आपण दिवसाची सुरवात अंघोळीने करतो. अंघोळ केल्यावर अगदी प्रसन्न वाटते. ताजेतवाने झाल्यासारखे वाटते. अंघोळीनंतर शरीर तर साफ होते, मात्र शरीरावरील डाग तसेच पुरळ, खाज जातेच असे नाही. (Use these '3' things instead of soap while bathing, the best solution for body odor, summer sweats)विविध कंपन्यांचे चांगल्यातले साबण वापरले तरीही जात नाहीत. शरीराला फक्त वास चांगला येऊन फायदा नाही, शरीरावरील डाग, ऍलर्जी सगळे जाणेही गरजेचे आहे. (Use these '3' things instead of soap while bathing, the best solution for body odor, summer sweats)धूळ, माती, प्रदूषणाने खराब झालेली त्वचा चांगली व्हावी यासाठी आपण पार्लर ट्रिटमेंट करतो मात्र अंघोळीच्या वेळी काही सवयी पाळल्या तर पार्लरला जाऊन भरपूर खर्च करायची वेळच येणार नाही.
आपल्या घरामध्ये असे काही पदार्थ असतात जे त्वचेसाठी फार उपयुक्त ठरतात. ते पदार्थ वापरून जर अंघोळ केली तर असे त्वचेचे त्रास उद्भवणारच नाहीत. आठवड्यातून एखादा दिवस असे पदार्थ वापरायचे. चिकट नसतात, त्यांचा वासही घाण येत नाही. पाण्याने लगेच धुतले जातात.
१. बेसनआपण चेहर्याला बेसन लावतो. त्याचा लेप करुन चेहरा स्क्रब करतो. फक्त चेहराच नाही तर शरीरासाठीही बेसन तेवढेच उपयुक्त ठरते. बेसनामुळे त्वचा उजळते तसेच कंड येत नाही. पुरळ असेल, डाग असतील तर ते कमी होतात. बेसन एका वाटीमध्ये घ्या त्यामध्ये पाणी घाला आणि पेस्ट तयार करा. साबणाप्रामाणे ती पेस्ट शरीराला लावा आणि नंतर धुऊन टाका.
२. चंदन पावडरचंदनाची पावडर पाण्यात भिजवून शरीराला लावा. अनेक साबणांवर 'यामध्ये आहेत चंदनाचे गुण' असे लिहिले असते. त्या साबणांचा वापर करण्यापेक्षा नैसर्गिक शुद्ध चंदन वापरून अंघोळ केल्याने जास्त फायदा होईल. चंदनामुळे शरीराची दुर्गंधीही जाते. खाखेतला वास तसेच नाभिपाशी येणारा वास कमी होतो.
३. त्रिफळा चूर्णत्रिफळा चुर्णामध्ये अनेक विविध औषधी पदार्थ असतात. त्वचेसाठी ते फार फायदेशीर असतात. घामाला येणारा वास या चुर्णाचा वापर केल्याने नाहीसा होतो. तसेच त्वचा उजळते. मात्र चूर्ण वापरल्यावर अजिबात साबण लाऊ नका. नाही तर त्याचा काही फायदा होणार नाही.