Join us

इंचभर केस वाढायलाही ६ महिने लागतात? 'हे' घरगुती तेल लावा, केस वाढतील भराभर- लांबसडक होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2025 17:41 IST

What To Do For The Fast Hair Growth?: केसांची वाढ होतच नसेल तर हा एक सोपा उपाय घरच्याघरी करून पाहा...(home made hair oil to reduce hair loss)

ठळक मुद्देहा उपाय काही दिवस नियमितपणे केल्यास केसांमध्ये खूप चांगला बदल दिसून येईल..

काही जणींच्या केसांना अजिबातच वाढ नसते. एकदा केस कापले की अगदी ५ ते ६ महिने त्यांचे केस जसेच्यातसेच राहतात. त्यामध्ये इंचभरही वाढ झालेली नसते. शिवाय केस गळण्याचं प्रमाणही वाढलेलं असतं. अशावेळी केसांसाठी नेमका काय उपाय करावा हेच कळत नाही. कारण शाम्पू, कंडिशनर असे केमिकलयुक्त पदार्थ वापरले तर केस अजूनच गळतील की काय अशी भीती असतेच. म्हणूनच आता हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा. या उपायामुळे केसांचं नुकसान निश्चितच होणार नाही. यामध्ये आपण जे तेल तयार करणार आहोत, ते तेल वापरल्यामुळे केसांची वाढ पटापट होईल (home made hair oil to reduce hair loss). शिवाय त्यांचं गळणंही खूप कमी होईल.(what to do for the fast hair growth?)

 

केसांची भराभर वाढ होण्यासाठी उपाय

केसांची भराभर वाढ होण्यासाठी आपण घरगुती पद्धतीने तेल तयार करणार आहोत.

हे तेल तयार करण्यासाठी जास्वंदाची ८ ते १० पाने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर जास्वंदाची ४ ते ५ फुलंही घ्या.

जास्वंदाच्या रोपाला १५ दिवसांतून एकदा द्या बटाट्याचं खास खत! रोपं वाढतील जोमानं, फुलंही येतील भरपूर 

कडिपत्तादेखील केसांच्या वाढीसाठी खूप चांगला असतो. त्यामुळे हा उपाय करण्यासाठी आपण कडिपत्त्याचाही वापर करणार आहोत. त्यासाठी कडिपत्त्याची १० ते १२ पाने स्वच्छ धुवून घ्या.

आता कडिपत्त्याची पाने, जास्वंदाची पाने आणि फुले यांचे हातानेच तुकडे करून घ्या आणि ते मिक्सरमध्ये घालून त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्या.

 

आता गॅसवर एक पातेले गरम करायला ठेवा. त्या पातेल्यामध्ये नेहमीचे खोबरेल तेल घाला. साधारण १ वाटी खोबरेल तेल असावे. या तेलामध्ये मिक्सरमधून फिरवलेली पेस्ट घाला. तेलाला चांगली उकळी येऊ द्या. जेव्हा ती पेस्ट थोडी कुरकुरीत झालेली जाणवेल तेव्हा गॅस बंद करा. तेल थंड होऊ द्या आणि त्यानंतर ते गाळून घ्या.

९० टक्के लोकांना वाटतं की 'या' पदार्थांमधून भरपूर प्रोटीन्स मिळतात! पण तसं नसतं, बघा ते कोणते

या तेलाने आठवड्यातून दोन वेळा केसांच्या मुळाशी मसाज करा. त्यानंतर दोन तासाने नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका. हा उपाय काही दिवस नियमितपणे केल्यास केसांमध्ये खूप चांगला बदल दिसून येईल, अशी माहिती shraddha_world13 या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी