>ब्यूटी > क्रॉप टॉप घालायचाय? परफेक्ट स्मार्ट आणि कम्फर्टेबल लूकसाठी ४ गोष्टी विसरु नका

क्रॉप टॉप घालायचाय? परफेक्ट स्मार्ट आणि कम्फर्टेबल लूकसाठी ४ गोष्टी विसरु नका

क्रॉप टॉपची फॅशन सध्या प्रचंड ट्रेण्डी आहे. या टॉपमुळे निश्चितच चांगला लूक येतो. फक्त त्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2021 06:28 PM2021-10-10T18:28:53+5:302021-10-10T18:46:20+5:30

क्रॉप टॉपची फॅशन सध्या प्रचंड ट्रेण्डी आहे. या टॉपमुळे निश्चितच चांगला लूक येतो. फक्त त्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. 

Want to wear a crop top? Don't forget 4 things for a perfect smart and comfortable look | क्रॉप टॉप घालायचाय? परफेक्ट स्मार्ट आणि कम्फर्टेबल लूकसाठी ४ गोष्टी विसरु नका

क्रॉप टॉप घालायचाय? परफेक्ट स्मार्ट आणि कम्फर्टेबल लूकसाठी ४ गोष्टी विसरु नका

Next
Highlightsक्रॉप टॉपवर कॅज्यूअल लूक अधिक जास्त छान दिसतो.सडपातळ व्यक्तींनी क्रॉप टॉप घालताना तो ब्रा पट्टीच्या थोडाच खाली येईल, असा निवडला पाहिजे.

ग्लॅमरस लूक मिळविण्याचा एक उत्तम आणि सोपा पर्याय म्हणजे क्रॉप टाॅप. छोट्या पडद्यावरची मोठी अभिनेत्री आमना शरीफ हिचा क्रॉप टॉप घातलेला फोटो सोशल मिडियावर खूपच व्हायरल झाला आहे. आकाशी रंगाच्या या टॉपमध्ये आमना एकदम हॉट दिसते आहे. क्रॉप टॉप आणि मिनीस्कर्ट असा लूक आमनाने केला असून यावर तिने पांढऱ्या रंगाच्या हाय हिल्स घातल्या आहेत. आमनाच्या फोटोंची सध्या प्रचंड चर्चा होत असून तुम्हीही काहीतरी वेगळे ट्राय करायचे असेल किंवा लूक बदलायचा असेल तर क्रॉप टाॅपचा पर्याय निवडू शकता.

 

क्रॉप टॉपविषयी सगळ्यात मोठी जमेची बाजू म्हणजे अगदी लेहेंगा ते मिनिस्कर्ट असं कशावरही तुम्ही क्रॉप टॉप घालू शकता. जीन्सवर देखील क्रॉप टॉप घातलं तर ते निश्चितच तुम्हाला अफलातून लूक देतं. त्यामुळेच तर अगदी लग्न- समारंभ असो की एखादी पार्टी सध्या सगळीकडेच क्रॉप टॉपची धूम आहे. क्रॉप टॉप तुम्ही कशावरही घाला. पण तो घालताना काही गोष्टींची काळजी मात्र नक्कीच घेतली पाहिजे. नाहीतर क्रॉप टाॅप घालणं जितकं ग्लॅमरस दिसतं, तेवढंच ते हास्यास्पदही दिसू शकतं.

१. क्राॅप टॉपची साईज योग्य असावी
क्रॉप टॉप घालताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची साईज अगदी योग्य असली पाहिजे. मापात थोडं जरी कमी जास्त वाटत असेल, तरी क्रॉप टॉप घालणे टाळा. क्रॉप टॉपची साईज निवडताना बऱ्याचदा आपल्या मापाचं योग्य क्रॉप टॉप कोणतं ते लक्षात येत नाही. त्यामुळे जे टॉप उंचीला तुमच्या ब्रा पट्टीच्या अगदी थोडंसं खाली येणारं असेल, ते टॉप खरेदी करा. क्रॉप टॉप खूप जास्त पोटावर नसतं. त्यामुळे पोट झाकलं पाहिजे, असं क्रॉप टॉप निवडण्याचा हट्ट असेल, तर तो सोडा. 

 

२. जीन्सवर घाला टाईट क्रॉप टॉप
जर तुम्ही जीन्स किंवा मिनी स्कर्टवर क्रॉप टॉप घालण्याचा विचार करत असाल, तर ते क्रॉप टॉप टाईट असणं गरजेचं आहे. किंवा जर तुम्ही लूज ट्राऊजर घालणार असाल, तरी देखील त्यावर टाईट क्रॉप टॉप घाला. असा लूक जबरदस्त आकर्षक दिसतो.

३. जाड व्यक्तींनी अशी काळजी घ्यावी
सडपातळ व्यक्तींनी क्रॉप टॉप घालताना तो ब्रा पट्टीच्या थोडाच खाली येईल, असा निवडला पाहिजे. पण जाड व्यक्तींनी अशा प्रकारचा टॉप घातला तर त्यातून निश्चितच त्यांचे सुटलेले पोट दिसू शकते. त्यामुळे ज्या तरूणी जाड असतील, त्यांनी नाभीच्या थोडा वर येईल असा टॉप घालावा. जाड मुलींनी क्रॉप टॉपसोबत जीन्स घालणे टाळावे. त्यांनी स्कर्ट घालावा आणि तो पोटावर अशा ठिकाणी घालावा, जेणेकरून सुटलेले पोट बरोबर झाकले जाईल. 

