लांब, दाट आणि काळेभोर केस कोणाला आवडत नाहीत? पण आजच्या धावपळीच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये, प्रदूषण आणि चुकीच्या आहारामुळे केस गळणे, अकाली पांढरे होणे किंवा कोंडा होणे या समस्या फारच कॉमन झाल्या आहेत. केस गळणे, कोंडा, कोरडेपणा, अकाली पांढरे केस आणि केसांची वाढ मंदावणे अशा अनेक केसांच्या समस्यांनी आजकाल बहुतेकजणी हैराण आहेत. आयुर्वेदात आवळ्याला केसांसाठी अमृत मानले जाते. व्हिटॅमिन 'सी' , अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक घटक असलेला आवळ्याचा रस केसांच्या मुळांना बळकटी देतो आणि केसांना नैसर्गिक चमक देण्यास मदत करतो( how to make amla juice for hair problems using 7 ingredients).
फक्त आवळ्याचा रस केसांना लावणे फायदेशीर असले, तरी त्यात काही घरगुती आणि नैसर्गिक घटक मिसळल्यास त्याचा परिणाम अधिक फायदेशीर ठरतो. केसांसाठी योग्य प्रमाणात आणि अचूक पद्धतीने आवळ्याच्या रसाचा वापर केल्यास हे मिश्रण केसांच्या समस्या कमी करण्यास मदत करू शकते. आवळ्याच्या रसात कोणते ७ पदार्थ मिसळल्यास (using 7 ingredients amla juice for hair problems) केसांना जास्तीत जास्त फायदा मिळतो ते पाहूयात...
केसांसाठी आवळ्याचा रस कसा तयार करायचा ?
केसांसाठी आवळ्याचा रस तयार करण्यासाठी आपल्याला, ३ ते ४ बिया काढून छोटे तुकडे केलेले आवळे आणि ग्लासभर पाणी इतक्या दोनच पदार्थांची गरज लागणार आहे.केसांसाठी आवळ्याचा रस तयार करण्यासाठी सर्वात आधी, चिरलेले आवळे घ्या आणि ते मिक्सरमध्ये घाला. त्यानंतर त्यात अर्धा कप पाणी घाला. आता हे मिश्रण चांगले वाटून घ्या. यामुळे आवळ्याची पेस्ट तयार होईल. आवश्यकतेनुसार थोडे अधिक पाणी घालून पुन्हा एकदा ब्लेंड करा. त्यानंतर हे मिश्रण गाळणीने गाळून घ्या. अशाप्रकारे केसांसाठी उपयुक्त असा आवळ्याचा रस तयार होतो.
आवळ्याच्या रसात मिसळा 'हे' ७ पदार्थ आणि पाहा कमाल...
१. आवळा आणि कोरफड जेल (ड्राय केसांसाठी हेअर मास्क) :- जर तुमचे केस कोरडे, निर्जीव किंवा गुंता होणारे असतील, तर आवळ्याच्या रसात ताजे कोरफड जेल (Aloe Vera) मिसळा. हे मिश्रण नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते. यामुळे केसांना आवश्यक ओलावा मिळतो आणि केस काचेसारखे चमकू लागतात.
२. आवळा आणि कांद्याचा रस (केसगळतीवर रामबाण उपाय) :- जर तुमचे केस खूप जास्त प्रमाणात गळत असतील किंवा डोक्यावर टक्कल पडू लागले असेल, तर आवळ्याचा रस आणि कांद्याचा रस समप्रमाणात एकत्र करा. कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात सल्फर (Sulphur) असते, जे केसांच्या मुळांना नवसंजीवनी देते, तर आवळा त्या मुळांना मजबूत करतो.
३. मेथीचे दाणे :- (केसगळती थांबवण्यासाठी ) :- मेथीचे दाणे केसांसाठी खूप फायदेशीर असतात. आवळ्याच्या रसात मेथीचे दाणे मिसळून केसांना लावल्यास केसांना प्रोटीन मिळते. यामुळे केसांच्या मुळांना मजबुती मिळते आणि केस पातळ होण्यापासून वाचण्यास मदत होते.
४. नारळाचे तेल (केसांना ओलावा मिळतो) :- आवळ्याच्या रसात नारळाचे तेल मिसळूनही केसांना लावू शकता. यामुळे केसांना पुरेशी आर्द्रता मिळते. केस तुटणे कमी होते आणि केस लांब व मजबूत होण्यास मदत मिळते. खोबरेल तेल केसांना खोलवर हायड्रेट करते. आवळ्याचा रस आणि खोबरेल तेल एकत्र करुन लावल्याने केसांमधील कोरडेपणा जाऊन ते मऊ मुलायम, लांब आणि चमकदार होतात.
५. एरंडेल तेल (केसांना घनदाट - काळेभोर करण्यासाठी) :- एरंडेल तेल केसांना घनदाट करते आणि मुळांपासून टोकापर्यंत पोषण देते. हे तेल आवळ्याच्या रसासोबत मिसळून केसांना लावल्यास अधिक चांगला फायदा होतो.
६. लिंबाचा रस (कोंड्यासाठी) :- लिंबामध्ये व्हिटॅमिन 'सी' आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जर तुम्हाला कोंड्याचा त्रास असेल, तर आवळा रसात लिंबाचा रस मिसळून लावल्याने स्काल्प स्वच्छ होते आणि खाज थांबते.
७. कोरफड जेल (थंडावा आणि चमक) :- कोरफडमध्ये अमिनो ॲसिड आणि एन्झाइम्स असतात. आवळ्याच्या रसात फ्रेश कोरफड जेल मिसळल्याने केसांचा पोत सुधारतो आणि केसांना नैसर्गिक चमक येते. हे मिश्रण केसांना लावून किमान ३० ते ४५ मिनिटे ठेवा आणि त्यानंतर कोमट पाण्याने किंवा सौम्य शॅम्पूने केस धुवा.
Web Summary : Amla juice, rich in vitamin C and antioxidants, strengthens hair. Mix it with aloe vera, onion juice, fenugreek, coconut oil, castor oil, or lemon juice to combat hair problems like dryness, hair fall, and dandruff for lustrous, healthy hair.
Web Summary : विटामिन सी और एंटीऑक्सीडेंट से भरपूर आंवला का रस बालों को मजबूत बनाता है। इसे एलोवेरा, प्याज का रस, मेथी, नारियल तेल, अरंडी का तेल या नींबू के रस के साथ मिलाकर बालों के झड़ने, रूसी और रूखेपन जैसी समस्याओं से निजात पाएं और पाएं चमकदार, स्वस्थ बाल।