केस विंचरताना कधी कंगवा भरून केसांचा पुंजका हातात येतो, तर कधी जमिनीवर भरपूर केस गळून पडलेले दिसतात. केस गळतीमुळे आपण इतके हताश होतो की, जो सांगेल तो शाम्पू बदलून पाहतो. परंत्तू अशावेळी शाम्पू बदलण्यापेक्षा तो केसांवर लावण्याची पद्धत बदलली तर केसगळती कायमची थांबू शकते. आपल्या स्वयंपाकघरात असलेले दोन असे साधे पदार्थ आहेत, की जे शाम्पूमध्ये मिसळून लावल्यास केसांची मुळे मजबूत होतात आणि केस काळेभोर, लांबसडक होतात(tea and coffee powder hair fall remedy).
केसांचे सौंदर्य व आरोग्य टिकवण्यासाठी केस फक्त शाम्पूने धुणे पुरेसे नसून त्यांना नैसर्गिक पोषण मिळणे देखील गरजेचे असते. जर आपण नेहमीच्याच शाम्पू मध्ये घरातील दोन पदार्थ मिसळले, तर ते केसांसाठी उत्तम 'हेअर टॉनिक' ठरू शकतं. आयुर्वेदिक डॉक्टर शोभना यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करत केसांसाठी एक घरगुती उपाय (reduce hair fall naturally with tea and coffee) सांगितला आहे, हा उपाय नेमका काय आहे ते पाहूयात...
केसगळती थांबवण्यासाठी शाम्पूमध्ये मिसळा २ खास पदार्थ...
सर्वात आधी एका पॅनमध्ये एक ग्लास पाणी घ्या आणि त्यात दोन चमचे चहा पावडर घाला. हे पाणी उकळायला ठेवा आणि ते अर्धा ग्लास होईपर्यंत उकळू द्या. नंतर चहापावडरचे पाणी गाळून घ्या. या पाण्यात इन्स्टंट कॉफी पावडर चिमूटभर घाला. त्यानंतर यात एक चमचा फ्रेश अॅलोवेरा जेल मिसळा. आता यामध्ये नेहमीचा शाम्पू चमचाभर मिसळा. आता साध्या शाम्पू ऐवजी या मिश्रणाने केस धुवा. आठवड्यातून २ वेळा हा उपाय केल्यास केसांवर चांगला परिणाम दिसून येतो.
काही आठवड्यात दिसून येईल चांगला फरक...
डॉ. शोभना सांगतात की, जेव्हा तुम्ही या पाण्याने केस स्वच्छ धुवाल तेव्हा काही आठवड्यांतच हा उपाय केसगळती मोठ्या प्रमाणात कमी करण्यास मदत करतो. इतकेच नाही तर जर तुमचे केस खूप कोरडे आणि रूक्ष झाले असतील, तर हा उपाय केसांना मऊ आणि सिल्की करण्यास फायदेशीर ठरतो. केसांची नैसर्गिक चमक कमी झाली असेल, तर कॉफी आणि चहा पावडरमुळे केसांना नॅचरल शाईन येऊ लागते.
हा घरगुती उपाय केसांसाठी आहे फायदेशीर...
१. चहा पावडर आणि कॉफीमध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म स्काल्प वरील कोंडा आणि खाज कमी करण्यास मदत करतात.
२. अॅलोवेरा जेलमुळे स्काल्पला थंडावा मिळतो आणि केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोहोचते, त्यामुळे केस मजबूत होतात.
३. कॉफी आणि चहा पावडर मधील नैसर्गिक गुणधर्म केसांचा काळभोर रंग टिकवून ठेवण्यास मदत करतात.
४. ज्यांच्या केसांमध्ये जास्त तेलकटपणा असतो, त्यांच्यासाठी हा उपाय उपयुक्त ठरतो, स्काल्प स्वच्छ रहाण्यास मदत होते.
५. केसांना आवश्यक पोषण मिळाल्यामुळे केस तुटत नाहीत आणि स्प्लिट एंड्सचा त्रास कमी होतो.
६. हा उपाय नियमित केल्यास केस जाड, घनदाट आणि काळेभोर दिसू लागतात.
Web Summary : Mix tea and coffee powder into your shampoo to strengthen hair roots, reduce hair fall, and promote long, shiny hair. This homemade remedy nourishes the scalp and improves hair health with regular use.
Web Summary : चाय और कॉफी पाउडर को अपने शैम्पू में मिलाएं, बालों की जड़ों को मजबूत करें, बालों का झड़ना कम करें, और लंबे, चमकदार बाल पाएं। यह घरेलू उपाय नियमित उपयोग से खोपड़ी को पोषण देता है और बालों के स्वास्थ्य में सुधार करता है।