Lokmat Sakhi >Beauty > चेहऱ्याला कोण चपाती लावतं? पाहा नवीन व्हायरल ब्यूटी ट्रेंड-गव्हाच्या चपातीचा शीटमास्क...

चेहऱ्याला कोण चपाती लावतं? पाहा नवीन व्हायरल ब्यूटी ट्रेंड-गव्हाच्या चपातीचा शीटमास्क...

Wheat Flour Roti Sheet Mask For Face : Wheat Roti Sheet Mask : How To Make Wheat Roti Sheet Mask At Home : Wheat Roti Sheet Mask Viral Beauty Trend : गव्हाच्या पिठाची पोळी शीटमास्क म्हणून वापरण्याचा नवीन ब्यूटी ट्रेंड...ट्राय तर करून पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2025 18:07 IST2025-06-16T17:51:00+5:302025-06-16T18:07:10+5:30

Wheat Flour Roti Sheet Mask For Face : Wheat Roti Sheet Mask : How To Make Wheat Roti Sheet Mask At Home : Wheat Roti Sheet Mask Viral Beauty Trend : गव्हाच्या पिठाची पोळी शीटमास्क म्हणून वापरण्याचा नवीन ब्यूटी ट्रेंड...ट्राय तर करून पाहा...

Wheat Flour Roti Sheet Mask For Face Wheat Roti Sheet Mask How To Make Wheat Roti Sheet Mask At Home Wheat Roti Sheet Mask Viral Beauty Trend | चेहऱ्याला कोण चपाती लावतं? पाहा नवीन व्हायरल ब्यूटी ट्रेंड-गव्हाच्या चपातीचा शीटमास्क...

चेहऱ्याला कोण चपाती लावतं? पाहा नवीन व्हायरल ब्यूटी ट्रेंड-गव्हाच्या चपातीचा शीटमास्क...

सध्याचा जमाना हा ट्रेंडचा आहे. डाएटपासून फॅशनपर्यंत अगदी सगळ्याच गोष्टींत आजकाल ट्रेंडस फॉलो केले जातात. सौंदर्य जगतात देखील असेच नवनवीन ट्रेंडस (Wheat Flour Roti Sheet Mask For Face) येत - जात असतात. सध्या इंस्टाग्रामसारख्या अनेक सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सवर असाच एक अनोखा आणि नैसर्गिक ट्रेंड प्रचंड लोकप्रिय (Wheat Roti Sheet Mask) होत आहे. हा ब्यूटी ट्रेंड आहे, गव्हाच्या पिठाची पोळी शीट मास्क म्हणून वापरणे! आपल्याकडे पारंपरिक भारतीय स्वयंपाकात (How To Make Wheat Roti Sheet Mask At Home) वापरले जाणारे गव्हाचे पीठ आता त्वचेच्या सौंदर्यासाठीही उपयुक्त ठरत आहे. बाजारातील केमिकलयुक्त शीटमास्क ऐवजी महिलांचा ओढा या नैसर्गिक आणि घरगुती उपायाकडे वळताना दिसतो आहे(Wheat Roti Sheet Mask Viral Beauty Trend).

सध्या त्वचेची काळजी घेण्यासाठी फेसमास्क, फेसपॅकऐवजी अनेकजणी शीटमास्क वापरणेच पसंत करतात. गव्हाच्या पिठाच्या पोळीत त्वचेला आवश्यक असलेले पोषणद्रव्य, जीवनसत्त्वे आणि नैसर्गिक गुणधर्म असतात, जे त्वचेचा पोत सुधारण्यास, चेहरा मऊ व तजेलदार बनवण्यास मदत करतात. त्यामुळे कमी खर्चिक, रसायनमुक्त आणि घरच्याघरीच तयार होणारा हा नवा ब्यूटी ट्रेंड सध्या सोशल मिडियावरही चर्चेचा विषय ठरतो आहे. अनेक ब्यूटी ब्लॉगर्स आणि इन्फ्लुएन्सर्स याचा अनुभव शेअर करताना दिसत आहेत, नेमका हा ट्रेंड आहे तरी काय आणि याचा त्वचेला कसा फायदा होतो ते पाहूयात. 

गव्हाच्या पिठाची पोळी शीटमास्क म्हणून चेहऱ्यावर लावा... 

गव्हाच्या पिठाची पोळी शीटमास्क म्हणून चेहऱ्यावर लावण्यासाठी, आपण चपाती तयार करण्यासाठी जशी नेहमीप्रमाणे कणिक मळून घेतो, तशीच कणिक मळून घ्यावी. कणिक मळून झाल्यावर नेहमीसारखीच गोलाकार चपाती लाटून घ्यावी. आता या चपातीवर चमचाभर मध ओतून ते संपूर्णपणे चपातीवर व्यवस्थित पसरवून लावावे. त्यानंतर, ही चपाती हलकेच उचलून आपल्या चेहऱ्यावर ठेवून द्यावी, त्यानंतर डोळे नाही नाकाची छिद्र या भागातील थोडे कणिक काढून छिद्र करावीत. त्यानंतर १५ ते २० मिनिटे हा गव्हाच्या पिठाचा शीटमास्क चेहऱ्यावर तसाच लावून ठेवावा. २० मिनिटानंतर हा मास्क चेहऱ्यावरून काढून त्वचेला लागलेले मध बोटांच्या मदतीने चोळून २ ते ३ मिनिटे मसाज करून घ्यावा. मग चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. आपल्याला हवे असल्यास आपण कणिक मळताना पिठात गुलाबपाणी, हळद, चंदन पावडर, कडुलिंबाची पावडर, बेसन यापैकी कोणतेही पदार्थ घालूंन शीटमास्क अधिक इफेक्टिव्ह करु शकता. 

त्वचा ते केस, त्रास काहीही असो तूप ठरते वरदान! चमचाभर तुपाची जादू करा-दिसाल सुंदर कायम...

तुरटीचा इवलासा खडा त्वचेवर करेल जादू! तुरटीच्या फेसपॅकपासून टोनरपर्यंत त्वचेसाठी 'असा' करा वापर...

हा शीटमास्क लावण्याचे फायदे... 

१. गव्हाच्या पिठात नैसर्गिक व्हिटॅमिन बी, ई, झिंक आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेला पोषण देतात.
२. डेड स्किन काढली जाऊन त्वचेला नैसर्गिक चमक येते.
३. चेहऱ्यावरील सूज कमी होते व त्वचा ताजीतवानी दिसते. 
४. बाजारातील केमिकलयुक्त शीटमास्कपेक्षा हा उपाय नैसर्गिक आणि कोणतेही साइडइफेक्ट्स होण्याचा धोका देखील नाही. 

अथिया शेट्टी केसांना लावते 'हे' घरगुती तेल! म्हणून तिचे केस दिसतात सुंदर - पाहा तिचा देसी उपाय...


हिरव्यागार दुर्वा आहेत केसांसाठी वरदान! दुर्वांचा हेअर मास्क केसांवर करेल जादू - अस्सल पारंपरिक उपाय...

हा ट्रेंड विशेषतः कोरड्या, निस्तेज व पिगमेंटेशन असलेल्या त्वचेसाठी उपयुक्त मानला जातो. मात्र, ज्या लोकांची त्वचा फारच नाजूक, सेंसेटिव्ह किंवा एलर्जी होणारी असेल तर त्यांनी त्वचेवर पॅच टेस्ट करुन मगच वापरण्याचा सल्ला दिला जातो. बाजारातील महागडे शीट मास्क बाजूला ठेवून स्वयंपाकघरातील साध्या गव्हाच्या पिठाने सौंदर्य खुलवण्याचा हा नवा आणि हटके प्रयोग बऱ्याच जणांना आवडू लागला आहे. यात वापरले जाणारे सगळे पदार्थ हे घरगुती आणि नैसर्गिक असल्याने एकदा तरी हा ब्यूटी ट्रेंड आपल्या त्वचेवर आजमावून पाहायला हरकत नाही.

Web Title: Wheat Flour Roti Sheet Mask For Face Wheat Roti Sheet Mask How To Make Wheat Roti Sheet Mask At Home Wheat Roti Sheet Mask Viral Beauty Trend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.