सध्या थंडीचे दिवस सुरु झाले आहेत, या दिवसांत वातावरणातील गारठयाने आपण बहुतेकवेळा अंघोळीसाठी गरम पाण्याचाच वापर करतो. परंतु अंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करताना केस धुण्यासाठी नेमके कोणते पाणी वापरावे असा अनेकींचा गोंधळ उडतो. अनेकांना थंडीमुळे गरम पाण्याने आंघोळ करणे सोयीचे वाटते, तर काहीजणी केसांसाठी थंड पाणीच वापरणे उत्तम मानतात. पण खरंच केसांचे आरोग्य, मजबुती आणि चमक टिकवून ठेवण्यासाठी कोणते पाणी फायदेशीर ठरते? चुकीच्या पाण्याच्या निवडीमुळे केस कोरडे होणं, फ्रिझीनेस वाढणं, कोंडा तयार होणं असे त्रास होऊ शकतात(winter hair damage prevention).
आपल्यापैकी बहुतेकजणी थंडीच्या दिवसात केसांसाठीही गरम पाण्याचा वापर करतात. पण तज्ज्ञांच्या मते, तुमच्या केसांचे आरोग्य आणि चमक टिकवून ठेवण्यासाठी पाण्याचे तापमान खूप महत्त्वाचे ठरते. गरम पाण्यामुळे स्काल्प कोरडी पडू शकते आणि केसांचे नैसर्गिक तेल निघून जाऊन ते निष्काळजी आणि निर्जीव दिसू शकतात. याउलट, थंड पाण्याने केस (hair wash in winter) धुतल्यास ते चमकदार आणि मजबूत राहतात असे मानले जाते. तर मग, थंडीत केसांसाठी नक्की कोणते पाणी वापरायचे? गरम पाण्याचा आरामदायक अनुभव घ्यायचा की थंड पाणीच फायदेशीर ठरते? तुमच्या केसांच्या गरजेनुसार आणि आरोग्य जपण्यासाठी पाण्याचे तापमान किती असावे ते पाहूयात...
गरम पाण्याने केस धुतल्यास कोणते नुकसान होते?
जास्त गरम पाण्याने केस धुणे कायमच टाळले पाहिजे कारण, यामुळे आपल्या स्काल्पमधील नैसर्गिक तेल निघून जाते आणि 'सीबम' (Sebum) चा समतोल बिघडतो. परिणामी, केस कोरडे आणि कमजोर होतात. डोक्याच्या केसांवरील क्यूटिकल्स आकसून तुटतात, ज्यामुळे केस गळण्याची शक्यता वाढते. याव्यतिरिक्त, स्काल्पला जळजळ होण्याची समस्या देखील होऊ शकते, कारण गरम पाण्याचे जास्त तापमान स्काल्पच्या ऊतींना हानी पोहोचवू शकते. यामुळे स्काल्पल खाज सुटणे आणि कोंड्याची समस्या देखील वाढते.
थंडीच्या दिवसात केस नेमके कोणत्या पाण्याने धुवावेत ?
१. थंडीच्या दिवसात एकदम जास्त गरम कडक पाण्याने किंवा एकदम थंड पाण्याने केस धुणे, केसांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. थंडीच्या दिवसांत केस धुण्यासाठी शक्यतो कोमट पाण्याचाच वापर करावा. ३५ ते ४० अंश सेल्सिअस तापमान असलेल्या कोमट पाण्याने केस धुवा. यामुळे आराम मिळतो आणि केसांचे नुकसान कमी होते.
२. हिवाळ्यात आठवड्यातून २ वेळापेक्षा जास्त केस धुऊ नका, जेणेकरून केसांमधील नैसर्गिक तेल टिकून राहील.
३. मॉइश्चरायझिंग शाम्पू आणि कंडिशनरचा वापर करा.
४. शाम्पूने केस स्वच्छ धुतल्यानंतर शेवटी थंड पाण्याने केस धुवावेत. क्यूटिकल्सना बंद करण्यासाठी थंड पाण्यानेसर्वात शेवटी केस धुणे आवश्यक असते.
प्रत्येकीला शोभून दिसणारे ६ ज्वेलरी सेट, दागिने इतके सुरेख की मायेनं घालावे-हौसैनं मिरवावेत...
५. हर्बल तेलाने केसांना मसाज करणे देखील केसांच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. केस धुण्यापूर्वी रात्री गरम हर्बल तेलाने स्काल्पची मालिश करा, यामुळे पोषक तत्वांचे शोषण वाढते.
हिवाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी कोमट पाणी वापरणे हा सर्वोत्तम उपाय आहे. फक्त एकदम जास्त गरम पाणी वापरणे शक्यतो टाळावे. चांगला शाम्पू कंडिशनरच्या मदतीने केस धुवावेत. याचबरोबर, हिवाळयात तेल मालिश केल्याने केसांची मजबुती आणि चमक टिकवून ठेवता येते.
Web Summary : During winter, lukewarm water (35-40°C) is best for washing hair. Avoid hot water, which can dry the scalp. Use moisturizing shampoo and conditioner, wash hair twice a week, massage with herbal oil before washing, and rinse with cold water at the end.
Web Summary : सर्दियों में बाल धोने के लिए गुनगुना पानी (35-40°C) सबसे अच्छा है। गर्म पानी से बचें, जो खोपड़ी को सूखा कर सकता है। मॉइस्चराइजिंग शैम्पू और कंडीशनर का उपयोग करें, सप्ताह में दो बार बाल धोएं, धोने से पहले हर्बल तेल से मालिश करें, और अंत में ठंडे पानी से धो लें।