आजकाल आपल्यापैकी बरेचजण केसांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्येने हैराण आहे. कुणाची केसगळती थांबत नाही, तर कुणाचे केस अकाली पांढरे होतात, तर काहींच्या (Which oils to use for different hair problems) केसांची वाढच होत नाही. अशा परिस्थितीत, आपण केसांसाठी (Different Types of Hair Oils for Different Hair Problems) अनेक उपाय करून पाहतो. काहीवेळा यातील काही उपायांचा चांगला परिणाम दिसतो तर कधी केस 'जैसे थे' अगदी तसेच राहतात, त्यात काहीच फरक दिसत नाही(How To Choose The Right Hair Oil For Your Different Hair Problems).
केसांच्या अनेक समस्या कमी करण्यासाठी तेलाने मसाज करणे हा एक साधासोपा उपाय नेहमीच केला जातो. परंतु नेमकं केसांना कोणत्या तेलाने मसाज करणे फायदेशीर ठरेल हे आपल्यालाच माहीत नसते. यासाठीच, rohitsachdeva1 या इंस्टाग्राम अकाउंटवरून केसांच्या वेगवेगळ्या समस्यां ओळखून त्या समस्यांनुसार योग्य तेलाचा वापर केल्यास, केसांच्या अनेक समस्या चुटकीसरशी कमी करता येऊ शकतात.
केसांच्या कोणत्या समस्येवर नेमकं कोणतं तेल लावावं ते पाहा...
१. खोबरेल तेल :- जर आपले केस खूपच रुक्ष व निस्तेज झाले असतील तर खोबरेल तेल हा एक उत्तम पर्याय आहे. खोबरेल तेलामुळे केसांना नैसर्गिक ओलावा आणि डीप कंडिशनिंग करण्यास मदत होते. सोबतच केसांतील कोंड्याचे प्रमाण देखील कमी करण्यास फायदेशीर ठरते. खोबरेल तेलात ल्यूरिक अॅसिड असते जे केसांमधील प्रोटीन लॉस थांबवून, डॅमेज झालेल्या केसांना रिपेअर करून पुन्हा पहिल्यासारखे लांब, घनदाट आणि चमकदार करण्यास मदत करते.
खोबरेल तेलात मिसळा 'हा' पदार्थ आणि सनस्क्रीन तयार, नको महागडे सनस्क्रीन - होईल पैशांची बचत...
२. एरंडेल तेल :- केसांची वाढ खुंटली असेल तर हेअर ग्रोथ वाढवण्यासाठी केसांना एरंडेल तेलाने मसाज करावा. यात असणारे रिसिनॉलिक अॅसिड स्काल्पचे ब्लड सर्क्युलेशन वाढवून केसांची वाढ जलद गतीने करण्यास उपयुक्त ठरते. तसेच एरंडेल तेलाने केसांना मालिश केल्यास त्यांना नवी चमक येते तसेच आतून डीप कंडिशनिंग देखील केले जाते. केसांना एरंडेल तेल लावताना ते थेट केसांवर लावण्याची चूक करु नका. त्यात दुसरे कोणतेही सौम्य तेल मिसळून मगच त्यांचे एकत्रित मिश्रण केसांना लावावे.
३. कांद्याचे तेल :- केस सतत गळून टक्कल पडलं असेल तर नवीन केस उगवण्यासाठी कांद्याचे तेल फायदेशीर ठरु शकते. कांद्याच्या तेलात सल्फर असते जे केसांचे तुटणे थांबवून नवीन केस उगवण्यास मदत करते. कांद्याच्या तेलातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म केसांसोबतच स्काल्पच्या त्वचेची देखील काळजी घेतात.
ओपन पोर्समुळे चेहरा म्हातारा-उदास दिसतो? ७ नैसर्गिक पदार्थ लावा, चेहऱ्यावर येईल तरुण चमक...
४. भृंगराज तेल :- आयुर्वेदानुसार, भृंगराज तेल केसांसाठी एक वरदानच असल्याचे म्हटले जाते. जर आपले केस अकाली पांढरे होऊ लागले असतील तर भृंगराज तेल अधिक जास्त फायदेशीर ठरेल. केसांना नैसर्गिकरित्या काळेभोर करण्यासाठी नियमितपणे भृंगराज तेलाने मसाज करावा. भृंगराज तेल मेलॅनिनचे प्रमाण वाढवण्यास मदत करते, मेलॅनिन वाढल्याने केस नैसर्गिकरित्या काळेभोर होतात.