केसांच्या अनेक समस्यांमध्ये केसगळती व केस अकाली पांढरे होणे या दोन समस्या फारच कॉमन आहेत. आजकाल आपल्यापैकी बऱ्याचजणांना फारच कमी वयात केसगळती व केस अकाली पांढरे होणे यांसारख्या समस्या सतावतात. या समस्यांवर उपाय म्हणून आपण अनेकदा इन्स्टंट आणि लगेच इफेक्ट देतील अशाच उपायांवर भर देतो. परंतु अशा इन्स्टंट उपायांचे परिणाम हे देखील तात्पुरतेच असतात. पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी आणि केसांची मजबूती तसेच केसगळती थांबण्यासाठी बाजारातून वेगवेगळ्या पद्धतीची महागाडी हेअर डाय प्रॉडक्ट्स विकत घेतो. पण त्यातील केमिकल्समुळे कधी केसांची मूळ कमजोर होतात तर कधी केस गळायला लागतात आणि केसांच्या समस्या सुटण्याऐवजी आणखीनच वाढतात. पण जर आपल्याला हे सगणं टाळून केसांना रंग द्यायचा असेल आणि केसांना पोषणही मिळावे अशी इच्छा असेल, तर कधीही नैसर्गिक घरगुती उपायच फायद्याचे ठरतील(use onion peel to make black hair dye).
कांद्याची सालं जी आपण सहसा फेकून देतो, त्यामध्ये अशी काही नैसर्गिक रंगद्रव्ये असतात जी पांढऱ्या केसांना रंग देण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी मदत करतात. यासोबत इतर घरगुती घटक जसे खोबरेल तेल, कॉफी पावडर, व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल (use onion peel to make black hair dye) वापरून आपण घरगुती केसांसाठी सुरक्षित नॅचरल हेअर डाय तयार करु शकतो.
कांद्याच्या सालींचा हेअर डाय कसा तयार करावा ?
कांद्याच्या सालींचा घरगुती हेअर डाय तयार करण्यासाठी आपल्याला कांद्याच्या साली, कॉफी, खोबरेल तेल, व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल, चहा पावडर आणि लोखंडाची कढई या इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
घरच्याघरीच हेअर डाय तयार करण्यासाठी सर्वात आधी एक लोखंडी कढई व्यवस्थित गरम करून घ्या. कढई चांगली तापल्यावर त्यात कांद्याची सालं घालून कोरडीच भाजून घ्या. जेव्हा या साली काळ्या होऊ लागतील, तेव्हा त्या थंड करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
या तयार झालेल्या मिश्रणात कॉफी पावडर मिसळा. आता यात खोबरेल तेल आणि व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल मिसळा. सर्व पदार्थ पुन्हा लोखंडी कढईत घालून चांगले मिसळा आणि पूर्ण रात्रभर तसेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी, जेव्हा हा डाय केसांवर लावायचा असेल, तेव्हा त्यात चहा पावडरचे पाणी उकळून घाला आणि मिश्रण थंड करून घ्या.
हेअर डाय लावण्याची पद्धत...
कांद्याच्या सालींपासून तयार केलेला हेअर डाय केसांमध्ये लावण्यापूर्वी केस स्वच्छ धुवून घ्यावेत. केसांमध्ये कोणत्याही प्रकारचे तेल किंवा घाण नसावी. यानंतर, फणीने केस विंचरून व व्यवस्थित गुंता काढून टाका. तयार झालेला डाय केसांच्या मुळांपासून लांबीपर्यंत व्यवस्थित लावून घ्या. हा डाय ३० मिनिटे केसांना लावून ठेवल्यानंतर, साध्या पाण्याने धुवून टाका. केसांचा पांढरेपणा कमी करण्यासाठी आणि उत्तम परिणामांसाठी तुम्हाला हा घरगुती डाय आठवड्यातून २ वेळा वापरावा. महिन्यातून ४ वेळा तरी नक्की लावा यामुळे पांढऱ्या केसांची समस्या कमी होईल.
हा घरगुती डाय केसांना लावल्यानंतर शाम्पूने केस धुवू नका. कमीतकमी २ दिवस शाम्पूचा वापर करू नका. जर डाय लावल्यानंतर स्कॅल्पमध्ये कोणत्याही प्रकारची खाज किंवा जळजळ होत असेल, तर डाय लावणे टाळा. जर तुमच्या स्काल्पमध्ये कोणत्याही प्रकारचा संसर्ग असेल, तर हा डाय वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Web Summary : Onion peels can combat gray hair and hair fall. Create a natural hair dye using onion peels, coconut oil, coffee, and vitamin E. Apply this homemade dye twice a week for best results. Avoid shampooing immediately after application.
Web Summary : प्याज के छिलके सफेद बालों और बालों के झड़ने से लड़ सकते हैं। प्याज के छिलके, नारियल तेल, कॉफी और विटामिन ई का उपयोग करके एक प्राकृतिक हेयर डाई बनाएं। सर्वोत्तम परिणामों के लिए इस घरेलू डाई को सप्ताह में दो बार लगाएं। लगाने के तुरंत बाद शैम्पू करने से बचें।