 

४. क्रॉप टॉपवर करा कॅज्यूअल लूक
क्रॉप टॉपवर कॅज्यूअल लूक अधिक जास्त छान दिसतो. त्यामुळे क्रॉप टॉप घातल्यावर त्यासोबत एखादी शॉर्ट, हायहिल्स किंवा अगदीच मोकळ्या ढाकळ्य असणाऱ्या परंतू तेवढ्याच स्टाईलिश दिसणाऱ्या स्निकर्स, मोकळे केस किंवा केसांच्या दोन वेण्या, टॉप हेअर नॉट असं देखील तुम्ही यावर घालू शकता. 

 

Web Title: Want to wear a crop top? Don't forget 4 things for a perfect smart and comfortable look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

लॉंग शर्ट आणि नो पॅण्ट! ही कोणती अजब फॅशन, अनेक अभिनेत्री सोशल मीडियावर होताहेत ट्रोल - Marathi News | New trend of fashion: No pant trend, long shirt or T shirt with no wearing pants | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लॉंग शर्ट आणि नो पॅण्ट! ही कोणती अजब फॅशन, अनेक अभिनेत्री सोशल मीडियावर होताहेत ट्रोल

Fashion Trend: काही अभिनेत्रींचे फोटो तुम्ही पाहिले का? लांब शर्ट आणि नो पॅण्ट (long shirt or t shirt with no pants) अशा लूकमधले? त्यांच्याकडे पाहून आपल्याला काहीतरी चुकल्याचुकल्या सारखं वाटतं... पण हे असंच असतं म्हणे.... फॅशनची नवी तऱ्हा.... ...

Social Viral : बापरे! हेअर डायमुळे महिलेची अशी काही दशा झाली; पाहाल तर कलर करण्याआधी १० वेळा विचार कराल - Marathi News | Social Viral : Women head swelled up after hair dye use blinded for four days | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बापरे! हेअर डायमुळे महिलेची झाली अशी काही अवस्था; पाहाल तर कलर करण्याआधी १० वेळा विचार कराल

Social Viral : हेअर डाई लावल्यानंतर त्यांचा चेहरा भयंकर सुजला होता. याशिवाय डोक्यावर आणि त्वचेवर लाल  पुरळ उठले. ...

Hair Care: हेअर वॉशसाठी वापरा रिव्हर्स ट्रिक, शाम्पू करण्याआधी करा ही स्टेप! - Marathi News | Hair Care: Use the reverse trick for hair wash, do this step before shampoo! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Hair Care: हेअर वॉशसाठी वापरा रिव्हर्स ट्रिक, शाम्पू करण्याआधी करा ही स्टेप!

How to wash hair : हिवाळ्यात त्वचा कोरडी होते, तसेच केसही ड्राय होतात. त्यामुळे ते रूक्ष, कोरडे आणि निस्तेज दिसतात. असं होऊ नये, म्हणून हिवाळ्यात केस धुण्यासाठी रिव्हर्स ट्रिक (reverse method of hair wash) वापरा..  केसांचं होईल अधिक पोषण.... ...

PCOS ही समस्या नेमकी काय? PCOSमुळे वंध्यत्व येण्याचा धोका असतो? - Marathi News | What exactly is PCOS? Is PCOS a risk factor for infertility? what's treatment | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :PCOS ही समस्या नेमकी काय? PCOSमुळे वंध्यत्व येण्याचा धोका असतो?

PCOS ही समस्या जीवनशैली आणि अनुवंशिकता दोन्हीमुळे निर्माण होते, त्यामुळे वेळीच काळजी घ्या. ...

दुपारी झोपावंसं वाटतं, डुलकी लागते? झोपा बिंधास्त; नियम एकच 'वेळेचं' गणित पाळा, मिळवा पॉवर नॅप! - Marathi News | Feeling sleepy in the afternoon, then have Power Nap! read the benefits of power nap | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दुपारी झोपावंसं वाटतं, डुलकी लागते? झोपा बिंधास्त; नियम एकच 'वेळेचं' गणित पाळा, मिळवा पॉवर नॅप!

Nap in afternoon: सकाळच्या फर्स्ट हाफमध्ये दणादण सगळी कामं उरकली आणि दुपारचं जेवण झालं की घरी असलेल्या प्रत्येकाला थोडीशी डुलकी (power nap) मारण्याची जाम इच्छा होते.. (benefits of power nap) तुमचंही तसंच होत असेल आणि तुम्ही झोपायचं टाळत असाल, तर हे न ...

करिश्मा कपूरची कांजीवरम साडी विथ कलमकारी प्रिंट! कांजीवरम- कलमकारीचं पाहा देखणं मनमोहक फ्युजन.. - Marathi News | Karisma Kapoor's Kanjivaram Saree with Kalamkari Print! traditional kanjivaram with modern look | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करिश्मा कपूरची कांजीवरम साडी विथ कलमकारी प्रिंट! कांजीवरम- कलमकारीचं पाहा देखणं मनमोहक फ्युजन..

पारंपरिक डिझाईन्सच्या कांजीवरम साडी (Kanjivaram silk saree) आपण नेहमीच पाहतो... पण कांजीवरम साडीचं आणखी देखणं आणि माॅडर्न रूप पाहायचं असेल, तर करिश्मा कपूरच्या (actress Karisma Kapoor) साडीचे हे फोटो बघाच... ...