गहू हा भारतीय आहारातला मूख्य घटक. गव्हाचा विचार हा केवळ आहारापूरताच करण्याची आपली सवय आहे. पण ही सवय थोडी बदलावी लागेल. कारण गहू हे जेवढे शरीरासाठी लाभदायक आहेत तितकेचं त्वचेची काळजी घेण्यासाठीही गहू फायदेशीर ठरतात. पण त्वचेसाठी गहू ते कसे वापरायचे? त्वचेसाठी गव्हाच्या पिठाच्या लेपाचा उपयोग परिणामकारक ठरतो.गव्हाच्या पिठाचा उपयोग करुन उन्हानं आलेल्ला काळवंडलेपणा, चेहेऱ्यावर लवकर सुरकुत्या पडणं या समस्या सोडवता येतात. यासोबतच त्वचेसंबंधी अनेक विकारांवर गव्हाच्या पिठाचा वापर होतो. प्रदूषण, ताण-तणाव आणि वाढतं वय याचा परिणाम त्वचेवर होतोच. हा परिणाम घालवण्याची ताकद गव्हाच्या पिठाच्या लेपात आहे. पोळ्यांसाठी गव्हाचं पीठ घरात असतंच. त्यामुळे हा लेप बनवण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात असंही नाही.
गव्हाच्या पिठाचा फेसपॅक ? नवल वाटलं ना, पण फेशियल विसराल; हा पॅक वापरुन पहा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 15:30 IST
प्रदूषण, ताण-तणाव आणि वाढतं वय याचा परिणाम त्वचेवर होतोच. हा परिणाम घालवण्याची ताकद गव्हाच्या पिठाच्या लेपात आहे. पोळ्यांसाठी गव्हाचं पीठ घरात असतंच. त्यामुळे हा लेप बनवण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात असंही नाही.
गव्हाच्या पिठाचा फेसपॅक ? नवल वाटलं ना, पण फेशियल विसराल; हा पॅक वापरुन पहा!
ठळक मुद्देगव्हाच्या पिठाचा उपयोग करुन उन्हानं आलेला काळवंडलेपणा, चेहेऱ्यावर लवकर सुरकुत्या पडणं या समस्या सोडवता येतात.गव्हातल्या अंगभूत गुणांमुळे कणकेपासून तयार केलेला हा लेप उत्तम स्क्रबचंही काम करतो. कणकेचा लेप लावल्यानं चेहेऱ्याची त्वचा तरुण दिसते. कारण या लेपामुळे चेहेऱ्याची त्वचा घट्ट होते.