हिवाळा सुरु झाला की सगळ्यात जास्त त्रास देणारी समस्या म्हणजे केसगळती आणि कोरडेपणा.(Ayurvedic hair oil for winter) थंडीत वातावरणात बदल झाला की केस कोरडे पडतात, कोंडा किंवा खाज सुटण्याची समस्या देखील वाढते.(Winter hair care tips) यामुळे केसातील नैसर्गिक ओलावा देखील हरवतो. त्यामुळे केस तुटायला लागतात, गळतात आणि फाटे फुटतात.(Best oil for hair fall control) अनेकजण आपल्या केसांसाठी विविध प्रकारचे शाम्पू, सिरम वापरतात. पण याने काही प्रमाणात फरक पडतो पण काही काळाने पुन्हा केसगळती सुरु होते. (Hair fall solution in winter)
सध्याच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे केसगळतीची समस्या सामान्य बनली आहे.(Ayurvedic remedies for dry hair) खराब आहार, ताणतणाव, प्रदूषण आणि रासायनिक उत्पादनांचा वापर केल्याने केसांची मुळे कमकुवत होतात. पण यावर सगळ्यात प्रभावी आणि घरगुती उपाय म्हणजे तेल मालिश.(Hair care routine for winter season) अनेकांना प्रश्न पडतो की केसगळती थांबवण्यासाठी कोणत्या तेलाचा वापर करायला हवा. नारळाचे तेल, बदामाचे की आवळ्याचे तेल केसांना लावायला हवे जाणून घेऊया. (How to reduce dandruff and hair fall in winter)
लग्नसमारंभात उठून दिसतात कुंदन बांगड्या घातलेले हात, पाहा ५ लेटेस्ट- सुंदर कुंदन चुडी सेट
नारळाचे तेल केसांसाठी लोकप्रिय आणि जुने उपाय आहे. यामध्ये व्हिटॅमिन ई आणि फॅटी अॅसिड्स असतात. जे केसांच्या मुळांना मजबुती देतात आणि कोरडेपणा दूर करतात. त्यातील फॅटी अॅसिड, प्रथिने आणि व्हिटॅमिन ई केसांच्या मुळांना खोलवर पोषण देतात. केस तुटण्यापासून रोखते. टाळूला मॉइश्चरायझ करते आणि कोंडा कमी करते. केसांची वाढ वाढवते. यासाठी कोमट नारळाचे तेल टाळूवर १० ते १५ मिनिटे लावून हलक्या हाताने मसाज करा.
बदामाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई, डी आणि मॅग्नेशियम असते. ते आपल्या केसांना आतून मजबूत करते आणि खराब झालेल्या केसांना दुरुस्त करते. या तेलामुळे कोरड्या आणि खराब झालेल्या केसांना पोषण मिळते. टाळूमधील रक्ताभिसरण वाढते. आणि केसांना चमक देखील मिळते. झोपण्यापूर्वी केसांना बदाम तेलाने मालिश केल्यास फायदा होतो.
आवळ्याच्या तेलात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे केसांची मुळे मजबूत करतात. केसगळतीवर उपचार करण्यासाठी याचा वापर पूर्वीपासूनच करण्यात आला आहे. केसांना जाड, मजबूत करण्याचे काम आवळ्याचे तेल करते. तसेत पांढऱ्या केसांसाठी देखील आवळ्याचे तेल फायदेशीर आहे.
केसांना आठवड्यातून २-३ वेळा तेल लावून हलक्या हाताने मसाज करणे पुरेसे आहे. यामुळे टाळूमध्ये रक्त परिसंचरण वाढते आणि मुळे मजबूत होतात. आवला, नारळाचे आणि एरंडेल तेलाचे मिश्रण सर्वात चांगले आहे. ते केसांची मुळे मजबूत करते आणि नवीन केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते.
