,काळेभोर केस राहतील कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 1:48 PM

White Hair Home Remedies : पांढरे केस लपवण्यासाठी लोक अनेक केसांच्या उत्पादनांचा वापर करतात. परंतु या उत्पादनांमध्ये अनेक रसायने आढळतात, ज्यामुळे केसांना खूप नुकसान होते.

जर तुम्ही पांढऱ्या केसांच्या समस्येने त्रस्त असाल तर हे उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. केवळ वृद्धच नाही तर 25 ते 30 वर्षांच्या तरुणांनाही पांढऱ्या केसांचा त्रास होतो. याचे कारण अनियमित जीवनशैली आणि खराब खाण्याच्या सवयी असू शकतात. (How to get black Hairs naturally)  पांढरे केस लपवण्यासाठी लोक अनेक केसांच्या उत्पादनांचा वापर करतात. परंतु या उत्पादनांमध्ये अनेक रसायने आढळतात, ज्यामुळे केसांना खूप नुकसान होते. अशा स्थितीत घरगुती उपायांच्या मदतीने पांढऱ्या केसांपासून सुटका मिळवू शकता. (Premature white hair home prevention by using holy basil curry leaves and lemon)

कमी वयात  उद्भवणारी केस पांढरे होण्याची समस्या या उपायांनी सहज टाळता येऊ शकते. पण फक्त उपयांवर अवलंबून न राहता केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी आहाराकडेही लक्ष द्यायला हवं. आहारात प्रोटिन्सयुक्त पदार्थांचा समावेश करावा जेणेकरून केस चांगले राहण्यास मदत होते. वेळेवर झोप घेणे, नाश्ता  वेळेच्यावेळी करणं, जंक फूड कमी प्रमाणात खाणं या गोष्टींची सवय असायला हवी.

पांढरे केस दूर करण्यासाठी घरगुती उपायांचा वापर (White Hair Home Remedies)

१) तुळशीची पानं

तज्ज्ञांच्या मते तुळशीच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात, ज्यामुळे केस काळे होण्यास मदत होते. सर्व प्रथम तुळशीची पाने घ्या. आता  त्यात आवळे  किंवा आवळ्याचा रस घाला. भृंगराजच्या पानांचा रस समान प्रमाणात घ्या. आता या तीन गोष्टी व्यवस्थित मिसळा आणि केसांना चांगल्या प्रकारे लावा.  सुकल्यानंतर हे मिश्रण धुवून टाका. 

२) कढीपत्ता

कढीपत्त्यात जैव सक्रिय घटक आढळतात, जे केसांना पूर्ण पोषण देतात. यामुळे लहान वयात केस पांढरे होण्याची समस्या दूर होते. यासाठी केसांना कढीपत्त्याची पेस्ट लावू शकता सुकल्यानंतर केस स्वच्छ पाण्यानं धुवून टाका. हा प्रयोग सलग एक आठवडा केल्यास फरक दिसून येईल. 

३) लिंबू

लिंबामध्ये असलेले नैसर्गित घटक केस काळे करण्यासाठी प्रभावी ठरतात. आयुर्वेदानुसार 15 मिली लिंबाचा रस आणि 20 ग्रॅम आवळा पावडर घ्या. आता हे दोन्ही मिक्स करून पेस्ट बनवा, नंतर ही पेस्ट डोक्याला लावा. तासभर केसांवर ठेवल्यानंतर केस धुवा. काही दिवस ही पद्धत वापरल्याने केस काळे होण्यास मदत होईल

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी