Join us

भृंगराज की आवळा? केस वाढवण्यासाठी कोणते तेल सगळ्यात बेस्ट, 'या' स्टेप्स फॉलो करा, केसगळती कमी- वाढही होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2025 09:30 IST

Amla oil benefits for hair growth: Ayurvedic hair growth oils: Home remedies for hair fall and growth: केसगळती रोखण्यासाठी अनेकदा भृंगराज की आवळा तेल लावायला हवे असा प्रश्न पडतो. केसांच्या वाढीसाठी या दोघांपैकी कोणते चांगले आहे? जाणून घेऊया.

केस हे फक्त सौंदर्याचा नाही तर आपल्याला व्यक्तिमत्त्वाचा देखील विकास आहे. आपल्या प्रत्येकाला आपले केस लांब आणि जाड हवे असतात. (Hair Care Tips) त्यासाठी आपण अनेक महागडे उत्पादन, तेल, शाम्पूचा वापर करतो. केसांवर केमिकल्स उत्पादन जास्त प्रमाणात वापरल्यामुळे केस वाढण्याऐवजी केसगळती अधिक प्रमाणात होते. (Bhringraj oil benefits for hair)आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आणि प्रदूषणात केसांची गळती, पातळ होणे आणि चमक हरवणे यांसारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.(Amla oil benefits for hair growth) केसांसाठी आपण अनेक घरगुती उपाय करतो.(Ayurvedic hair growth oils) पण काही केल्या केसगळती थांबत नाही. केसांना फाटे फुटणे, केस पांढरे होणे यांसारख्या समस्या देखील उद्भवतात. केसांच्या मुळांना योग्य पोषण मिळालं की केसगळती रोखता येते. केसगळती रोखण्यासाठी अनेकदा भृंगराज की आवळा तेल लावायला हवे असा प्रश्न पडतो. केसांच्या वाढीसाठी या दोघांपैकी कोणते चांगले आहे? जाणून घेऊया. (Home remedies for hair fall and growth)

४२ व्या वर्षीही दिसते कतरिना कैफ २२ विशीतल्या तरुणीसारखी, रोज सकाळी पिते खास ड्रिंक- परफेक्ट फिगरचे सिक्रेट

आवळामध्ये व्हिटॅमिन सी, खनिजे आणि अमीनो आम्लांनी समृद्ध आहे. ते केसांची मुळे मजबूत करते आणि तुटण्यापासून रोखते. आवळा केसांचा नैसर्गिक रंग राखण्यास मदत करतो, केस पांढरे कमी होण्यास आणि खाज सुटणे, कोंडा कमी करण्याच्या समस्या दूर करते. नियमित वापरामुळे केस जाड, मजबूत आणि चमकदार होतात. 

यासाठी आपल्याला आवळा तेल थोडे गरम करा. हलक्या हातांनी टाळूवर मालिश करा. असं केल्याने रक्तप्रवाह वाढतो आणि केसांच्या मुळांना पोषण मिळते. रात्रभर तसेच राहू द्या. सकाळी सौम्य शाम्पूने केस धुवा. तसेच आपण आहारात आवळा देखील खाऊ शकतो. 

वॅक्सिंगनंतर प्रायव्हेट पार्ट्सची आग होते, खाज येते, रॅशही येते? ३ सोपे घरगुती उपाय, त्रास होईल कमी

भृंगराज तेलाला आयुर्वेदात केसांसाठी अमृत मानले जाते. ते केसांच्या मुळांना मजबूत करते आणि रक्ताभिसरण वाढवून केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते. त्यात प्रथिने आणि इतर पोषक घटक असतात जे केस तुटणे आणि गळणे टाळतात. यासाठी भृंगराज तेल थोडे गरम करुन डोक्याला लावा. १५ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. नंतर ३० मिनिटे तसेच राहू द्या. सौम्य शाम्पूने केस धुवा. असं महिन्यातून २ ते ३ वेळा केल्यास चांगला परिणाम मिळतो. 

भृंगराज आणि आवळा हे दोन्ही केसांना वेगवेगळे फायदे देतात. भृंगराज केस गळणे कमी करते आणि केसांची मुळे मजबूत करते, तर आवळा टाळूचे आरोग्य सुधारते आणि केसांना चमकदार बनवते. म्हणून, त्यांचा एकत्र वापर केल्याने आणखी चांगले परिणाम मिळू शकतात.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी